दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 8, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीसमर्थांचें अल्प चरित्र. ५ लोक त्याच्या मागें लागले. इतक्यांत त्यानें नदीतीर गांठलें व डोहांत उडी घेतली. तेव्हां लोक ‘बुडाला रे बुडाला!’ म्हणून ओरडले. परंतु त्यांस दाद न देतां तो पैलतीरास जाऊन पोंचला व दूर निघून गेला. पुढें ७ दिवस त्यानें अन्नपाणी वर्ज्य करून श्रीरामाची प्रार्थना केली. तेव्हां त्यास श्रीरामानें दर्शन दिलें. त्यानंतर तपश्चर्या करण्याकरितां तो टाकळीस निघून गेला. तेथें १२ वर्षांपर्यंत पुरश्चरण करून त्यानें यौगिक सामर्थ्य संपादन केलें. त्यानंतर १२ वर्षे तीर्थाटन म्हणजे सर्व भरतखंडभर प्रवास केला. व याच अवधींत त्यानें त्या वेळीं प्रचलित अस- लेल्या सर्व शास्त्रांचा अभ्यास आणि लोकस्थितीचें अवलोकन केलें. तीर्थाटनाचा काल जेव्हां पूर्ण झाला, तेव्हां नारायणाचें वय ३६ वर्षांचें होतें. त्यानंतर म्हणजे शके १५६६ च्या सुमारास नारायण चाफळखोऱ्यांत येऊन राहिला व तेथें दासबोध ग्रंथ निर्माण करून समर्थ रामदासस्वामी या नांवानें प्रसिद्धि पावून अनेक ठिकाणीं मारुती व मठ यांची स्थापना करण्यांत व लोकसंग्रह करण्यांत त्यानें सुमारें तीन तपें घालविलीं. नारायण ऊर्फ समर्थ रामदास यांच्या तीर्थाटनाचा काल हा त्यांच्या आयुष्यांतील एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. ह्या कालांत त्यांस जो अनुभव प्राप्त झाला, त्यावरच त्यांच्या पुढील आयुष्यक्रमाची भव्य व टोलेजंग इमारत उभारलेली आहे. किंबहुना, या तीर्थाटनांतील अनुभवाची जोड जर समर्थांना झाली नसती, तर त्यांच्या हातून पुढें जें मोठें राष्ट्रोद्धाराचें कार्य झालें तें झालें असतें कीं नाहीं याची शंका आहे. समर्थ टाकळी येथें पुरश्चरण करून जेव्हां यौगिक सामर्थ्य संपादन करिते झाले, तेव्हां स्वतःप्रमाणें भरतखंडांतील जनतेला- हि परमार्थप्रवण करून जीवन्मुक्त करण्याच्या हेतूनें प्रेरित झाले; आणि तो हेतु डोळ्यांपुढें ठेवूनच त्यांनीं तीर्थाटनास प्रारंभ केला. परंतु यावनी राज्याच्या भारा- खालीं सर्व जनता इतकी वांकून गेलेली होती कीं, इतःपर तिचें व्यक्तित्व जिवंत राहील कीं नाहीं, याविषयीं संशय वाटूं लागला होता. समाजरचना अत्यंत विस्कळित झाल्यानें व धर्माचें अधिष्ठान नाहींसें होत गेल्यानें सर्व जनता सर्वतोपरी पंगू बनली होती. तिच्यामध्यें सद्गुणांचा ऱ्हास व दुर्गुणांचा सुळ- सुळाट चालू होता. सर्व समाजांत बजबजपुरी माजून राहिली होती. धर्मदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या व नैतिकदृष्ट्या तत्कालीन हिंदु समाजाची फार निकृष्ट अवस्था