छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 116, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंमहाराजांनी हंबीरराव मोहिते याला सेनापतीपद दिले होते. ६. पंडितराव : या प्रधानाला धर्मविषयक सर्व अधिकार देण्यात आले होते. त्याचप्रमाणे विद्वानांचा सत्कार करणे, अनुष्ठाने करणे, दानधर्माची आखणी करणे इत्यादी कामे त्याच्याकडे सोपविली होती. महाराजांनी रघुनाथ पंडीत याची पंडितराव म्हणून नियुक्ती केली होती. ७. न्यायाधीश : न्यायदानाची जबाबदारी याच्यावर असून निवाडापत्रावर याचे संमतीचिन्ह आवश्यक मानले जात असे. या पदावर निराजी रावजी याची नेमणूक शिवाजी महाराजांनी केली होती. ८. सुमंत : परराज्याशी सामान्य व्यवहार करण्यासाठी या प्रधानाची नियुक्ती करण्यात आली होती. महाराजांनी रामचंद्र त्रिंबक यास सुमंत म्हणून नेमले होते. या सर्व प्रधानांचे वेतन निश्चित करण्यात आले होते. पेशव्यास दरवर्षी १५,००० होन तर अमात्यास दरवर्षी १२,००० होन असे वेतन ठरवण्यात आले होते. इतर प्रधानांना दरवर्षी १०,००० होन असे वेतन निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक प्रधानाला ८ कारकून म्हणजे अधिकारी देण्यात आले होते. १) दिवाण, २) मुजुमदार, ३) फडणीस, ४) सबनीस, ५) कारखानीस, ६) चिटणीस, ७) जामदार व ८) पोतनीस. या ८ अधिकाऱ्यांचे वेतनही निश्चित करण्यात आले होते. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचे प्रशासन जास्तीत जास्त निर्दोष आणि स्वच्छ असले पाहिजे म्हणून काही दंडक घालून दिले होते. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी प्रधानांचे आणि अधिकाऱ्यांचे पगार निश्चित केले. त्यांच्या बढतीचे अथवा बडतर्फीचे अधिकार स्वतःकडे राखून ठेवले. दुसरा दंडक म्हणजे कोणत्याही प्रकारचे अधिकार एकाच प्रकारच्या अधिकाऱ्याकडे केंद्रित न करता ते दोन किंवा तीन अधिकाऱ्यांकडे विभागून देण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनामध्ये एक शिस्त निर्माण झाली होती. आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार एक व्यक्तीच्या हातामध्ये ठेवलेला नव्हता. मुलकी व्यवस्थेप्रमाणे लष्करी व्यवस्थेतही महाराजांनी या तत्त्वाचा उपयोग केला होता. मुलकी व्यवस्था स्वराज्यामध्ये एकूण चौदा सुभ्यांचा समावेश होता. त्या सुभ्यांना प्रांत असे म्हटले जाईल. प्रांताचा अधिकारी म्हणजे सुभेदार किंवा देशाधिकारी. ११० छत्रपती शिवाजी महाराज