छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 43, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंनुकसान सुमारे २०,००० रुपये झाले. तर इंग्रज कंपनीचे नुकसान केवळ १००० पौंड झाले. हे आकडे लक्षात घेतल्यास परकीय वखारवाल्यांनी शिवाजीने केलेल्या लुटीचा वृत्तांत देतांना किती कांगावा केला होता हे लक्षात येते. चार दिवस शहरामध्ये मुक्काम ठोकून १० जानेवारी १६६४ रोजी शिवाजी स्वराज्याकडे परतला. परत जातांना त्यांनी लूट समुद्रमार्गे नेली असा उल्लेख पोर्तुगीज दप्तरात सापडतो. शिवाजीच्या स्वारीच्या संदर्भात वखारवाल्यांनी बराच मनोरंजक मजकूर लिहून ठेवला आहे. शिवाजीच्या लष्करी तळाविषयी डचांनी लिहीले आहे की, “शिवाजी सुरतेबाहेर दोन कोसांवर उतरला होता. त्याचाच फक्त शामियाना होता. इतर सर्व अधिकारी उघड्यावर रहात होते.” शिवाजीची छावणी अत्यंत सुटसुटीत व तात्पुरती असून लष्करातील लोकांपेक्षाही मजूर, बैल आणि रिकामे घोडे यांचा भरणा अधिक आहे अशी नोंद डचांनी केलेली आढळते. शिवाजीने सुरतेची लूट केली त्यावेळी औरंगजेब दिल्लीला नव्हता हे या ठिकाणी लक्षात घेणे आवश्यक आहे. सुरतेच्या लुटीचे परिणाम औरंगजेब ज्यावेळी दिल्लीला परतला त्यावेळी त्याला सुरतेच्या लुटीची हकिकत समजली. सुरतेवर आपली सत्ता असतांना शिवाजीने आपले शहर लुटावे आणि आपल्या आश्रयाने रहाणाऱ्या पाश्चात्त्य वखारवाल्यांना उपद्रव द्यावा याचा विलक्षण संताप औरंगजेबाला झाला. सुरत शहराला तटबंदी बांधण्याचा त्याने हुकूम दिला. पाश्चात्य व्यापारांना एक वर्षाची जकात औरंगजेबाने माफ केली. शिवाय पुढील वर्षापासून अडीच टक्के जकाती ऐवजी दोन टक्के, जकात घेतली जाईल असा हुकूमही त्याने काढला. इंग्रज वखारवाल्यांनी तर शिवाजीची फार मोठी दहशत घेतली. आपली मुख्य व्यापारी पेठ सुरतेहून मुंबईला हलविण्याचा त्यांनी निर्णय घेतला. १६६४ मध्येच पोर्तुगीजांकडून मुंबई बेट इंग्रजांना मिळाले होते. मुंबईला कचेरी हलविल्यानंतर शिवाजीकडून आपल्याला संरक्षण मिळेल असा इंग्रजांचा कयास होता. शिवाजीने अलौकिक साहस करून शिघ्र गतीने सुरतेवर हल्ला केला, लूट केली आणि तितक्याच शीघ्र गतीने तो स्वराज्याला परतला. या घटनेचा पाश्चात्य वखारीतील सर्वसामान्य कामगारावरही मोठा परिणाम झाला. शिवाजीविषयी अनेक वावड्या उठू लागल्या. ‘शिवाजीचे शरीर हवामय असून त्याला पंखही आहेत’ असा अद्भूत उल्लेख एका पत्रात आलेला आढळतो. थोडक्यात मुघल प्रदेशात सर्वसामान्य बलाढ्य शत्रूवर मात ३७