छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 30, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंशिवाजीने सोनोपंत वकीलास औरंगजेबाचे अभिनंदन करण्यासाठी दिल्लीस पाठविले. औरंगजेबाने जुलै १६५९ मध्ये शिवाजीला मानाची वस्त्रे पाठविली. अशाप्रकारे शिवाजी आणि औरंगजेब यांच्यामध्ये वरकरणी सलोखा निर्माण झाला. परंतु शिवाजीने आपले आक्रमणाचे धोरण कायम ठेवून कोकणातील कल्याण-भिवंडीपर्यंतचा प्रदेश वर्चस्वाखाली आणला. तसेच माहुली व इतर काही किल्ले ताब्यात घेतले. शिवाजीचा दरारा वाढला कोकणामध्ये शिवाजीची घोडदौड चालू असताना आदिलशहाने कुडाळ येथील देसाई लखम सावंत याची बंडखोरी मोडून काढण्यासाठी रुस्तुमजमा नावाच्या सरदारास पाठविले. लखम सावंताने निकराचा प्रतिकार करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न केला. परंतु रुस्तुमजमाने सर्वत्र नाकेबंदी केल्याने लखम सावंताची परिस्थिती अधिकच बिकट झाली. या संकटाला तोंड देण्यासाठी त्याने ५ मार्च १६५९ रोजी शिवाजीशी तह केला आणि त्याचे मांडलिकत्व पत्करले. लखम सावंताला मदत करून शिवाजीने रुस्तुमजमापासून त्याचे रक्षण केले. कोकणातील शिवाजीचे वाढते वर्चस्व पाहून आदिलशहाच्या दरबारात खळबळ निर्माण झाली. शेवटी शिवाजीचा बंदोबस्तासाठी अफजलखान यास पाठविण्याचे विजापूर दरबारने निश्चित केले. अफझल प्रसंग विजापूर दरबारने अफझलखानाची शिवाजीवर हेतुपुरस्सर नेमणूक केली. त्याकाळात आदिलशहाच्या दरबारात जे काही मोजके नामवंत सरदार होते त्यामध्ये अफझलखानाचा क्रमांक वरचा होता. शिवाय अफझलखान हा प्रथमपासून शिवाजीचा द्वेष करीत होता. जावळीवर शिवाजीने वर्चस्व निर्माण केले ही गोष्ट खानाला अजिबात आवडली नाही. खान शिवाजीचाच नव्हे तर शहाजीचाही द्वेष करीत असे. शहाजीला कर्नाटकातून पायात बेड्या घालून विजापूरच्या दरबारात आणण्यामध्ये खानानेच पुढाकार घेतला होता. कर्नाटकात कनकगिरीच्या लढाईत शिवाजीचा भाऊ संभाजी हा मारला गेला, या घटनेलाही खानाची कारवाई कारणीभूत होती. अशाप्रकारे खान हा भोसले घराण्याचाच वैरी होता. म्हणूनच शिवाजीला पकडण्याचा विडा त्याने विजापूरच्या दरबारात उचलला. सभासदाने आपल्या बखरीत खानाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे, “शिवाजी काय, चढे घोडियानिशी जिवंत कैद करून घेऊन येतो.” ‘तारिखे २४ छत्रपती शिवाजी महाराज