दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 110, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंडोंगार । गेले धनाचे कुबेर । मत्युपंथें ॥ ५० ॥ गेले बहुत पुरुषाथांचे । गेले बहुत विक्रमाचे । गेले बहुत आटोपांचे । कार्यकर्ते ॥ ५१ ॥ गेले बहुत श- स्त्रधारी । गेले बहुत परोपकारी । गेले बहुत नानापरी । धर्मरक्षक ॥ ५२ ॥ गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तींचे । गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३ ॥ गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी । गेले बहुत विवादी । बहुता परींचे ॥ ५४ ॥ गेलीं पंडितांचीं थाटें । गेलीं शब्दांचीं क- चोंटें । गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥ गेले तापसांचे भार । गेले संन्यासी अपार । गेले विचारकर्ते साचार । मृत्युपंथें ॥ ५६ ॥ गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी । गेले बहुत नानापरी । नाना छंद करोनि ॥ ५७ ॥ गेले ब्राह्मणसमुदाय । गेले बहुत आचार्य । गेले बहुत सांगों काय । किती म्हणोनि ॥ ५८ ॥ असो ऐसे सकळ गेले । परंतु एकचि राहिले । जे स्वरूपा- कार झाले । आत्मज्ञानी ॥ ५९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृती- यदशके मृत्युनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥
१०. वैराग्य लक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ संसार म्हाणिजे महापूर । माजीं जलचरें अपार । डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १ ॥ आशा ममता देहबेडी । सुसरीं करिताती ताडातोडी । नेउनि दुःखाचे सांगडी- । माजीं घालिती ॥ २ ॥ अहंकार नक्रें उडविलें । नेउनि पाताळीं बुडविलें । तेथूनियां सोडविले । न वचे प्राणी ॥ ३ ॥ काममगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना । मद मत्सर वोहटेना । भुली पडली ॥ ४ ॥ वासना धामीण पडली गळां । घालोनि वेंटाळें वैमी गरळा । जिव्हा लळलळी वेळोवेळां । भया- नक ॥ ५ ॥ माथां प्रपंचाचें ओझें । घेउनि म्हणे माझें माझें । बुडतांहि न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥ ६ ॥ पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें । आलें अहंतेचें काँविरें । भूतबाधा ॥ ७ ॥ बहुतेक आवैतीं १. पराक्रमाचे. २. उद्योगाचे. ३ वाद करणारे. ४. खटपटी, वैयाकरणी. ५. मगरानें. ६. कमी होईना. ७. ओकते. ८. फुगतो, गर्व करितो. ९. वेड. १०. भोंवऱ्यांत.