भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 83, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 83

भाषेला अवकळा प्राप्त झालेली होती. राजकीय पत्रव्यवहारातून तर मराठी शब्द जवळजवळ हद्दपार झालेले होते. व्यवहारातही मोठ्या प्रमाणात उर्दूमिश्रित मराठी भाषा प्रचारामध्ये आलेली होती. अशाप्रकारे मराठी भाषा, संस्कृती यांना अवकळा प्राप्त झालेली होती. संस्कृत भाषा समजेनाशी झाली होती. आपल्या राज्यातील हे मरगळलेले समाजजीवन पुन्हा चैतन्यमय करण्यासाठी शिवाजी महाराजांनी विविध प्रकारच्या योजना कार्यवाहित आणण्याचा निश्चय केला. परकीय संस्कृतीचे सावट दूर करण्यासाठी आणि फारसी भाषेचा प्रभाव कमी करण्यासाठी रघुनाथ पंडीत या विद्वानास ‘राज्यव्यवहारकोश’ तयार करण्याची आज्ञा शिवाजीने दिली. परंपरागत पंचांगपद्धतीमध्ये कालपरत्वे अनेक दोष शिरलेले होते. ते दूर करण्यासाठी ‘करणकौत्सुभ’ नावाचा ग्रंथ लिहिण्याची आज्ञा शिवाजीने कृष्ण ज्योतिषी यांना केली. या प्रसंगी शिवाजीने मुलकी, लष्करी त्याचप्रमाणे धर्मविषयक आणि न्यायविषयक नवे कायदे केले. त्यांना ‘प्रशस्ती’ असे म्हणत. राजकीय पत्रव्यवहार कसा करावा या पद्धतीला ‘लेखनप्रशस्ती’ असे म्हणत. शिवाजीने बाळाजी आवजी चिटणीस यांना नवी लेखनप्रशस्ती तयार करण्यास सांगितली आणि राजकीय पत्रव्यवहारामध्ये मराठी शब्दांचे प्रमाण अधिकाधिक वाढावे म्हणून या प्रशस्तीमध्ये अनेक प्रकारचे मराठी तर्जुमे करण्यास सांगितले. बाळाजी आवजी चिटणीस यांची लेखनप्रशस्ती अद्यापही उपलब्ध नाही. परंतु त्यांनी तयार केलेले फुटकळ तर्जुमे पहावयास मिळतात. त्यावरून मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा देण्याचा प्रयत्न शिवाजीने कसा केला याची माहिती मिळते. राज्याभिषेकप्रसंगी शिवाजी महाराजांनी आपल्या प्रधानमंडळाची रचना केली. मंत्र्यांची फारसी नावे रद्द करून संस्कृत नावे प्रचारात आणली. ८ मंत्र्यांच्या आपल्या मंडळाला अष्टप्रधानमंडळ असे नामाभिधान करण्यात आले. हा भव्य राज्याभिषेक समारंभ पहाण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक साधुपुरुष, संन्यासी, मानभाव, जटाधारी, जोगी, जंगम असे विविध प्रकारचे उपासक जमलेले होते. त्यांना यथोचित दान देण्यात आले. नवे युग सुरू झाले शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकामुळे केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासात एका नव्या युगाला प्रारंभ झाला. १७व्या शतकामध्ये जवळजवळ संपूर्ण भारतात एकही देशी सार्वभौम सत्ता अस्तित्वात नव्हती. दक्षिणेतील विजयनगरचे साम्राज्य लोप पावल्यानंतर शाही राजवटींना समर्थपणे शिवराज्याभिषेक ७७