भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 80, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 80

काही दुर्दैवी घटना राज्याभिषेकाची तयारी चालू असताना काही दुर्दैवी आणि दुःखद घटना घडल्या. २४ फेब्रुवारी १६७४ रोजी नेसरीच्या लढाईत प्रतापराव गुजर मारला गेला. शिवाजीला त्यामुळे विलक्षण दुःख झाले. आपले शब्द प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रतापरावने प्राणाची आहुती दिली हे शिवाजीच्या मनास फार लागले. या दुःखातून सावरतो न सावरतो तोच शिवाजीला आणखी एका शोककारक प्रसंगाला सामोरे जावे लागले. १६ मार्च १६७४ रोजी शिवाजीची एक पत्नी काशीबाई हिचा रायगडावर मृत्यू झाला. अशा या घटनांमुळे शिवाजीची मनःस्थिती विचलित झाली. परंतु राज्याभिषेकाचा विधी चातुर्मास सुरू होण्यापूर्वी होणे आवश्यक होते. नाहीतर पुढे ५-६ महिने अभिषेकाला मुहूर्त नव्हता. शेवटी ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६ हा दिवस राज्याभिषेकासाठी निश्चित करण्यात आला. तिथी निश्चित झाल्यावर समारंभाची तयारी जलद गतीने सुरू झाली. एप्रिल १६७४ मध्ये कर्नाटकाची स्वारी उरकून शिवाजी रायगडला परतला, त्यासुमारास राज्याभिषेकाची कडेकोट तयारी झाली होती. या भव्य दिव्य प्रसंगाला कोणतेही गालबोट लागू नये म्हणून शिवाजीने सीमेवरील सैनिकांना सावधगिरीच्या सूचना दिल्या होत्या. मे १६७४ मध्ये शिवाजीने पुन्हा एकदा चिपळूणच्या लष्करी तळाची पहाणी केली. रायगडवरील समारंभ निर्वेध पार पडण्यासाठी चिपळूणच्या लष्करी तळाकडे महत्त्वाची जबाबदारी होती. यथासांग तयारी झाल्यानंतर १९ मे १६७४ रोजी शिवाजी प्रतापगडावर गेला आणि आपली कुलदेवता तुळजाभवानी हिचे दर्शन घेऊन तिचे आशिर्वाद मागितले. तुळजादेवीला सोन्याचे छत्र विधीपूर्वक अर्पण केले. त्यानंतर २१ मे रोजी शिवाजी रायगडला परतला. राज्याभिषेकसोहळा २९ मे पासून राज्याभिषेक विधीला प्रारंभ झाला. अभिषेक होण्यापूर्वी शिवाजीचा व्रतबंध होणे आवश्यक होते. म्हणून २९ मे रोजी शुक्रवारी शिवाजीची मुंज करण्यात आली. प्रायश्चित विधी म्हणून तुलापुरुषदान करण्यात आले. डच कागदपत्रांमध्ये या तुलादानाविषयी माहिती आढळते. शिवाजीचे वजन १७,००० पगोडे म्हणजे सुमारे १६० पौंड भरले असा उल्लेख डचांनी केलेला आहे. शिवाजीची प्रथम सुवर्णतुला करण्यात आली. त्यानंतर चांदीची व तांब्याचीही तुला करण्यात आली. मौल्यवान धातूंच्या तुला संपल्यानंतर विविधप्रकारची फळे, साखर इत्यादींचीही तुला करण्यात आली. अशाप्रकारे ७४ छत्रपती शिवाजी महाराज