छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 22, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ें३. शिवरायाचा उदय शिवाजीचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ म्हणजे १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी - शुक्रवारी शिवनेरी किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला. जेधे शकावलीत म्हटल्याप्रमाणे 'शके १५५१ शुक्ल संवत्सरे फालगुण वद्य तृतीया शुक्रवार नक्षत्र हस्त घटी १८ पळे ३१ गड ५ पळे ७ ये दिवशी शिवाजी राजे शिवनेरीस उपजले.' शिवरायाचा जन्म झाला त्यावेळी दक्षिणेमध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली होती. इ.स. १६३० मध्ये दक्षिण भारतात एवढा प्रचंड दुष्काळ पडलेला होता की, या दुष्काळाच्या खाईत रयत अक्षरशः होरपळून निघत होती. गावेच्या गावे ओस पडली होती. अन्न काय पण पाणी मिळणेसुद्धा मुश्किल झाले होते. या विदारक दुष्काळाची वर्णने समकालीन लेखकांनी लिहून ठेवलेली आहेत. जनता हवालदिल झाली होती. दुष्काळाच्या संकटाला जोडूनच साथींच्या रोगांचा फैलाव सर्वदूर झाला. लोक मेटाकुटीला आले, अशी परिस्थिती असताना समकालीन राज्यकर्ते जनतेच्या प्रश्नांचा विचार न करता परस्परावर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे राजकीय अस्थिरताही निर्माण झाली होती. इ.स. १६३० चे सुमारास निजामशाही अतिशय कमकुवत झाली होती. आदिलशाही दरबारात अंतस्थ कटकटी सुरू झाल्या होत्या. कुतुबशाही जरी आपले अस्तित्व टिकवून असली तरी मुघलांचा प्रभाव तेथेही वाढू लागला होता. अशा परिस्थितीत १६३६मध्ये शहाजहानने दक्षिणेची स्वारी काढली. कुतुबशाहाशी सख्य जुळवून आदिलशहाबरोबर तह करून निजामशाही विरूद्ध लढा उभारला. शहाजीने निजामशाही वाचविण्याचा निकराने प्रयत्न केला तथापि १६३६च्या अखेरीस शहाजीला शरणागती पत्करणे भाग पडले. शहाजहानने निजामशाही खालसा केली आणि तो प्रदेश मुघल व आदिलशहा यांच्यामध्ये १६