दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 109, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें७४ श्रीदासबोध. [ दशक न म्हणे हा गुप्त । होत असे ॥ ३० ॥ मृत्यु न म्हणे स्वाधीन । मृत्यु न म्हणे पराधीन । सकळ जीवांसी प्राशन । मृत्युच करी ॥ ३१ ॥ एक मृत्यु- मार्गी लागले । एकीं अर्धपंथ क्रमिले । एक ते शेवटास गेले । वृद्धपणीं ॥ ३२ ॥ मृत्यु न म्हणे बाळ तरुण । मृत्यु न म्हणे हा सुलक्षण । मृत्यु न म्हणे हा विचक्षण । बहु बोलका ॥ ३३ ॥ मृत्यु न म्हणे हा धीर । मृत्यु न म्हणे हा उदार । मृत्यु न म्हणे हा सुंदर । चतुरंगी जाणे ॥ ३४ ॥ मृत्यु न म्हणे हा पुण्यपुरुष । मृत्यु न म्हणे हा हरिदास । मृत्यु न म्हणे हा विशेष । सुकृती नर ॥ ३५ ॥ आतां असो हें बोलणें । मृत्यूपासूनि सु- टिजे कोणें । मागें पुढें विश्वासें जाणे । मृत्युपंथें ॥ ३६॥ चौरी खाणी चारी वाणी । चौऱ्यांशीं लक्ष जीवयोनी । जन्मा आले तितुके प्राणी । मृत्यु पाव- ती ॥ ३७ ॥ मृत्युभेणें पळोनि जातां । तरी मृत्यु सोडीना तत्वतां । मृ- त्यूस न ये कीं चुकवितां । कांहीं केल्या ॥३८॥ मृत्यु न म्हणे हा स्वदेशी । मृत्यु न म्हणे हा विदेशी । मृत्यु न म्हणे हा उपवासी । निरंतर ॥ ३९ ॥ मृत्यु न म्हणे थोर थोर । मृत्यु न म्हणे हरिहर । मृत्यु न म्हणे अवतार । भगवंताचे ॥ ४० ॥ श्रोतीं कोप न करावा । हा मृत्युलोक सर्वांस ठावा । उपजला प्राणी जाईल बरवा । मृत्युपंथें ॥४१॥ एथें न मानावा किंत । हा मृत्युलोक विख्यात । प्रकट जाणती समस्त । लहान थोर ॥ ४२ ॥ तथापि किंतु मानिजेल । तरी मृत्युलोक न होईल । या कारणें नासेल । उपजला प्राणी ॥ ४३ ॥ ऐसें जाणोनियां जीवीं । याचें सार्थकचि करावें । जनीं म- रोनियां उरावें । कीर्तिरूपें ॥ ४४ ॥ येऱ्हवीं प्राणी लहान थोर । मृत्यु पा- वती निर्धार । बोलिलें हें अन्यथा उत्तर । मानूंचि नये ॥ ४५ ॥ गेले बहुत वैभवाचे । गेले बहुत आयुष्याचे । गेले अगाध महिमेचे । मृत्युपंथें ॥ ४६ ॥ गेले बहुत पराक्रमी । गेले बहुत कपटकर्मी । गेले बहुत संग्रांमी । संग्राम- शूर ॥ ४७ ॥ गेले बहुत बळाचे । गेले बहुत काळाचे । गेले बहुत कुळांचे । कुळवंत राजे ॥ ४८ ॥ गेले बहुतांचे पालक । गेले बुद्धीचे चालक । गेले युक्तीचे तार्किक । तर्कवादी ॥ ४९ ॥ गेले विद्येचे सागर । गेले बळाचे १. हुषार. २. पुण्यवान्. ३. सर्वास. ४. चार प्रकारची जीवसृष्टि. ५. खोटें. ६. योद्धे. ७. प्रवर्तक. ८. तर्कशास्त्रांत निपुण.