छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)
Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj
के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा
पृष्ठ 96, कुल 127 में से
संदर्भ में पढ़ें१२. सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज १७ व्या शतकाच्या प्रारंभी भारतामध्ये केंद्रस्थानी असलेली मुघल सत्ता अत्यंत प्रभावशाली होती. विशेषतः संपूर्ण उत्तर भारतामध्ये मुघलांचे वर्चस्व प्रस्थापित झालेले होते. राजस्थान किंवा बुंदेलखंड येथील राजपूत राजांनी मुघलांचे मांडलीकत्व पत्करले होते. एवढेच नव्हे तर अनेक शूर राजपूत सरदार मुघलांच्या राज्यविस्तारासाठी मोठ्या निष्ठेने पराक्रम गाजवत होते. दक्षिण भारतामध्ये बहमनी राज्याच्या विभाजनानंतर जी पातशाही राज्ये निर्माण झाली होती त्यापैकी निजामशाही, कुतूबशाही आणि आदिलशाही ही तीन शाही राज्ये सतराव्या शतकामध्ये अस्तित्वात होती. या शतकाच्या प्रारंभी मुघल सम्राट अकबराने दक्षिणेत आक्रमण करून खानदेशातील फारुकी सत्ता नष्ट केली आणि मुघल सत्तेचा दक्षिणेत विस्तार सुरू केला. त्यानंतर मुघलांनी अहमदनगरपर्यंत आक्रमण करून निजामशाहीला आव्हान दिले. अशाप्रकारे दक्षिणेतील शाही राज्यकर्त्यांपुढे मुघलांचे आक्रमण ही एक मोठी समस्या निर्माण झाली. सम्राट अकबरानंतर शहाजहानने १६३६ मध्ये दक्षिणेची स्वारी काढली आणि आदिलशहाबरोबर तात्पुरता तह करून त्याच्या मदतीने निजामशाही नष्ट केली. निजामशाहीचा प्रदेश शहाजहान आणि आदिलशहा यांनी आपापसात वाटून घेतला. निजामशाही नष्ट झाल्यामुळे आदिलशाही व कुतुबशाही ही दोन शाही राज्ये दक्षिणेमध्ये शिल्लक राहिली. शहाजहाननंतर मुघल सत्ताधीश बनलेल्या औरंगजेबाने दक्षिणेतील दोन्ही शाही राज्ये नष्ट करण्याची महत्वाकांक्षा प्रथमपासून बाळगली. अशाप्रकारे दक्षिण भारतात मुघलांचा प्रभाव वाढत होता. विजयनगरचे साम्राज्य १६ व्या शतकाच्या मध्यात म्हणजे १५६५ मध्ये दक्षिणेतील शाही राजवटींनी तालीकोटच्या लढाईत निर्णायक विजय मिळवून नष्ट केले. त्यामुळे प्रभावशाली स्थानिक सत्ता एकही शिल्लक राहिली नाही. अशा या राजकीय दृष्ट्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सतराव्या शतकाच्या पूर्वार्धात शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि अत्यंत सामर्थ्यशाली अशा मुघलसत्तेला तसेच आदिलशाहीला टक्कर देऊन आपल्या राज्याला बळकटी ९०