भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 56, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 56

ठेवावे आणि त्याच्या निवासस्थानाभोवती कडक पहारा ठेवावा. शिवाजी पुन्हा औरंगजेबाच्या दरबारात पाऊल टाकणे शक्य नव्हते. तथापि रामसिंगाने संभाजीला घेऊन दरबारात जाण्याचे ठरविले. १४ मे रोजी रामसिंगाबरोबर संभाजी बादशहाच्या दरबारात गेला तेव्हा रत्नजडीत कट्यार, मोत्याचा कंठा आणि पोषाख देऊन औरंगजेबाने त्याचा सन्मान केला. वरकरणी हे नाटक करीत असताना शिवाजीला ठार मारण्याचा कटही औरंगजेबाने रचला होता. शिवाजीच्या पहाऱ्यावर असलेल्या फुलादखानाला 'गुप्तपणे शिवाजीस मारून टाका' असा इशारा बादशहाने दिला होता. शाही दरबारातील आप्तस्वकीयांकडून आणि ज्येष्ठ सरदारांकडून शिवाजीला ठार मारावे असा आग्रह औरंगजेबाकडे चालू होता. शायिस्तेखानाची पत्नी म्हणजे औरंगजेबाची मामी जहान आरा बेगम, जाफरखान, मूर्तजाखान इ. सरदारही शिवाजीचा निकाल लावावा असे औरंगजेबाला आग्रहाने सांगत होते. या साऱ्या गोष्टीचा कानोसा लागल्यावर रामसिंग अत्यंत संतप्त झाला. शिवाजीच्या केसाला जरी धक्का लागला तरी आपण तो सहन करणार नाही असे रामसिंगाने जाहीर केले आणि शिवाजीच्या रक्षणासाठी आपली प्रतिष्ठा त्याने पणास लावली. औरंगजेबाला शिवाजीचे पुढे काय करावे हे समजेनासे झाले. एक तर शाही दरबारातील ज्येष्ठ सरदार आणि जहान आरा बेगम शिवाजीला कडक शिक्षा द्यावी यासाठी औरंगजेबाकडे आग्रह करीत होते. दक्षिणेत खुद्द मिर्झाराजे जयसिंग शिवाजी आग्र्याला नजरकैदेत असल्याचे समजल्यापासून अत्यंत अस्वस्थ झाला होता. त्यातच औरंगजेबाच्या मनात असा विचार आला होता की, शिवाजीला कैदेत ठेवून आपण स्वतः दक्षिणेची स्वारी करावी आणि शिवाजीचा सर्व प्रदेश जिंकून घ्यावा. पण हा बेत ज्यावेळी जयसिंगाला समजला तेव्हा त्याने प्रखर विरोध केला. त्याने औरंगजेबास कळविले की, 'शिवाजीला कैदेत ठेवून आपण दक्षिणेत स्वारी काढली तर येथील मराठे बिथरतील आणि मग आपला हेतू तर साध्य होणार नाहीच पण नामुष्की पदरात येईल.' जयसिंगाकडून हा इशारा मिळाल्यानंतर औरंगजेबाने स्वारीचा बेत सोडून दिला. जसे दिवस जातील तसे त्याची अस्वस्थता वाढू लागली. शिवाजीला खुश करून त्याचे मन रमवावे म्हणून औरंगजेबाने मोठी मनसब देण्याचे आमिष दाखविले. परंतु स्वाभिमानी शिवाजीने मनसबीचे आमिष झुगारून दिले. त्यामुळे औरंगजेब अधिकच संतप्त झाला. शिवाजीला काबूलच्या मोहिमेवर पाठवून तिकडेच त्याचा निकाल लावावा असा एक अफलातून विचार औरंगजेबाच्या डोक्यात आला. परंतु जयसिंग त्यामुळे अतिशय बिथरून जाईल आणि ५० छत्रपती शिवाजी महाराज