छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 69, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंलुटली. खानदेशाचा मुघल सुभेदार दाऊदखान याला ती बातमी कळल्यानंतर तो मोठ्या तयारीनिशी बऱ्हाणपूराकडे निघाला. परंतु मराठ्यांचा वेग एवढा मोठा होता की बहादूरपूरा लुटून अतिशय शिघ्र गतीने ते बागलाणपर्यंत पोहचले याचा अर्थ दाऊदखान बऱ्हाणपूरपर्यंत पोहचण्याअगोदरच त्याला झुकांडी देऊन मराठे खानदेश सुभ्यामध्ये घुसले आणि बागलाणमधील मुल्हेर किल्ल्याजवळची पेठ त्यांनी लुटली. ही बातमी कळल्यावर दाऊदखान अधिकच चवताळला आणि मोठ्या शिघ्र गतीने तो बागलाणकडे परतला. परंतु दरम्यान ५ जानेवारी १६७१ रोजी मराठ्यांनी मुल्हेरचा किल्ला जिंकून घेतला. या सगळ्या बातम्या समजल्यामुळे औरंगजेब अतिशय बेचैन झालेला होता. शिवाजीचा पुढचा बंदोबस्त करण्यासाठी महाबतखान नावाच्या पराक्रमी सरदारास त्याने दक्षिणेच्या मोहिमेवर पाठविले. महाबतखानाची मोहीम जानेवारी १६७१ मध्ये बऱ्हाणपूर ओलांडून महाबतखान दक्षिणेत आला. औरंगाबादकडे जाताना खानदेशचा सुभेदार दाऊदखान याच्या बरोबर मोहिमेच्या आखणीबाबत त्याने चर्चा केली. नंतर औरंगाबादेत जाऊन शाहजादा मुअज्जम याला तो भेटला. आपल्या मोहिमेमध्ये बागलाण प्रदेशावर प्रथम वर्चस्व निर्माण करण्याचे धोरण त्याने आखले. त्याच्याबरोबर नव्या दमाचे सैन्य होते. त्याचप्रमाणे दिलेरखानही त्याच्या मदतीसाठी मोठे सैन्य घेऊन आला. शिवाय दाऊदखान पन्नी याचेही सैन्य त्याच्या दिमतीस होते. दाऊदखानच्या सैन्यास बागलाणमधील किल्ले लढविण्याचा अनुभव होता. अशाप्रकारे मोठी तयारी झाल्यावर महाबतखानाने वेगवेगळ्या तुकड्या बागलाणातील किल्ले जिंकून घेण्यासाठी पाठविल्या. अहिवंत, हातगड आणि मार्कंडा हे किल्ले अल्पावधीत जिंकून घेऊन मुघलांनी बागलाणमध्ये पुन्हा प्रभाव निर्माण केला. बागलाणमधील कण्हेरागड या किल्ल्याच्या पायथ्याशी मराठे व मुघल यांच्यामध्ये तुंबळ युद्ध झाले. या युद्धात रामजी पांगेरा या मराठी सरदाराने पराक्रमाची शर्थ केली. सभासद लिहितो, 'एक प्रहर टिपरी जैसी शिमग्याची दणाणते तैसे मावळे भांडिले'. त्याचा पराक्रम पाहून दिलेरखानही चकीत झाला असा उल्लेख सभासदाने आपल्या बखरीत केलेला आहे. बागलाणमधील महत्त्वाचे किल्ले ताब्यात आल्यानंतर महाबतखानाने आपल्या मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू केला. या योजनेप्रमाणे मराठ्यांना बागलाणच्या प्रदेशात गुंतवून ठेवायचे आणि दिलेरखानाने शिवाजीचे प्रमुख केंद्र असलेल्या पुणे शहरावर हल्ला करायचा चढाईचे राजकारण ६३