छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 94, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ेंशिवाजी महाराज आपल्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. असा समज झाल्यामुळे संभाजीने मुघलांकडे जाण्याचे ठरविले. शिवाजी महाराज कर्नाटक मोहिम आटोपून १६७८ च्या पावसाळ्यापूर्वी स्वराज्यात आले संभाजी १६७९च्या प्रारंभी केव्हातरी मुघलांना जाऊन मिळाला. संभाजी आपल्याकडे आल्यानंतर दिलेरखानाला विलक्षण आनंद झाला. त्याने ताबडतोब मराठ्यांविरुद्ध मोहिम उघडण्याचा निर्णय घेतला. पण याच वेळेला मुघल आणि आदिलशहा यांच्यातही संघर्ष चालू होता. तरीपण आदिलशाहीविरुद्ध मोहीम चालू असताना मराठ्यांना डिवचण्यासाठी दिलेरखानाने १७ एप्रिल १६७९ रोजी भूपाळगड किल्ल्याला वेढा दिला. यावेळी भूपाळगडावर फिरंगोजी नरसाळा हा किल्लेदार होता. याच किल्लेदाराने चाकणचा किल्ला मोठ्या हिकमतीने लढवून शायिस्तेखानास जेरीस आणले होते. परंतु यावेळी दिलेरखान संभाजीस बरोबर घेऊन आल्यामुळे त्याने किल्ला खानाच्या स्वाधीन केला. ही बेइमानी केल्याबद्दल शिवाजी महाराजांनी फिरंगोजीला तोफेच्या तोंडी दिले अशी हकिकत ९१ कलमी बखरीत आलेली आहे. भूपाळगड ताब्यात आल्यानंतर दिलेरखानाने आदिलशाहीविरुद्ध चाललेली मोहिम अधिक तीव्र केली. मंगळवेढा वगैरे प्रदेश जिंकून घेऊन ऑक्टोबर १६७९ पर्यंत दिलेरखानाने थेट विजापूरपर्यंत धडक मारली. या सर्व मोहिमेत संभाजी दिलेरखानाबरोबर होता अथणी शहर लुटण्यामध्ये दिलेरखानास संभाजीने मदत केली. या सर्व वार्ता शिवाजी महाराजांस समजत होत्या. संभाजी आपणास सोडून गेला याचे त्यांना विलक्षण दुःख झाले होते. परंतु संभाजीच्या मानी स्वभावास मुघलांची चाकरी परवडणार नाही याची महाराजांना पूर्ण खात्री होती. काही दिवसांनी दिलेरखानाचे उत्तान वागणे संभाजीला पटेनासे झाले. कोणत्यातरी दिलेरखान आणि संभाजी यांच्यात झगडा झाला. याच काळात औरंगजेबाने संभाजीस कैद करण्याचाही घाट घातला होता. मुघलांच्या या राजकारणात संभाजी पूर्णपणे विटला. शिवाजी महाराजांनी काही माणसे संभाजीच्या मागावर ठेवलेली होती. गुपचूपपणे संभाजीला ती भेटतही होती. त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न करीत होती. अशी माहिती भीमसेन सक्सेना या औरंगजेबाच्या दरबारी लेखकाने लिहून ठेवलेली आहे. अथणीजवळ छावणी असताना एके दिवशी संभाजी महाराजांच्या माणसांबरोबर गुपचूपपणे दिलेरखानास सोडून बाहेर पडला आणि पन्हाळ्यास परत आला. त्याला भेटण्यासाठी शिवाजी राजे पुरंदरहून पन्हाळ्यास आले. १३ जानेवारी १६८० रोजी पिता-पुत्रांची भेट झाली. शिवाजी महाराजांनी पूर्वीप्रमाणे पाश्चात्य वखारवाल्यांशी बोलणी करण्याचा संभाजीला अधिकार दिला. ८८ छत्रपती शिवाजी महाराज