छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 57, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंदक्षिणेतील मराठे सूड उगविल्याशिवाय राहणार नाहीत असे वाटल्यामुळे त्याने तो अफलातून विचार सोडून दिला. नेमके काय करावे हे त्याला नक्की समजेना. त्याने एकच गोष्ट केली. ती म्हणजे शिवाजीभोवतीचा पहारा जास्त कडक केला. शिवाजीही कैदेमध्ये अत्यंत बेचैन अवस्थेत होता. आपल्यामुळे रामसिंगाची परिस्थिती अवघड झाली आहे याची खंत त्याला वाटत होती. कारण औरंगजेबाने शिवाजीचा जामीन म्हणून रामसिंगाला मुक्रर केले होते. रामसिंगाची अवस्था अधिक अवघड होऊ नये म्हणून त्याची जामीनकी काढून घ्यावी असा प्रस्ताव शिवाजीने औरंगजेबापुढे मांडला पण त्याची प्रतिक्रिया भलतीच झाली. औरंगजेबाने जामीनकी तर काढून घेतली नाहीच उलट रामसिंगाचाच आणखी एक पहारा शिवाजीभोवती बसविला. आपल्याबरोबर दक्षिणेतून जी मंडळी आली आहे ती विनाकारण आपल्याबरोबर उत्तरेत अडकून पडली आहे याची खंतही शिवाजीला वाटत होती. म्हणून आपल्याबरोबर आलेल्या मंडळींना दक्षिणेकडे जाण्यासाठी परवानगी द्यावी असा आणखी एक प्रस्ताव शिवाजीने मांडला. तो मात्र औरंगजेबाने तातडीने मान्य केला आणि शिवाजीबरोबर आलेल्या लोकांना दक्षिणेत जाण्यासंबंधी परवाने देण्याबद्दल त्याने हुकूम काढला. शिवाजीचे अलौकिक साहस शिवाजीबरोबर आलेली बरीच मंडळी बादशहाकडून परवाने मिळताच दक्षिणेकडे परतू लागली. त्यामुळे शिवाजीला हायसे वाटले. संभाजी आणि काही निवडक लोक आपल्याजवळ राहतील असा त्याचा मनोदय होता. निवासस्थानाभोवतीचा पहारा तर कडक होताच, बाहेर कोठेही जाण्यास मज्जाव होता आणि पहारा कडक असल्यामुळे कोणाशीही संपर्क साधणे शिवाजीला शक्य नव्हते. अशा या बिकट परिस्थितीमध्ये एक विलक्षण साहस करण्याचा शिवाजीने बेत रचला. येथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे अलौकिक साहस करताना शिवाजी आपल्या नियोजित कृतीबाबत बारीकसारीक तपशील निश्चित करीत असावा. या कृतीचे परिणाम काय होतील याचाही तो बारकाईने विचार करीत असावा. एखादे लोकविलक्षण साहस करायचे असेल तर त्याचे नियोजन तो स्वतः पूर्ण विचाराअंती सूत्रबद्ध करीत असे. अफझलप्रसंग, शाहिस्तेखानप्रसंग, पन्हाळ्यातून सुटका, कारतलबखानाचे युद्ध या सर्व घटना बारकाईने पाहिल्यास शिवाजीचे लोकविलक्षण साहस सूत्रबद्ध नियोजनावरच आधारलेले होते हे समजून येते. शिवाजी आणि औरंगजेब ५१