छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 47, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंबोलणी करून त्याने शिवाजीच्या प्रदेशावर मोहीम काढली. ३ मार्च १६६५ रोजी तो पुण्यात येऊन दाखल झाला. जयसिंगाचे राजकारण दिल्लीहून निघण्यापूर्वी जयसिंगाने औरंगजेबाकडून ३ अटी मान्य करून घेतल्या होत्या. एक म्हणजे मोहिमेला लागेल तेवढा पैसा दक्षिणेच्या सुभ्यातून खर्च करण्याचा अधिकार त्याने मागून घेतला होता. दक्षिणेतील मुघल किल्लेदारांना जयसिंगाचे हुकूम मानले पाहिजेत ही अटही त्याने मान्य करून घेतली होती. जयसिंगाची तिसरी मागणी म्हणजे मुघल फौजेतील अधिकाऱ्यांना रजा देण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकारही त्याने मान्य करून घेतला होता. या ३ मागण्यांचा अर्थ असा की दक्षिणेच्या मोहिमेचे संपूर्ण सूत्रसंचालन जयसिंगाच्याच ताब्यात राहणार होते. पुण्यात आल्यानंतर जयसिंगाने आपल्या मोहिमेची पद्धतशीर आखणी केली. पहिली गोष्ट म्हणजे शिवाजीच्या प्रदेशाच्या भौगोलिक सीमा, डोंगर- दऱ्या, किल्ले यांची त्याने बारकाईने माहिती जमा केली. त्यानंतर शिवाजीचे शत्रू आपल्या गोटात आणण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केले. जावळीचे मोरे आणि जव्हारचे राजे हे शिवाजीचे शत्रू होते. त्यांच्याशी जयसिंगाने सख्य जोडले. पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांनी शिवाजीला कसल्याही प्रकारचे सहकार्य करू नये म्हणून त्याने दबाव आणला. आदिलशहा शिवाजीला आतून मदत करील याची शक्यता वाटल्यामुळे काही अफगाणांना व्यापाऱ्यांच्या वेशामध्ये त्याने विजापूरला पाठविले आणि आदिलशहाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम त्यांच्याकडे सोपविले. अशाप्रकारे राजकीय डावपेच पूर्ण केल्यानंतर जयसिंगाने आपली ठाणी मजबूत करण्यावर भर दिला. वास्तविक पाहता शिवाजीचे स्वराज्य आकाराने अत्यंत लहान होते. पुणे, कोल्हापूर, सातारा आणि कुलाबा या जिल्ह्यांतील काही परगणेच शिवाजीच्या ताब्यात होते. जे परगणे ताब्यात होते त्या प्रदेशातील सर्व किल्लेही शिवाजीच्या ताब्यात नव्हते. तेव्हा अशा या लहान प्रदेशाची नाकेबंदी करणे जयसिंगाला मूळीच अशक्यप्राय नव्हते. 'चहुबाजूंनी कडेकोट नाकेबंदी' (Strict Blockade System) या डावपेचाचा उपयोग करून शिवाजीला कोंडीत पकडावयाचे अशी व्यूहरचना त्याने केली. काही निवडक तुकड्या शिवाजीच्या महत्त्वाच्या किल्ल्याकडे पाठवून त्या किल्ल्यांना वेढे घालण्याची व्यवस्था केली. महत्त्वाच्या किल्ल्यांची नाकेबंदी केल्यावर त्याने तेहळणीसाठी महत्त्वाच्या घाटावर आणि घाटाखाली खडी फौज जयसिंगाची स्वारी ४१