छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 110, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंभडीमार सुरू केला. शिवाजी महाराजांचा आरमारप्रमुख दौलतखान शीघ्र गतीने इंग्रजांच्या प्रतिकारासाठी खांदेरीपर्यंत आला. मायनाक भंडाऱ्याने इंग्रजांची काही गलबते पकडली. तसेच काही इंग्रजांना कैद केले. तेव्हा मुंबईहून केग्विन याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी इंग्रजांचे सुसज्ज आरमार निघाले. या आरमारामध्ये एक मोठे जहाज आणि सात गलबते होती. दौलतखानाजवळ वीस गुराबांचे आरमार होते. इंग्रजांच्या आरमारी हालचाली होण्यापूर्वीच दौलतखानाने आरमारी हल्ले सुरू केले. इंग्रजांची गलबते निकामी केली. रिव्हेंज, फ्रिगेज हे मोठे जहाज इंग्रजांजवळ असल्यामुळे त्यांना आपण मराठ्यांचा सहज पराभव करू अशी घमेंड होती. मुंबईहून निघण्यापूर्वी आपण नक्की विजयी होणार अशी फुशारकी केग्विनने मारली होती. परंतु प्रत्यक्षात केग्विनचे आरमार टक्कर देऊ शकले नाही. नोव्हेंबर १६७९ मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये मोठे आरमारी युद्ध झाले. स्वतः केग्विनने तक्रार केली होती की, मराठ्यांची गलबते चलाख असल्यामुळे आपली लढाऊ गलबते कुचकामी ठरली. यासुमारास मराठ्यांची आरमारी शक्ती नष्ट करण्याच्या इराद्याने सिद्दीनी स्वतंत्रपणे मराठ्यांविरुद्ध आरमारी चढाई केली. परंतु इंग्रज आणि सिद्दी या दोघांच्याही आरमाराचा मराठ्यांनी अक्षरशः धुव्वा उडविला. शेवटी इंग्रजांनी माघार घेतली. खांदेरी उंदेरी यापुढे शिवाजीच्याच ताब्यात राहणार याची इंग्रजांना खात्री पटली. खांदेरीचे युद्ध संपले. पण मुंबईकर इंग्रजांना खांदेरी मराठ्यांच्या ताब्यात असल्यामुळे नंतरही बरीच वर्षे भीती वाटत होती. हे १६८२ च्या एका पत्रावरून स्पष्ट होते. इंग्रजांप्रमाणे डच आणि फ्रेंच यांच्याशीही शिवाजी महाराजांचा संबंध आला. डचांनी प्रथमपासूनच शिवाजीबरोबर मैत्री राखण्यात यश मिळविले. फ्रेंचांचे मुख्य केंद्र पाँडेचेरीला असताना शिवाजी महाराजांचा त्यांच्याशी फार संबंध आला नाही. शिवाजी महाराजांनी दक्षिणेची स्वारी काढली त्यावेळी पाँडेचेरीचे फ्रेंच अत्यंत सावध होते. तेथील प्रमुख अधिकारी मार्टीन याने शिवाजी महाराजांच्या दक्षिण स्वारीची माहिती लिहून ठेवलेली आढळते. लांब पल्ल्यांच्या तोफा फ्रेंचांकडून मिळविण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. त्याचप्रमाणे किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी आणि भक्कम तटबंदी बांधण्यासाठी महाराजांनी फ्रेंचांकडे वास्तुविशारदांची मागणी केली. परंतु या दोन्ही मागण्यांबाबत शिवाजीला यश आले नाही. पाश्चात्य वखारवाले स्थानिक राज्यकर्त्यांशी पुरेसे संरक्षण मिळावे म्हणून सलोख्याचा संबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत असत. पण त्याचबरोबर आपल्या तंत्रज्ञानाचा किंवा शस्त्रास्त्रांचा स्थानिक राज्यकर्त्यांबाबत १०४ छत्रपती शिवाजी महाराज