छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 23, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंवाटून देण्यात आला. शहाजीने आदिलशाहीची नोकरी पत्करली आणि तो कर्नाटकात निघून गेला. पुणे जहागिरीची देखरेख करण्यासाठी शहाजीने दादोजी कोंडदेव याची नेमणूक केली. या जहागिरीमध्ये इंदापूर, सुपे, पुणे आणि चाकण हे परगणे मोडत होते. शहाजी जरी कर्नाटकात गेला तरी जिजाबाई व बालशिवाजी यांचे वास्तव्य शिवनेरी किल्ल्यावरच होते. समकालीन साधनांवरून अशी माहिती मिळते की इ.स. १६४१च्या सुमारास शिवाजी आणि जिजाबाई बंगलोरला शहाजीकडे गेले. बंगलोरहून परत येताना शहाजीने शामराज निळकंठ याची शिवाजीचा पेशवा म्हणून नेमणूक केली. याशिवाय माणकोजी दहातोंडे, सरनोबत बाळकृष्णपंत दीक्षित याला मुजुमदार म्हणून नेमले. शिवाय सोनोपंत डबीर आणि रघुनाथ बल्लाळ सबनीस यांनाही शिवाजीच्या दिमतीस दिले. अशाप्रकारे हा सरंजाम घेऊन शिवाजी जिजाबाई व दादोजीपंत पुण्यास परतले अशा आशयाची माहिती सभासदाने आपल्या बखरीत दिलेली आहे. शिवाजीचे शिक्षण · क्षत्रियाच्या मुलास आवश्यक ते शिक्षण शिवाजीस स्वाभाविकपणे मिळाले. अश्वारोहण, दांडपट्टा, तलवारीचे हात, नेमबाजी इ. क्षात्रशिक्षण शिवाजीस बालपणी मिळाले. परंतु शिवाजीस लिहिण्यावाचण्याचे शिक्षण मिळाले होते का? असा एक प्रश्न अनेक इतिहासकारांनी उपस्थित केलेला आढळतो. आद्य इतिहासकार, ग्रँट डफ याने शिवाजीला अक्षरज्ञान नव्हते असे म्हटले आहे. ख्यातनाम इतिहासकार, यदुनाथ सरकार शिवाजी हा अकबर, हैदरअली, रणजित सिंह यांच्याप्रमाणे निरक्षर होता असे मत व्यक्त केलेले आहे. शिवाजीच्या हस्ताक्षराचा कागद प्रत्यक्षात सापडलेला नसला तरी शिवाजीला निरक्षर ठरविणे अन्यायकारक आहे. कारण शिवाजीला लिहितावाचता येत होते हे अप्रत्यक्षपणे सिद्ध करण्यास काही समकालीन पुरावेसुद्धा सापडतात. फॅक्टरी रेकॉर्डमध्ये शिवाजीला अक्षरज्ञान चांगले होते याविषयी खात्री देणारे पुरावे आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजीचे वडील शहाजी आणि पुत्र संभाजी हे दोघेही संस्कृत भाषेचे जाणकार होते. स्वतः शिवाजी महाराजांनी ‘राज्यव्यवहार कोश’, ‘करण कौस्तुभ’ यासारखे संस्कृत ग्रंथ विद्वानांकडून लिहून घेतले. शिवभारतकार परमानंद हा तर प्रत्यक्ष शिवाजीच्या दरबारात होता. या साऱ्या पार्श्वभूमीवर शिवाजीला निरक्षर ठरविणे हे निश्चितपणे अन्यायकारक आहे. शिवभारतामध्ये शिवाजी लिपीग्रहणयोग्य वयाचा झाल्यावर शहाजीने त्याला गुरूंच्या स्वाधीन केले असा उल्लेख आलेला आहे. शिवभारतातील नवव्या अध्यायातील शिवरायाचा उदय १७