भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 10, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 10

श्रीसमर्थांचें अल्प चरित्र.

याचा निर्णय व निश्चय त्यांच्या मनाशीं ठरल्यावर मग त्यांनीं पुढें मठस्थापना व लोकसंग्रह इत्यादि अचाट व्याप सुरू केला. समर्थांच्या वेळीं धार्मिकदृष्ट्या त्यांच्याइतकेच श्रेष्ठ असे अनेक संत महाराष्ट्रांत होते, व त्या सर्वांना महा- राष्ट्राच्या तत्कालीन स्थितीबद्दल तळमळ वाटत होती. परंतु नुसत्या मानसिक तळमळीनें ती स्थिति थोडीच बदलते ! ती बदलण्यास कांहीं तरी योग्य प्रयत्नच केला पाहिजे. असा प्रयत्न करण्याची कल्पना फक्त एकट्या समर्थांच्याच मनांत आली व त्याप्रमाणें त्यांनीं प्रयत्न करून त्यांत यशहि संपादन केलें. इतर संतांची प्रवृत्ति अखेरपर्यंत निवृत्तिपरच राहिली. रामदासांनीं मात्र कालाकडे नजर देऊन आपल्या प्रवृत्तींत अंशतः बदल केला; म्हणजे त्यांनीं प्रवृत्ति व निवृत्ति या दोहोंची सांगड घालून ‘महाराष्ट्रधर्म’ या नांवाची एक विशिष्ट शिकवण तत्कालीन जनतेस शिकविली. व शिवाजीसारख्या पराक्रमी क्षत्रियाची दैवयोगानें त्यांस जोड मिळाल्यामुळे त्यांची ही शिकवण तत्काल फलद्रूपहि झाली. राष्ट्रोद्धाराचें कार्य करण्याचा मनांत संकल्प केल्यानंतर समर्थांनीं कृष्णा- तीरीं चाफळखोऱ्यांत आपल्या आयुष्याचा बहुतेक काल घालविला व तेथूनच त्यांनीं आपल्या अवाढव्य उद्योगाचीं सर्व सूत्रें चालविलीं. यावरून कोणतेंहि महत्त्वाचें संघटनात्मक कृत्य करण्यास महाराष्ट्रांतील सह्याद्रीचा टापू व कृष्णा- तीरचा प्रदेश विशेष अनुकूल असावा असें दिसतें. तसें नसतें तर समर्थांनीं आपल्या वास्तव्याकरितां तो निवडला नसता. वस्तुतः समर्थांची जन्मभूमि पाहिली तर ती ह्या प्रदेशापासून पुष्कळ दूर आहे. तसेंच समर्थांनीं भरतखंडां- तील इतर प्रदेशहि सूक्ष्मदृष्टीनें पाहिलेले होते. मग त्या सर्वांत ज्या अर्थी त्यांनीं महाराष्ट्रांतील उपरोक्त प्रदेशच आपल्या कार्याचें मुख्य क्षेत्र बनविला, त्या अर्थी त्या प्रदेशाचे अंगीं खरोखरच कांहीं तरी अपूर्व नैसर्गिक सामर्थ्य असलें पाहिजे, यांत कांहीं शंका नाहीं. शिवाय हाच प्रदेश आपल्या कार्यक्षेत्राकरितां निवड- ण्याचें आणखी एक कारण दिसतें व तें रा० राजवाडे यांनीं आपल्या राम- दासांवरील निबंधांत नमूद केलेलें आहे. तें असें:— “दासांच्या निरूपणाचा मुख्य कटाक्ष महाराष्ट्रावर सर्वस्वीं असलेला दिसतो. बहुतेक सर्व हिंदुस्थान व महाराष्ट्राचा बराच भाग म्लेंच्छ संस्कृतीनें भिनून गेला होता. तेव्हां बाकी उरलेला जो थोडा महाराष्ट्र देश त्याला

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक) · पृष्ठ 10, कुल 467 में से · BharatKosha