छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 29, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंथेट समुद्रापर्यंत जाऊन भिडली. त्यामुळे पश्चिमकिनाऱ्यावर सत्ता गाजविणाऱ्या जंजिऱ्याचे सिद्दी आणि गोव्याचे पोर्तुगीज यांनाही शिवाजीच्या सामर्थ्याचा धाक वाटू लागला. इंग्रज, फ्रेंच आणि डच या पाश्चात्य व्यापाऱ्यांच्या वखारीही पश्चिम किनाऱ्यावरील मोक्याच्या बंदरातून होत्या. हे पाश्चात्य व्यापारी शिवाजीचे वाढते सामर्थ्य पाहून सावध झाले. अशाप्रकारे जावळी विजयामुळे शिवाजीचा दरारा महाराष्ट्राच्या देश आणि कोकण या दोन्ही भागात निर्माण झाला. शत्रूला आपल्या पराक्रमाने आश्चर्यचकीत करून त्यांना नामोहरम करावयाचे आणि जोपर्यंत तो बेसावध आहे तोपर्यंत त्याच्या प्रदेशात जास्तीत जास्त घुसखोरी करावयाची हे शिवाजीच्या डावपेचाचे मुख्य सूत्र होते. त्या सूत्राप्रमाणे जावळी ताब्यात आल्यावर फार वेळ न दवडता ९ सप्टेंबर १६५६ रोजी संभाजी मोहिते यांचेकडून शिवाजीने वडिलोपार्जित सुपे परगणा ताब्यात घेतला. त्यामुळे आदिलशहाप्रमाणे मुघल सत्ताधिशालाही शिवाजीची दहशत वाटू लागली. शिवाजी एकामागून एक नेत्रदिपक विजय मिळवत होता. या काळात विजापूरचा सुलतान महंमद आदिलशहा हा असाध्य रोगाने आजारी होता. विजापूरच्या दरबारात बचबचपूरी माजली होती. या संधीचा जास्तीत जास्त फायदा घेऊन शिवाजीने कर्नाटक प्रदेशात आक्रमण सुरु केले. नोव्हेंबर १६५६ मध्ये महंमद आदिलशहा मृत्यू पावला त्यावेळी शिवाजी कर्नाटक स्वारीवर होता. विजापूरच्या नव्या सुलतानाने अली आदिलशहाने शिवाजीच्या हालचालींना कर्नाटकात पायबंद घालण्याचा प्रयत्न केला. तरीपण १६५९ पर्यंत शिवाजीने कर्नाटकावर लहानमोठ्या स्वाऱ्या केल्या या सुमारास दिल्लीचा बादशहा शहाजहान यांचा मुलगा औरंगजेब हा दक्षिणेचा सुभेदार होता. शिवाजीचा आणि त्याचा प्रत्यक्ष संघर्ष झाला नाही. पण ज्यावेळी औरंगजेबाने बिदर आणि कल्याणी या आदिलशाही प्रदेशावर हल्ले केले त्यावेळी जुन्नर या मुघलांच्या महत्त्वाच्या केंद्रावर हल्ला करुन शिवाजीने औरंगजेबाला चकीत केले. शिवाजी वाढते वर्चस्व महागात पडेल हे लक्षात घेऊन औरंगजेबाने शिवाजी विरुद्ध सरदार पाठविले. त्याचबरोबर विजापूरच्या आदिलशहाला शिवाजीच्या हालचालींना पायबंद घालण्याचा इशारा त्याने दिला. अशा परिस्थितीत औरंगजेबालाच शिवाजीबरोबर वरकरणी सलोखा प्रस्थापित करावा लागला. कारण शहाजहान बादशहा आजारी असल्याची वार्ता कळल्यावर औरंगजेबाने आपले दक्षिणेतील राजकारण तात्पुरते स्थगीत केले आणि दिल्लीकडे प्रयाण केले. दिल्लीला येताच कुटील डावपेच खेळून शहाजहान बादशहाला त्याने नजरकैदेत ठेवले आणि ५ जून १६५९ रोजी स्वतःला मुघल बादशहा म्हणून जाहीर करून घेतले. स्वराज्याचा विस्तार २३