भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 58, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 58

आग्याला निवासस्थानाभोवतीचा पहारा अधिक कडक होत असलेला पाहून त्यामध्ये ढिलाई कशी आणता येईल याचा विचार शिवाजीने सुरू केला. आपण आजारी असल्याचा बहाणा त्याने केला. हकिमाकडे जाऊन औषध आणण्याची जबाबदारी त्याने हिरोजी फर्जंदवर सोपविली. मदारी मेहतर या एकनिष्ठ सेवकास पाय रगडण्यासाठी ठेवले. शिवाजीची बतावणी पाहून पहारेकऱ्यांना शिवाजी खरोखरीच आजारी आहे असे वाटू लागले. आपली बतावणी यशस्वी होत आहे हे पाहून शिवाजीने आणखी एक युक्ती योजली. आपल्याला साधूसंतांचे व फकीरांचे आशिर्वाद मिळावेत म्हणून मिठाईचे पेटारे पाठविण्याचे ठरविले. सुरुवातीला काही दिवस पहारेकरी हे पेटारे तपासून पाहत असत. पण पुढे पुढे कडक तपासणी करण्याचे त्यांनी सोडून दिले. अशा प्रकारे पहाऱ्यांमध्ये क्रमाक्रमाने ढिलाई प्राप्त झाली. या संधीचा फायदा घेऊन एकेदिवशी शिवाजीने संभाजीसह पलायन केले. पेटार्याची कथा शिवाजीने औरंगजेबाच्या कैदेतून कशी सुटका करून घेतली हे स्पष्ट करणारा नेमका पुरावा अद्यापही उपलब्ध झालेला नाही. जेधे शकावलीमध्ये अशी नोंद आहे की ‘श्रावण वद्य द्वादशी शके १५८८ या दिवशी आग्यातून महाराज पेटारीयात बैसोन पळाले.’ म्हणजे १९ ऑगस्ट १६६६ रोजी मिठाईच्या पेटार्‍यात बसून शिवाजी आणि संभाजी पळाले असा अर्थ होतो. बहुतेक इतिहासकार शिवाजी महाराजांनी मिठाईच्या पेटार्‍यात बसूनच सुटका करून घेतली असे मानतात. समकालीन साधनांमध्ये ही याच आशयाचे पुरावे मिळतात. समकालीन पाश्चात्य प्रवासी थेवेनॉट याने आपल्या वृत्तांतामध्ये शिवाजी टोपलीत बसून पळून गेला असा उल्लेख केला आहे. भिमसेन सक्सेना या दरबारी लेखकाने ‘मिठाईच्या पेटार्‍यातूनच शिवाजी व संभाजी निसटले’ असे लिहून ठेवले आहे. वखारवाल्यांच्या कागदपत्रांतूनही शिवाजी पेटार्‍यातून निसटला अशा आशयाचे उल्लेख आलेले आहेत. मराठी बखरीमध्ये पेटार्‍यांचीच कथा रंगतदार करून सांगितलेली आढळते. फारसी तवारिखकार खाफीखान याने शिवाजी व त्याचा मुलगा दोघेही टोपल्यात बसून निसटून गेले असे लिहून ठेवलेले आढळते. या सर्व समकालीन साधनांचा मतितार्थ हाच की कैदेतून पळून जाण्यासाठी शिवाजीने मिठाईच्या पेटार्‍याचा उपयोग केला. पण या अनुमानाला दोन मोठे अपवाद आहेत. ‘मासिरे आलमगिरी’ या ग्रंथाचा कर्ता साकी मुस्तैदखान हा लिहितो की, ‘आजारी पडण्याचा बहाणा करून ५२ छत्रपती शिवाजी महाराज