छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 82, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंपातशाह येवढा छत्रपति झाला. ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.” शिवाजीच्या राज्याभिषेकप्रसंगी इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्झिंडेन हा रायगडावर हजर होता. त्याने आपल्या रोजनिशीमध्ये राज्याभिषेक समारंभाचे वर्णन लिहून ठेवले आहे. त्याचप्रमाणे रायगड किल्ला, गडाचा मार्ग याविषयी त्याने नोंद करून ठेवली आहे. ६ जून रोजी झालेल्या समारंभाविषयी तो लिहितो, 'या दिवशी राजा भव्य सिंहासनावर आरूढ झाला. संभाजी राजे, पेशवा मोरोपंत आणि एक श्रेष्ठ ब्राह्मण सिंहासनाखाली एका ओट्यावर बसले होते.' सिंहासनाचे वर्णन करताना तो लिहितो, 'सिंहासनाच्या दोन्ही बाजूंस सुवर्णांकित भाल्याच्या टोकावर अनेक अधिकारदर्शक व राजसत्तेची चिन्हे असल्याचे आम्ही पाहिले. उजव्या हाताला २ मोठी मोठ्या दाताच्या मत्स्यांची सुवर्णाची शिरे होती. डाव्या हाताला अनेक अश्वपुच्छे व एका मुल्यवान भाल्याच्या टोकावर समपातळीत लोंबणारी सोन्याच्या तराजूची पारडी न्यायचिन्ह म्हणून तळपत होती.' या शुभचिन्हांचा अनेक प्रकारे अर्थ लावण्याचा प्रयत्न इतिहासकारांनी केलेला आढळतो. साधारणपणे असे मानले जाते की मत्स्यचिन्ह हे समुद्रवर्चस्वाचे प्रतिक आहे. अश्वपुच्छ हे सर्वांगसज्ज अशा अश्वदलाचे प्रतिक आहे आणि तराजू हे निःपक्षपाती न्यायव्यवस्थेचे प्रतिक आहे. या ३ प्रतिकांवरून शिवाजीचे सामर्थ्य तर स्पष्ट होतेच पण त्याचबरोबर जनतेला न्याय देण्यासाठी आपण सिंहासनरूढ आहोत याची जाणीवही शिवाजीने तराजूच्या चिन्हाद्वारे करून दिली. राज्यारोहणप्रसंगी शिवाजी महाराजांनी नव शक किंवा कालगणना सुरू केली. या शकाला 'राज्याभिषेक शक' किंवा 'राजशक' असेही म्हणतात. मध्ययुगातील शककर्ता राजा म्हणून शिवाजीचा गौरवाने उल्लेख केला जातो. ही कालगणना शिवाजीचे सार्वभौमत्व सूचित करणारी आहे. शिवाजीराजे सिंहासनावर बसले आणि नवे युग सुरू झाले. म्हणून या प्रसंगी महाराजांनी . शिवराई होन हे सोन्याचे नाणे पाडले. तसेच शिवराई म्हणून तांब्याचे नाणेही पाडले. या नाण्यावर 'श्री राजा शिवछत्रपति' अशी अक्षरे कोरलेली आढळतात. राज्याभिषेक झाला त्या घटकेपासून शिवाजी महाराजांनी 'क्षत्रिय कुलावतंस श्री राजा शिवछत्रपति' हे नवे बिरूद धारण केले. शिवाजी महाराजांना केवळ नवे राज्य स्थापन करावयाचे नव्हते तर रामचंद्रपंत अमात्य म्हणतात त्याप्रमाणे 'नूतन सृष्टी निर्माण करावयाची होती.' शेकडो वर्षे राजभाषा फारसी किंवा उर्दू असल्यामुळे संस्कृत आणि मराठी ७६ छत्रपती शिवाजी महाराज