छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 67, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंकिल्ला म्हणजे पुरंदर होय. हा किल्ला ज्याच्या ताब्यात असेल त्याला पुणे शहराची, विशेषतः स्वराज्याची नाकेबंदी करता येणे सहज शक्य होते. त्यामुळे सिंहगड पाठोपाठ पुरंदरचा किल्ला ताब्यात घेण्याचे शिवाजीने ठरविले. शिवाजीने निळोपंतांना पुरंदरचा किल्ला जिंकण्यास पाठविले. ८ मार्च १६७० रोजी निळोपंतांनी हा किल्ला जिंकून घेतला. अशा प्रकारे शिवाजीने अवघ्या दोन महिन्यात दोन महत्त्वाचे किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची झोप उडाली. हे किल्ले जिंकण्यापूर्वीच वऱ्हाड प्रदेशात जानेवारी १६७० मध्ये मराठ्यांनी धुमाकूळ घातला होता आणि त्यानंतर जुन्नर-नगर पासून थेट औरंगाबादपर्यंत आणि तेथून मराठवाड्यात परिंडा-औसा पर्यंत आक्रमण करून मराठ्यांनी मुघलांची दाणादाण केली. पुरंदरच्या तहाप्रमाणे जे २३ किल्ले मुघलांना देण्यात आले होते ते एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा मराठ्यांनी सपाटा सुरू केला. ३ मे १६७० रोजी लोहगड जिंकून घेतला, तर १६ जून रोजी माहुली जिंकून घेतला. त्यानंतर एकाच आठवड्यात २२ जून रोजी कर्नाळा आणि २४ जून रोजी रोहिडा हे दोन महत्त्वाचे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले. अशा प्रकारे १६७०च्या पावसाळ्यापर्यंत पराक्रमाची शर्थ करून मराठ्यांनी पुरंदरच्या तहाचा कलंक धुवून काढला. केवळ किल्ले जिंकून मराठे थांबले नाहीत, तर मुघलांच्या ताब्यात गेलेली महत्त्वाची ठाणीही त्याने एकापाठोपाठ एक जिंकून घेण्याचा उद्योग सुरू केला. कल्याण हे कोकणातील महत्त्वाचे ठाणे मराठ्यांनी जिंकून घेतले. अशाप्रकारे शिवाजीचे हे आक्रमक धोरण पाहून औरंगजेबाला शिवाजीविरुद्ध काहीतरी जालीम राजकारण केले पाहिजे असे वाटू लागल्यास नवल नाही. आदिलशहाला आणि किनारपट्टीवर असलेल्या पाश्चात्य वखारवाल्यांना आपल्या बाजूस वळवून शिवाजीविरुद्ध डावपेच लढविण्यास त्याने सुरुवात केली. त्यानुसार त्याने पाश्चात्य वखारवाल्यांना आणि आदिलशहा यांना फर्माने पाठविली परंतु हे सर्व होईपर्यंत पावसाळा सुरू झाला. मराठ्यांनी आपले चढाईचे राजकारण स्थगित केले आणि पावसाळ्याच्या दिवसात शिवाजीविरुद्ध हालचाली करणे धोकादायक आहे हे मुघलांना माहित असल्यामुळे तेही स्वस्थ बसले. सुरतेची दुसरी लूट १६७०चा पावसाळा थांबला आणि शिवाजीने लगेच पुन्हा चढाईचे राजकारण सुरू केले. मुघलांना नामोहरम करण्यासाठी अचानकपणे सुरतेवर छापा घालण्याचे त्याने ठरविले. या सुरतेच्या स्वारीपाठीमागे शिवाजीचे प्रमुख दोन उद्देश होते. एक म्हणजे सुरतेवर स्वारी केल्यामुळे औरंगजेबाला जबरदस्त चढाईचे राजकारण ६१