भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 81, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 81

हा तुलापुरुषदानविधी मोठ्या उत्साहाने पार पडला. या समारंभासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागातून सुमारे ११,००० लोक रायगडवर उपस्थित झाले होते. अशी माहिती डच रेकॉर्डमध्ये मिळते. ३० मे शनिवार रोजी शिवाजीचे समंत्रक विवाह झाले. २९ला मुंज झाल्यामुळे पूर्वीचे विवाह रद्दबातल झाले होते. त्यामुळे ३० तारखेस शिवाजीला आपल्या स्त्रियांशी पुन्हा विवाह करावे लागले. हेन्री ऑक्झिंडेन हा इंग्रज प्रतिनिधी या प्रसंगी रायगडावर हजर होता. त्याला या धार्मिक विधीचा नीटसा अर्थ न कळल्यामुळे शिवाजीने राज्याभिषेकापूर्वी काही स्त्रियांशी विवाह केले असे त्याने आपल्या रोजनिशीत लिहून ठेवलेले आढळते. त्यामुळे अनेक इतिहासकारांचाही गैरसमज झालेला होता. समंत्रक विवाहप्रसंगी पट्टराणी म्हणून शिवाजीने सोयराबाई हिला स्थान दिले. या विधीमुळे अभिषेकासाठी लागणारे सर्व हक्क शिवाजी व सोयराबाई यांना धर्मशास्त्रपद्धतीने प्राप्त झाले. ३१ मे रोजी रविवार होता. ऐन्द्रीशांतीचा मुहूर्त यादिवशी होता. त्यासाठी अग्निप्रतिष्ठा करण्यात आली. इंद्राणीची पूजा करण्यात आली आणि अनुषंगिक सर्व विधी झाल्यावर आचार्य आणि ऋत्वीज यांना सुवर्णदक्षिणा देण्यात आली. सोमवारी १ जून १६७४ रोजी ग्रहयज्ञ करण्यात आला. त्याचप्रमाणे नक्षत्रहोम हा विधीही करण्यात आला. २ जून रोजी म्हणजे मंगळवारी कोणताही मुहूर्त नसल्यामुळे कसलाही विधी यादिवशी झाला नाही. बुधवारी नक्षत्रयज्ञ करण्यात आला. ४ जूनला म्हणजे गुरुवारी रात्री नित्रृतियाग यज्ञ झाला. त्याप्रसंगी मांस, मत्स्य आणि मदिरा यांची आहुती देण्यात आली. त्यानंतर शिवाजी व सोयराबाई स्नान करून पुण्याहवाचनासाठी बसले. शुक्रवार ५ जून हा राज्याभिषेक समारंभाचा सातवा आणि मुख्य दिवस होता. राज्याभिषेकाचा मुहूर्त त्रयोदशीचा असल्यामुळे सायंकाळापासून पहाटेपर्यंत हा मंगलविधी मोठ्या थाटामाटात पार पडला. शिवाजीराजे सिंहासनावर बसले. मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये अभूतपूर्व आणि अलौकिक असा दिवस उजाडला. शिवाजी राजे झाले आणि केवळ महाराष्ट्रच नव्हे तर सारा भारतखंड धन्य झाला. या समारंभाचे वर्णन सभासदाने आपल्या बखरीत करून ठेवले आहे. “...सर्वांस नमन करून (महाराज) अभिषेकास सुवर्णचौकीवर बसले. अष्टप्रधान व थोर थोर ब्राह्मणांनी स्थळोस्थळीची उदके घेऊन सुवर्णकलशपात्री अभिषेक केला. दिव्य वस्त्रे, दिव्य अलंकार घेऊन, सर्व पूज्य मंडळींस नमस्कार करून सिंहासनावर बसले. या युगी सर्व पृथीवर म्लेंच्छ बादशाह मन्हाटा शिवराज्याभिषेक ७५