छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 46, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ें६. जयसिंगाची स्वारी जयसिंगाची स्वारी शिवाजीचे वाढते सामर्थ्य पाहून दिल्ली दरबारात मोठी खळबळ माजली होती. विशेषतः आपला मामा शायिस्तेखान याला शिवाजीने अवमानीत केले, मुघल फौजेचा पराभव केला या गोष्टीचा औरंगजेबाला अतिशय संताप आलेला होता. त्यातच जसवंतसिंगही पराभूत होऊन परतला होता. शिवाजीचा बंदोबस्त कसा करावा या विचाराने औरंगजेब उद्विग्न झालेला असतानाच शिवाजीने सुरत शहर लुटल्याची बातमी त्याला कळली. त्यामुळे तर त्याच्या संतापात अधिकच भर पडली. शाहजादा मुअज्जमला दक्षिणेचा सुभेदार म्हणून पाठविले होते. परंतु औरंगाबादला जाऊन तो स्वस्थ बसून राहिला तेव्हा शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी पराक्रमी आणि तोलामोलाचा सरदार पाठवावा लागेल याची औरंगजेबाला खात्री पटली आणि म्हणून आपल्या दरबारातील ज्येष्ठ सरदार मिर्झाराजे जयसिंग याची औरंगजेबाने शिवाजीविरुद्ध नेमणूक केली. जयसिंगाबरोबर दिलेरखान या पठाण सरदारालाही पाठविण्याचे औरंगजेबाने ठरविले. जयसिंगावर वचक असावा हा त्यामागील हेतू होता. याशिवाय दाऊदखान, कुतुबऊद्दीन, सुजनसिंग, रामसिंग इ. अनेक लहानमोठे सरदार जयसिंगाच्या मोहिमेत सामिल झाले. मुघल दरबारात निकोलाय मनुची हा इटालियन तोफखान्याचा अधिकारी होता. त्यालाही जयसिंगाबरोबर दक्षिणेच्या स्वारीवर जाण्याची औरंगजेबाने आज्ञा केली. स्वतः मिर्झाराजे जयसिंग पराक्रमी सरदार आणि कुशल सेनानी म्हणून प्रसिद्ध होता. आतापर्यंत त्याने काढलेल्या मोहिमांमध्ये त्याला कोठेही अपयश आले नव्हते. त्याने स्वारीची कडेकोट तयारी केली. प्रचंड मोठे सैन्य, तोलामोलाचे सरदार, तोफखाना अशा तयारीनिशी जयसिंग दक्षिणेच्या स्वारीवर निघाला. ९ जानेवारी १६६५ रोजी जयसिंगाने नर्मदा नदी ओलांडली आणि १० फेब्रुवारी रोजी तो औरंगाबादला पोहचला. शाहजादा मुअज्जम याच्याबरोबर ४०