छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 28, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंजावळी प्रदेशावर एकाचवेळी चारी बाजूने हल्ला करण्याची योजना शिवाजीने आखली. त्यासाठी बांदल, सिलिंबकर देशमुख आणि संभाजी कावजी हा महालकरी यांची नेमणूक शिवाजीने केली. ठरल्याप्रमाणे शिवाजीच्या मावळ्यांनी एकाचवेळी चारी बाजूंनी जावळी प्रदेशावर हल्ला केला. यशवंतराव मोरे आपली दोन मुले बाजी व कृष्णाजी यांच्यासह रायगडकडे पळून गेला. जानेवारी १६५६ मध्ये शिवाजीने जावळीचा मुलूख ताब्यात घेतला. शिवाजीचे सैन्य यशवंतरावाचा पाठलाग करीत रायगडापर्यंत गेले. मोऱ्यांनी हा किल्ला ३ महिने लढविला, पण शेवटी शिवाजीला शरण गेला आणि रायगडचा किल्ला त्याने मे इ.स.१६५६ मध्ये शिवाजीच्या ताब्यात दिला. जावळीच्या मोऱ्यांचे प्रकरण येथेच थांबावयास हवे होते. परंतु यशवंतरावाने शिवाजीविरुद्ध कारवाया चालू ठेवल्या. त्याचा राग येऊन शिवाजीने २७ ऑगस्ट इ.स.१६५६ रोजी यशवंतरावास ठार मारले आणि जावळी खोऱ्यावर आपले संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले. जावळी विजयामुळे शिवाजीच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रदेशाचा मोठा विस्तार झाला. जावळीवर विजय मिळवून कोंडेनळीचा घाट, ढवळा घाट, सापळखिंड, हातलोटचा घाट, पार घाट इ. महत्त्वाच्या घाटांवर आणि खिंडीवर शिवाजीने प्रभुत्व संपादन केले. याशिवाय रायगडसारखा बुलंद किल्ला शिवाजीच्या ताब्यात आला. केवळ प्रदेश जिंकून घेणे आणि सत्ता वाढविणे एवढेच शिवाजीचे धोरण नव्हते. आपल्या स्वामित्वाखाली आलेल्या नव्या प्रदेशातील लोकांचा विश्वास संपादन करणे आणि त्यांच्या कल्याणासाठी प्रयत्नशील राहाणे हाही शिवाजीचा उदात्त हेतू होता. सभासदाने आपल्या बखरीत म्हटले आहे की, 'जावळी सर केली. मावळे लोकांस कौल देऊन संचणी केली. प्रतापगड म्हणून नवाच वसविला.' या प्रतापगडावर शिवाजीने तुळजा भवानीचे मंदिर बांधले. जावळीचा विजय हा शिवाजीच्या आयुष्यातील मोठा विजय म्हणावा लागेल. कारण या विजयामुळे शिवाजीच्या मूळ लहान जहागिरीचा मोठा विस्तार झाला आणि स्वतंत्र राज्य स्थापनास अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली. या विजयामुळे शिवाजीचा आत्मविश्वास वाढला. जुलमी आणि उन्मत्त जहागिरदारांवर वचक निर्माण झाला. त्याचप्रमाणे शिवाजीस आपली ताकद आजमाविता आली. आदिलशहालाही शिवाजीचे वाढते बळ पाहून मोठी चिंता वाटू लागली. विशेष म्हणजे जावळीचा प्रदेश ताब्यात आल्यामुळे घाटमाथ्याप्रमाणे कोकणपट्टीचा काही प्रदेश शिवाजीच्या राज्यात समाविष्ट झाला आणि त्याच्या राज्याची हद्द २२ छत्रपती शिवाजी महाराज