छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 70, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंअसे ठरविण्यात आले. त्याप्रमाणे जानेवारी १६७२ च्या सुमारास दिलेरखानाच्या फौजा पुण्याकडे मार्गक्रमण करू लागल्या. परंतु यावेळी मराठ्यांनी आत्मसंरक्षणाची कडेकोट तयारी केलेली होती आणि बागलाणमधून मुघलांना माघार घेण्यास भाग पाडण्यासाठी चौफेर हल्ले करण्याची योजना मराठ्यांनी आखली होती. प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे सैन्य बागलाणमध्ये उतरले. अटीतटीचा प्रसंग आला तर पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी बागलाणात जाऊन किल्ले जिंकण्यास मदत करावी असे ठरविण्यात आले. दरम्यान मुघलांतर्फे इखलासखान याने साल्हेरच्या किल्ल्याला वेढा घातला. यावेळी रोमहर्षक युद्ध झाले. मराठ्यांतर्फे सूर्यराव काकडे याने एवढा पराक्रम गाजविला की मुघलांना माघार घेण्याशिवाय इलाज उरला नाही. तथापि अचानकपणे तोफेचा एक गोळा सुर्यराव काकड्यास लागला आणि तो धारातिर्थी पतन पावला. परंतु मराठ्यांनी धीर सोडला नाही. ठरल्याप्रमाणे मोरोपंत पिंगळे कोकणातून प्रतापराव गुजराच्या मदतीसाठी बागलाणात आले. आणि या सर्वांनी मिळून मुघलांचा वेढा मोडून काढला. साल्हेरचा वेढा सोडून मुघलांनी माघार घेतली. फेब्रुवारी १६७२ मध्ये मुल्हेरचा किल्ला जिंकून घेऊन संपूर्ण बागलाणवर मराठ्यांनी पुन्हा पकड निर्माण केली. मराठ्यांच्या चौफेर पराक्रमाच्या वार्ता ऐकून दिलेरखानालाही पेचात सापडल्यासारखे वाटले. पुण्यापेक्षा बागलाणवरच प्रभाव निर्माण केला पाहिजे कारण तो प्रदेश आपल्या हातचा गेला तर दक्षिणेतील मुघल सत्ता धोक्यात येईल असा विचार करून दिलेरखानाने पुण्याची मोहिम सोडली आणि बागलाणकडे तो परतला. मुघलांची ही पिछेहाट झालेली पाहून औरंगजेब अत्यंत अस्वस्थ झाला आणि त्याने मुअज्जम व महाबतखान यांना उत्तरेत परत बोलाविले. दिलेरखानाबाबतही तो नाराज झाला होता. मुघल फौजेतील अनेक मराठे सरदार शिवाजीच्या आश्रयाला येऊ लागले होते. सिद्दी हिलाल, जाधवराव इत्यादी सरदार आपापल्या फौजा घेऊन शिवाजीच्या आश्रयास आले. अशाप्रकारे १६७२ च्या प्रारंभी शिवाजीने मुघलांच्याच प्रदेशात विशेषतः बागलाण भागात आपले प्रभुत्व निर्माण केले आणि बागलाणातील किल्ले जिंकून घेतल्यामुळे मुघलांची खानदेश बागलाणमार्गे पुण्याकडे होणारी आक्रमणे थोपविणे मराठ्यांना सहजशक्य झाले. छत्रसाल आणि शिवाजी शिवाजी आग्र्याहून परत आल्यानंतर त्याच्या पराक्रमाविषयी उत्तर भारतातील लोकांना मोठे कुतूहल वाटू लागले. विशेषतः रजपूतांना शिवाजीच्या धाडसी ६४ छत्रपती शिवाजी महाराज