सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 54, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२८ सार्थ तुकारामगाथा शब्दार्थ व टीपा - कल्पवरी-युगाच्या अखेरपर्यंत, नीचवृत्तिकाम-हलक्या वृत्तीमधील कोणतेही काम, वेचाये-खर्च व्हावेत अर्थ-साधुसंगतीचे माहात्म्य गाताना तुकारामबुवा म्हणत आहेत, संताचे जे दास आहेत त्याच्या दासाचा दास मला परमेश्वरा, केलेस तरी चालेल १ असे झाले तर मग अनेक युगापर्यंत मला गर्भवास घडून जन्मावर जन्म लाभले तरी चालतील २ तुझे नाव माझ्या मुखात असले म्हणजे वाटेल तसली हलकी कामेही मी आनंदाने करीन ३ तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरा, तुझ्या सेवेतच माझे सर्व संकल्प याप्रमाणे खर्च व्हावेत ४ ५८ सदा तळमळ । चित्ताचिये हळहळ ॥ १ ॥ त्याचे दर्शन न व्हावे । शव असता तो जिवे ॥ २ ॥ कुशब्दाची घाणी । अमंगळविली वाणी ॥ ३ ॥ नेणे शब्द पर । तुका म्हणे परउपकार ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - शव-प्रेत, कुशब्द्-वाईट शब्द, पर-परतत्त्व अर्थ - ज्याचे चित्त नेहमीच वृथा तळमळ करीत असते, हळहळत असते, १ त्याचे दर्शन सुद्धा मला होऊ नये कारण तो जिवंत असला तरी प्रेताप्रमाणेच असतो २ वाईट शिवराळ शब्दाच्या घाणीने त्याची वाणी अमंगल बनलेली असते ३ परतत्त्वाविषयी, ईश्वराविषयी त्याला एक शब्दही माहित नसतो परोपकारही तो जाणीत नाही ४ ५९ जया नाहीं नेम एकादशीव्रत । जाणावे ते प्रेत शव लोकीं ॥ १ ॥ त्याचे१ वय नित्य काळ लेखीताहे । रागें दांत खाय करकरा ॥ २ ॥ जयाचिये द्वारी तुळसीवृंदावन । नाही ते स्मशान गृह जाणा ॥ ३ ॥ जये कुळी नाही एक ही वैष्णव । त्याचा वुडे भवनदीतापा ॥ ४ ॥ विठोबाचे नाम नुच्चारी जें तोंड । प्रत्यक्ष ते कुड रजकाचे२ ॥ ५ ॥ तुका म्हणे त्याचे काष्ठ हातपाय । कीर्तना नव जाय हरीचिया३ ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - काळ-यम वैष्णव-विष्णुभक्त, भवनदीतापा-संसाररूपी नदीमधील नाव, रजकाचे- परिटाचे, चर्मकाचे-चांभाराचे, काष्ठ-लाकूड अर्थ - ज्याच्या घरी एकादशीचे व्रत नाही त्याचा देह सजीव असला तरी समाजात त्याची एखाद्या प्रेताइतकीच किंमत समजावी १ त्याचे जाणारे दिवस प्रत्यक्ष यम रागाने दात करकरा खाऊन मोजीत बसला आहे २ ज्याच्या घराच्या दारात तुळसीवृंदावन नाही त्या घरात घर न म्हणता स्मशानच समजावे ३ ज्याच्या कुळात एकही विष्णुभक्त झाला नाही त्याची संसारसागर तरून जाण्याची नाव बुडाली आहे असेच समजावे ४ जो मनुष्य तोंडाने विठ्ठलाचे नाव उच्चारीत नाही त्याचे तोंड म्हणजे चामडे बुडवायचे चांभाराचे कुंडच होय ५ तुकाराम महाराज म्हणतात जो कीर्तनाला जात नाही त्याचे हातपाय म्हणजे निर्जीव लाकडेच म्हणावीत ६ विवरण -वारकरी संप्रदायातील पंथीयांना काही आचारधर्म साधुसंतानी बसवून दिले आहेत त्याचे उपास्य दैवत श्रीविठ्ठल असावे त्याने एकादशी व्रत करावे, त्याच्या दारात तुळसीवृंदावन असावे, त्याने विठ्ठलाचे नामस्मरण करावे, त्याने कीर्तनास जावे असा काही साधनमार्ग आखून दिलेला आहे हा न पाळणारा मनुष्य कसा वाया जातो याचे वर्णन या अभंगात आहे वारकरी संप्रदायात एकादशी या महाव्रताचे महत्त्व विशेष सांगितले आहे या दिवशी उपवास करून हरिसस्मरणात सर्व वेळ घालविणे हा मुख्य हेतू असतो उपवास हे परमेश्वरप्राप्तीचे एक साधन म्हणून उपनिषदातून वर्णन आहे 'तमेतं वेदानुवचनेन ब्राह्मणा विविदिषन्ति यज्ञेन दानेन तपसानाशकेन' म्हणजे वेदाभ्यास, यज्ञ, दान, तप व अनाशक म्हणजे अन्नपाण्यावाचून राहणे हे पाच परमेश्वरप्राप्तीचे माग आहेत अन्नपाणी वर्ज्य करून भगवंताजवळ एकचित्ताने राहणे हे उपवासाचे रहस्य आहे भागवतात एकादशीच १ त्याचे दिवस २ चर्मकाचे ३ हरीच्या जो