भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 9, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 9
उपोद्घात.

झालेली होती. सामान्य जन अन्नाला महाग झाले होते, व पतिव्रतेचें पातिव्रत्य टिकणें मुश्किल झालें होतें. ह्या दुःस्थितीचें चित्र समर्थांनीं आपल्या दासबोधांत यथास्थित रेखाटलें आहे. तें जिज्ञासूंनीं वाचावें. समाजाची ही दुर्दशा पाहून समर्थ फार खिन्न झाले. त्यांचा उत्साहभंग होऊन त्यांस मोठें औदासीन्य प्राप्त झालें. उदासीन हा काळ कोठें न कंठे, उदास वाटतें जीवीं आतां जावें कुणीकडे, वगैरे त्यांच्या उक्ती ह्या काळच्या परिस्थितीस अनुलक्षूनच त्यांच्या मुखांतून बाहेर पडल्या आहेत. अशा रीतीनें ज्या समाजाची—जनतेची—दुर्दशा होत चालली आहे, तिला केवळ मोक्षाचा उपदेश करून काय फायदा ? तो मोक्षहि सर्वतोपरी बद्ध व पंगू झालेली जनता कशी मिळवूं शकणार ? तसेंच जेथें घटके- घटकीं अधर्माचरण होत आहे तेथें धर्मस्थापना तरी कशी होणार ? इत्यादि प्रश्न मनांत येऊन समर्थांचें अंतःकरण अगदीं उद्विग्न झालें. अशा जनतेचा उद्धार करणें दुस्तर आहे असें वाटून एक वेळ ते हताशहि झाले असावेत असें वाटतें. ‘समर्थप्रताप’ ग्रंथांत असें वर्णन आहे कीं, तीर्थाटन करीत असतांना वैराग्याचा अतिरेक होऊन एक वेळ त्यांनीं आपला देह हिमालयकुंडांत झोंकून दिला. त्या वेळीं श्रीरामांनीं त्यांस वरच्यावर धरिलें. तेव्हां समर्थांनीं त्यांस ‘कां धरिलें’ म्हणून विचारितां— तुम्हांसी जगोद्धार करणें आहे । तुमची तनु ते आमची तनु पाहें । दोनी तपें तुमची रक्षिली काया हे । धर्मस्थापनेकारणें ॥ असें श्रीरामचंद्रांनीं उत्तर दिलें. आणि नंतर त्यांनीं समर्थास आपल्या जटाकलापीं असलेला हुर्मुजी रंगाचा फेटा त्यांचे हवालीं करून त्यांस परत पाठविलें. या प्रसंगाचा इत्यर्थ इतकाच दिसतो कीं, वर सांगितल्याप्रमाणें सम- र्थास जें औदासीन्य प्राप्त झालें होतें तें हिमालयांत त्यांच्याहून श्रेष्ठ अशा कोणा तरी महात्म्यानें दूर करून त्यांचें मन पुन्हा स्थिर केलें. कदाचित् त्यांचें त्यांनींहि तसें केलें असेल. त्यानंतर समर्थांनीं फिरून भरतखंडाच्या अंतर्भागीं प्रवेश केला व ते कृष्णातीरीं चाफळखोऱ्यांत येऊन लोकोद्धाराचें कृत्य कोणत्या रीतीनें करावें याचा विचार करूं लागले. हा विचार करीत असतांनाच, तत्कालीन जन- तेचें ऐहिक कल्याण साधण्याचा यत्न केल्यावांचून त्यांचें पारमार्थिक कल्याण साधतां येणार नाहीं, असें त्यांस आढळून आलें. अशा रीतीनें काय करावयाचें