भारतकोश
संग्रह पर लौटें

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

डोंगार । गेले धनाचे कुबेर । मत्युपंथें ॥ ५० ॥ गेले बहुत पुरुषाथांचे । गेले बहुत विक्रमाचे । गेले बहुत आटोपांचे । कार्यकर्ते ॥ ५१ ॥ गेले बहुत श- स्त्रधारी । गेले बहुत परोपकारी । गेले बहुत नानापरी । धर्मरक्षक ॥ ५२ ॥ गेले बहुत प्रतापाचे । गेले बहुत सत्कीर्तींचे । गेले बहुत नीतीचे । नीतिवंत राजे ॥ ५३ ॥ गेले बहुत मतवादी । गेले बहुत कार्यवादी । गेले बहुत विवादी । बहुता परींचे ॥ ५४ ॥ गेलीं पंडितांचीं थाटें । गेलीं शब्दांचीं क- चोंटें । गेलीं वादकें अचाटें । नाना मतें ॥ ५५ ॥ गेले तापसांचे भार । गेले संन्यासी अपार । गेले विचारकर्ते साचार । मृत्युपंथें ॥ ५६ ॥ गेले बहुत संसारी । गेले बहुत वेषधारी । गेले बहुत नानापरी । नाना छंद करोनि ॥ ५७ ॥ गेले ब्राह्मणसमुदाय । गेले बहुत आचार्य । गेले बहुत सांगों काय । किती म्हणोनि ॥ ५८ ॥ असो ऐसे सकळ गेले । परंतु एकचि राहिले । जे स्वरूपा- कार झाले । आत्मज्ञानी ॥ ५९ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृती- यदशके मृत्युनिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥

१०. वैराग्य लक्षण. श्रीगणेशाय नमः ॥ संसार म्हाणिजे महापूर । माजीं जलचरें अपार । डंखूं धावती विखार । काळसर्प ॥ १ ॥ आशा ममता देहबेडी । सुसरीं करिताती ताडातोडी । नेउनि दुःखाचे सांगडी- । माजीं घालिती ॥ २ ॥ अहंकार नक्रें उडविलें । नेउनि पाताळीं बुडविलें । तेथूनियां सोडविले । न वचे प्राणी ॥ ३ ॥ काममगरमिठी सुटेना । तिरस्कार लागला तुटेना । मद मत्सर वोहटेना । भुली पडली ॥ ४ ॥ वासना धामीण पडली गळां । घालोनि वेंटाळें वैमी गरळा । जिव्हा लळलळी वेळोवेळां । भया- नक ॥ ५ ॥ माथां प्रपंचाचें ओझें । घेउनि म्हणे माझें माझें । बुडतांहि न सोडी फुंजे । कुळाभिमानें ॥ ६ ॥ पडिलें भ्रांतीचें अंधारें । नागविलें अभिमानचोरें । आलें अहंतेचें काँविरें । भूतबाधा ॥ ७ ॥ बहुतेक आवैतीं १. पराक्रमाचे. २. उद्योगाचे. ३ वाद करणारे. ४. खटपटी, वैयाकरणी. ५. मगरानें. ६. कमी होईना. ७. ओकते. ८. फुगतो, गर्व करितो. ९. वेड. १०. भोंवऱ्यांत.

पडिले । प्राणी वाहतचि गेले । जिहीं भगवंतासि बोभाईलें । भावार्थ- बळें ॥ ८ ॥ देव आपण घालोनि उडी । तयांसि नेलें पैलथडी । येरें तीं अभाविकें बापुडीं । वाहतचि गेलीं ॥ ९ ॥ भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोनि भुलला । संकटीं पावे भाविकाला । रक्षित असे ॥ १० ॥ जया भगवंत आवडे । तयांचे देवास सांकडें पडे । संसारदुःख समूळ झडे । निजदासांचें ॥ ११ ॥ जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे । धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२ ॥ जैसा भाव जयापाशीं । तैसाचि देव तयापाशीं । जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणिमात्रांचा ॥ १३ ॥ जरी भाव असला मायिकें । तरी देव होय महाठक । नवल तयाचें कौतुक । जै- शासि तैसा ॥ १४ ॥ जैसें जयाचें भजन । तैसेंच दे समाधान । भाव होतां किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५ ॥ दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैशासि तैसें भासे । तयाचें सूत्र असे । आपणाचपाशीं ॥ १६ ॥ जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें । जरी डोळे पसरोनि पहावें । तरी तेंहि टव- कारे ॥ १७ ॥ भ्रुकुटिस घालुनियां गांठी । पाहतां तेंहि क्रोधें उठी । आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८ ॥ जैसा भाव प्रतिबिंबितला । त- याचाचि देव जाला । जो जैसा भजेल त्याला । तैसाचि वोळे ॥ १९ ॥ भावें परमार्थाचिया वाटा । वाहती भक्तीचिया पेंठा । भरला मोक्षाचा चौहाटा । सज्जनसंगें ॥ २० ॥ भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरीं पावन झाले । भावार्थ बळें उद्धरले । पूर्वज तेही ॥ २१ ॥ आपण स्वयें तरले । जनांसि उपयोगा आले । कीर्तिश्रवणें पावन झाले । अभक्त भावार्थी ॥ २२ ॥ धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं । त्यांहींच एक जन्म जनीं । सार्थक केलें ॥ २३ ॥ तयांची वर्णू काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी । कांसे ला- वूनि उतरी । पार दुःखाचा ॥ २४ ॥ बहुत जन्माच्या शेवटीं । जेणें चुके आंटाआटी । तो नरदेह भेटी । करी भगवंताची ॥ २५ ॥ म्हणोनि धन्य ते भाविक जन । जिंहीं जोडिलें हरि निधान । अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि आलें ॥ २६ ॥ आयुष्य हेचि रत्नपेटी । माजी भजनरत्नें गोमटीं । ईश्वरीं


तळटीपा (Footnotes): १. आळविलें. २. इतर. ३. बाह्यात्कारें. ४. भिवयांस. ५. पावतो. ६. चव्हाटा. ७. जन्ममरणरूप दगदग. ८. द्रव्याची रास. ९. सुंदर.

३ रा. ] वैराग्यलक्षण. ७७ अर्पूनियां लुटी । आनंदाची करावी ॥ २७ ॥ हरिभक्त वैभवें कनिष्ठ । परी तो ब्रह्मादिकां वरिष्ठ । सदासर्वदा संतुष्ट । नैराश्यबोधें ॥ २८ ॥ धरूनियां ईश्वराची कांस । केली संसाराची निरास । तया भाविकां जगदीश । सबाह्य सांभाळी ॥ २९ ॥ जया संसाराचें दुःख । विवेकें वाटे परम सुख । संसार- सुखाचेनि पढतमूर्ख । लोधूनि पडती ॥ ३० ॥ जयांचा ईश्वरीं जि- व्हाळा । ते भोगिती स्वानंदसोहळा । जयांचा जनावेगळा । ठेवा अ- क्षयीं ॥ ३१ ॥ ते अक्षयसुखें सुखावले । संसारदुःख विसरलें । विषयरंगीं वोरंगले । श्रीरंगरंगी ॥ ३२ ॥ तयांस फावली नरदेह- पेटी । केली ईश्वरीं साटी । येर अभाविकें करंटीं । नरदेह गेला ॥ ३३ ॥ अवचटें निधान जोडिलें । तें कवडीचे बद्दल नेलें । तैसें आयुष्य निघोन गेलें । अभाविकांचें ॥ ३४ ॥ बहु तपाचा सांठा । तेणें लाधला परिस गो- मटा । परी तो ठायींच करंटा । भोगूंचि नेणे ॥३५॥ तैसा संसारासि आला । मायाजाळीं गुंडाळला । अंतीं एकलाच गेला । हात झाडोनी ॥ ३६ ॥ या नरदेहाचे संगतीं । बहुत पावले उत्तम गती । एक बापुडीं यातायाती । वरपडीं जाहलीं ॥ ३७ ॥ या नरदेहाचेनि लागवेगें । सार्थक करावें संत- संगें । नीच योनि दुःख मागें । बहुत भोगिलें आहे ॥ ३८ ॥ कोण समय येईल कैसा । याचा न कळे कीं भरंवसा । जैसे पक्षी दाही दिशा । उडोनि जाती ॥ ३९ ॥ तैसें वैभव हें सकळ । कोण जाणे कैशी वेळ । पुत्रकलत्रादि सकळ । विघडोनि जाती ॥ ४० ॥ पाहिली घडी नव्हे आपुली । वयसां तरी निघोनि गेली । देह पडतांच ठेविली । आहे नीच योनी ॥ ४१ ॥ श्वानसूकरादि नीच याती । भोगणें घडे नाना विपत्ती । तेथें कांहीं उत्तम गती । पाविजेत नाहीं ॥ ४२ ॥ मागें गर्भवासीं आटाआटी । भोगितां झालासि रे हिंपुटी । तेथोनियां थोर कष्टीं । सुटलासि दैवें ॥ ४३ ॥ दुःख भोगिलें आपुले जीवें । तेथें कैंची होती सवें । तैसेंचि पुढें एकलें जावें । लागेल बापा ॥ ४४ ॥ कैंची माता कैंचा पिता । कैंची बहीण कैंचा भ्राता । कैंचीं सुहृदें कैंची वनिता । पुत्रकलत्रादिक ॥ ४५ ॥ हीं तूं जाण मावेचीं । १ निरसन. २. आंतून व बांहरून. ३. विटले. ४. श्रीरंगभक्त. ५. संगति- ६. प्राप्त झालीं. ७. आधारानें. ८. अंतरतात. ९. आयुष्य. १०. दुःखी.

अवघीं सोयरीं सुखाचीं । हीं तुझ्या दुःखाचीं । सांगाती नव्हती ॥ ४६ ॥ कैंचा प्रपंच कैंचें कुळ । कासया होतोसि व्याकुळ । धन कणे¹ लक्ष्मी सकळ । जाइजणें² ॥ ४७ ॥ कैंचें घर कैंचा संसार । कासया करितोसि जोजार³ । जन्मवरी वाहोनि भार । लेखीं सांडोनि जाशी ॥ ४८ ॥ कैंचें तारुण्य कैंचें वैभव । कैंचे सोहळे हावभाव । हें सकळही जाण माँव⁴ । माँयिक माँया ॥ ॥ ४९ ॥ याच क्षणीं मरोन जाशी । तरी रघुनाथासि अंतरलासी । माझें माझें म्हणतोसी । म्हणोनियां ॥ ५० ॥ तुवां भोगिल्या पुनरावृत्ती⁵ । ऐसीं मायबापें किती । स्त्री कन्या पुत्र होती । लक्षानुलक्ष ॥ ५१ ॥ कर्मयोगें सकळही मिळालीं । एके स्थळीं जन्मासि आलीं । तीं तुवां आपुलीं मानिलीं । कैसीं रे पढतमूर्खा ॥ ५२ ॥ तुझें तुज नव्हे शरीर । तेथें इतरांचा कोण विचार । आतां एक भगवंत साचार । धरीं भावार्थबळें ॥ ५३ ॥ एका डुंभराकारणें⁶ । नाना नीचांची सेवा करणें । नाना स्तुति आणि स्तवनें । मर्यांदा धरावी ॥ ५४ ॥ जो अन्न देतो उदरासी । शरीर विकावें लागे त्यासी । जेणें घातलें जन्मासी । त्यास कैसें विसरावें ॥ ५५ ॥ अहर्निशीं ज्या भगवंता । सकळ जीवांची लागली चिंता । मेघ वर्षे जयाची सत्ता । सिंधु मर्यादा धरावी ॥ ५६ ॥ भूमि धरिली धराधरें⁷ । प्रगट होइजे दिवाकरें⁸ । ऐसी सृष्टि सत्तामात्रें । चालवी जो कां ॥ ५७ ॥ ऐसा कृपाळू देवाधिदेव । जो सांभाळी सकळ जीव । नेणवे जयाचें लाघव⁹ । कृपाळुपणें ॥ ५८ ॥ ऐसा सर्वात्मा श्रीराम । सांडूनि धरिती विषयकाम । ते प्राणी दुरात्मे अधम । केलें पावती ॥ ५९ ॥ रामैविण जे जे आस । तितुकी जाणावी निराश । माझें माझें सावकाश । शीणचि उरे ॥ ६० ॥ जयासि वाटे शीण व्हावा । तेणें विषय चिंतीत जावा । विषय न मिळतां जीवा । तळमळ सुटे ॥ ६१ ॥ सांडूनि राम आनंदघन । ज्याचे मनीं विषयचिंतन । त्यासि कैंचें समाधान । लोलंगतांसी¹⁰ ॥ ६२ ॥ जयासि वाटे सुखचि असावें । तेणें रघुनाथभजनीं लागावें । स्वजन सकळहि त्यागावे । दुःखमूळ जे ॥ ६३ ॥ जेणें वासना झोंबोनि पडे । तेणेंचि अपायें दुःख जडे । म्हणोनि विषय-


१. धान्य वगैरे. २. जाणारें, विनाशी. ३. व्याप. ४. फसवणूक. ५. जन्म- मरणाचे फेरे. ६ पोटासाठीं ७. शेषानें. ८. सूर्यानें. ९. कौशल्य. १०. विषयासक्तास

४ था.] श्रवणभक्ति. ७९ वासना मोडे । तो एक सुखी ॥ ६४ ॥ विषयजनित जें जें सुख । तेणेंचि होतें परम दुःख । पूर्वी गोड अंतीं शोक । नेनस्तें आहे ॥ ६५ ॥ गळ गिळितां सुख वाटे । वोढोनि घेतां घसा फाटे । कां तें बापुडें मृग आपटे । चारा घेऊनि पळतां ॥ ६६ ॥ तैसी विषयसुखाची गोडी । गोड वाटे परी ते कुंडी । म्हणोनियां आवडी । रघुनाथीं धरावी ॥ ६७ ॥ ऐकोनि बोले भाविक । कैसेनि घडे जी सार्थक । सांगा स्वामी यमलोक । चुकेल जेणें ॥ ६८ ॥ देवासि वास्तव्य कोठें । तो मज कैसेनि भेटे । दुःखमूळ संसार तुटे । कोणेपरी स्वामी ॥ ६९ ॥ धडफौडी भगवत्प्राप्ती । होऊनि चुके अधो- गती । ऐसा उपाय कृपामूर्ती । मज दीनासि करावा ॥ ७० ॥ वक्ता म्हणे हो एकभावें । भगवद्भजन करावें । तेणें होईल स्वभावें । समाधान ॥७१॥ कैसें करावें भगवद्भजन । कोठें ठेवावें हें मन । भगवद्भजनाचें लक्षण । मज निरूपावें ॥ ७२ ॥ ऐसा म्लानवदनें बोले । धरिलीं सदृढ पाऊलें । कंठ सद्गदित गळाले । अश्रुपात दुःखें ॥ ७३ ॥ देखोनि शिष्याची अन- न्यता । भावें बोलिला सद्गुरुदाता । स्वानंद तुंबळेल आतां । पुढिलिये समासीं ॥ ७४ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे तृतीयदशके वैराग्य- लक्षणनिरूपणं नाम दशमः समासः ॥ १० ॥ ओंवी ५७८. दशक चवथा. १. श्रवणभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ जयजयाजी गणनाथा । तूं विद्यावैभवसमर्था । अध्यात्मविद्येच्या परमार्थीं । मज बोलवावें ॥ १ ॥ नमो शारदा वेदजननी । सकळ सिद्धि जयेचेनी । मानस प्रवर्तलें मननीं । स्फूर्तिरूपें ॥ २ ॥ आतां आठवूं सद्गुरु । जो पराचाही परुँ । जयाचेनि ज्ञानविचारु । कळों लागे ॥ १. खचित. २. वाईट, अपायकारक. ३. खरोखर, त्वरित. ४. एकनिष्ठा. ५. मुख्य विषय. ६. थोरांहून थोर.

८० श्रीदासबोध. [ दशक ।। ३ ।। श्रोत्यांनीं पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें । म्हणोनि बो- लिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४ ॥ सावध होऊनि श्रोतेजन । ऐका नवविधा- भजन । सच्छास्त्रीं बोलिलें पावन । होइजे येणें ॥ ५ ॥ श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥ १ ॥ टी० ॥ श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । ऐसें हें नवविधा ॥ ६ ॥ नवविधा भजन बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें । श्रोतीं अवधान दीधलें । पाहिजे आतां ॥ ७ ॥ प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथा पुराणश्रवण । नाना अध्यात्म¹- निरूपण । ऐकत जावें ॥ ८ ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सि- द्धांतमार्ग । योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ९ ॥ नाना व्रतांचे म- हिमे । नाना तीर्थांचे महिमे । नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ १० ॥ नाना माहात्म्यें² नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें । नाना तपें पुर- श्चरणें । ऐकत जावीं ॥ ११ ॥ दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी³ । तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ १२ ॥ उष्णवास जळवास⁵ । शीत- वास अरण्यवास । भूगर्भ⁶ आणि आकाशवास⁷ । कैसे ते ऐकावे ॥ १३ ॥ जपी तपी तापस योगी । नाना निग्रही⁸ हठयोगी । शाक्तौगमी¹⁰ अघोरयोगी कैसे ते ऐकावे ॥ १४ ॥ नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्ष¹²- स्थानें । पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १५ ॥ नाना पिंडांची रचना । नाना भूगोल रचना । नाना सृष्टीची रचना । कैसी ती ऐकावी ॥ १६ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें तेजमंडळें । एकवीस स्वर्ग सातें¹³ पाताळें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १७ ॥ ब्रह्मविष्णुमहेशस्थानें । इंद्र देव ऋषि- स्थानें । वायु वरुण कुबेरस्थानें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १८ ॥ नवखंडें चौदा १. ईश्वरासंबंधीं चर्चा. २. शिवमाहात्म्य, काशीमाहात्म्य, अशासारखे ग्रंथ. ३. पाला खाऊन राहणारे. ४. पंचाग्निसाधन. ५. थंडीच्या दिवसांत गळ्याइतक्या थंड पाण्यांत उभे राहणें. ६. भुयारांत राहणें. ७. वृक्षादिकांवर राहणें. ८. इंद्री- यांचें दमन करणारे. ९. प्राणनिरोध करून चित्तैक्य करणारे. १०. देवीउपा- सकांच्या पंथानें चालणारे. ११. भूतप्रेतांचें साधन करणारे. १२. चित्त एकाग्र करण्याचीं स्थानें. १३. अतल, वितल, भुतल, तलातल, रसातल, महातल व पाताळ-

भुवनें । अष्ट दिक्पालांचीं¹ स्थानें । नाना उपवनें² गहनें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १९ ॥ गणगंधर्व विद्याधर । यक्ष किन्नर नारद तुंबर । अष्टनायका सं- गीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ २० ॥ रागज्ञान तालज्ञान । नृत्यज्ञान वाद्यज्ञान । अमृतवेळा³ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २१ ॥ चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा । बत्तीस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥ २२ ॥ मंत्र मोहरे⁴ तोडगे सिद्धी । नाना वल्ली नाना औषधी । धातु रसायनें बुद्धी⁵ । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २३ ॥ कोणत्या दोषें कोण रोग । कोणत्या रोगास कोण प्रयोग⁶ । कोणत्या प्रयोगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २४ ॥ रवरवादि कुंभीपाक । नाना यातना यमलोक । सुखदुःखादि स्वर्ग नरक । कैसा तो ऐकावा ॥ २५ ॥ कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती । कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें ॥ २६ ॥ पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवेचना । सारासार विचा- रणा । कैसी ती ऐकावी ॥ २७ ॥ सायुज्यतामुक्ति कैशी होते । कैसें पाविजे मोक्षातें । या कारणें नाना मतें । शोधीत जावीं ॥ २८ ॥ वेदशास्त्र आणि पुराणें । महावाक्यांचीं⁷ विवरणें । तनुचतुष्टयानिरसनें⁸ । कैसीं तीं ऐकावीं ॥ २९ ॥ ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधूनि घ्यावें । असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ती ॥ ३० ॥ सगुणाचीं चरित्रें ऐकावीं । कां ते निर्गुण अध्यात्म⁹ शोधावीं । श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं ॥ ३१ ॥ सगुण देवाचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्त्वेंयंत्रें¹⁰ । हीं दोन्हीं परम पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३२ ॥ जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र जप ध्यानें । कीर्ति स्तुति स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३३ ॥ ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें । विभक्ति¹¹ सांडून भ- क्तीचें । मूळ शोधावें ॥ ३४ ॥ श्रवणभक्तीचें निरूपण । निरूपिलें असे


१. दिशांचे अधिपति; इंद्र, अग्नि, यम इत्यादि. २. वनें. ३. सर्वोत्कृष्ट मुहूर्त. ४. सर्पांच्या मस्तकांत असणारा औषधी मणि. ५. युक्ति, उपाय. ६. उपचार. ७. चार वेदांतून जीं तत्त्वमस्यादि चार वाक्यें सार म्हणून काढलीं आहेत त्यांचीं. ८. स्थूल, सूक्ष्म, कारण, व महाकारण अशा चार प्रकारच्या शरीरांचा विचारानें नाश करणें. ९. वेदान्तग्रंथ. १०. तत्त्वबोधक साधनें, ग्रंथ वगैरे. ११. भेदबुद्धि.

८२ श्रीदासबोध. [ दशक जाण । पुढें कीर्तनभजनाचें लक्षण । बोलिलें असे ॥ ३५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके श्रवणभक्तिनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥ १ ॥ २. कीर्तन भक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ श्रोतीं भगवद्भजन पुसिलें । तें नवविधा प्रकारें बोलिलें । त्यांत प्रथम श्रवण निरूपिलें । दुसरें कीर्तन ऐका ॥ १ ॥ सगुण हरिकथा करावी । भगवत्कीर्ति वाढवावी । अखंड वागीश्वरी वदवावी । यथायोग्य ॥ २ ॥ बहुत करावें पाठांतर । कंठीं धरावें अर्थांतर । भगवत्कथा निरंतर । करीत जावी ॥ ३ ॥ आपुलिया सुखस्वार्थीं । केलीच करावी हरिकथा । हरिकथेविण सर्वथा । राहूंचि नये ॥ ४ ॥ नित्य नवा हव्यास धरावा । साक्षेपें अत्यंतचि करावा । हरिकीर्तनें भरावा । ब्रह्मांडगोळ अवघा ॥ ५ ॥ मनापासोनि आवडी । जीवापासून अत्यंत गोडी । सदा सर्वदा तांतडी । हरिकीर्तनाची ॥ ६ ॥ भगवंतासि कीर्तन प्रिय । कीर्तनें समाधान होय । बहुत जनांसि उपाय । हरिकीर्तन कलियुगीं ॥ ७ ॥ विविध विचित्र ध्यानें । वर्णावीं अलंकार भूषणें । ध्यानमूर्ति अंतःकरणें । लक्षून कथा करावी ॥ ८ ॥ यश कीर्ति प्रताप महिमा । आवडीं वर्णावा परमात्मा । जेणें भगवद्भक्तांचा आत्मा । संतुष्ट होय ॥ ९ ॥ कथान्वय लापणिका । नामघोष करतालिका । प्रसंगें बोलाव्या अनेका । धौटी मार्ता नेमस्त ॥ १० ॥ ताल मृदंग हरिकीर्तन । संगीत नृत्य तान मान । नाना कथा अनुसंधान । तुटोंचि न द्यावें ॥ ११ ॥ कारुणाकीर्तनाच्या लोटें । कथा करावी बडबडाटें । श्रोत्यांचीं श्रवणपुटें । आनंदें भरावीं ॥ १२ ॥ कंप रोमांच स्फुरणें । प्रेमाश्रुसहित गाणें । देवद्वारीं लोटांगणें । नमस्कार घालावे ॥ १३ ॥ पदें दोहरे श्लोक प्रबंधें । धौटी मुद्रा अनेक छंद । वीरभाटी व विनोद । प्रसंगें करावे ॥ १४ ॥ नाना नवरसिक शृंगारिक । गद्यपद्यांचें कौतुक । नाना वचनें प्रस्ताविकें । शास्त्राधारें बोलावीं ॥ १५ ॥ भक्तिज्ञान- वैराग्यलक्षण । नीतिन्याय स्वधर्मरक्षण । साधनमार्ग अध्यात्मनिरूपण । १. वाणी. २. प्रयत्न. ३. भाषाचातुर्य. ४. टाळ्या. ५. कल्पित गोष्टी. ६. झालेल्या गोष्टी. ७. कविता. ८. थोर पुरुषांचें वर्णन. ९. उपक्रमरूप.

४ था. ] कीर्तनभक्ति. ८३ प्रांजळ बोलावें ॥ १६ ॥ प्रसंगीं हरिकथा करावी । सगुणीं सगुण कीर्ति धरावी । निर्गुणप्रसंगीं वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७ ॥ पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत । निरूपण करावें नेमस्त । बहुधा बोलणें अस्तान्यस्त । बोलोंचि नये ॥ १८ ॥ करावें वेदपारायण । सांगावें जनांसि पुराण । मायाब्रह्मींचें विवरण । साकल्यें वदावें ॥ १९ ॥ ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें । गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच न द्यावी ॥ २० ॥ करावें वैराग्य- रक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण । परमदक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१ ॥ सत्य समाधान तें उडे । नीति न्याय साधन मोडे । जेणें सद्भाव बिघडे । ऐसें न बोलावें ॥ २२ ॥ सगुण हरिकथा या नांव कीर्तन । अद्वैतें म्हणजे निरूपण । सगुण रचून निर्गुण । बोलत जावें ॥ २३ ॥ असो वक्तृत्वाचा अधिकार । अल्पास न घडे प्रत्युत्तर । वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४ ॥ सकळ रचून ज्ञान सांगे । जेणें वेदाज्ञा न भंगे । उत्तम सन्मार्ग लागे । प्राणिमात्रांसी ॥ २५॥ असो हें सकळहि सांडून । करावें गुणानुवाद- कीर्तन । या नांव भगवद्भजन । दुसरी भक्ती ॥ २६ ॥ कीर्तनें महा दोष जाती । कीर्तनें होय उत्तम गती । कीर्तनें भगवत्प्राप्ती । यदर्थी संशय नाहीं ॥ २७ ॥ कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होय सत्पात्र । कीर्तनें प्राणि- मात्र । सुशील होती ॥ २८ ॥ कीर्तनें अन्यैग्रता घडे । कीर्तनें निश्चय सांपडे । कीर्तनें संदेह उडे । श्रोत्या वक्त्यांचा ॥ २९ ॥ सदासर्वदा हरि- कीर्तन । ब्रह्मसुत करी आपण । तेणें नारद तोचि नारायण । बोलिजत आहे ॥ ३० ॥ म्हणोन कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तनें संतोषे पर- मात्मा । सकळ तीर्थे आणि जगदात्मा । हरिकीर्तनीं वसे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके कीर्तनभजननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ १. वादामध्यें शंका घेणाऱ्याचें जें कांहीं म्हणणें तें. २. समग्र वाचणें, किंवा म्हणणें ३. संपूर्णपणें. ४. 'एक ब्रह्मच सत्य आहे. अज्ञानानें त्यावरच हीं अनेक रूपें भासतात.' हा विचार. ५. एकाग्रता. ६. नारद.

८४ श्रीदासबोध. [ दशक ३. स्मरणभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागां निरूपिलें कीर्तन । जें सकळांसि करी पावन । आतां ऐका विष्णुस्मरण । तिसरी भक्ती ॥ १ ॥ स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २ ॥ नित्य नेम प्रातःकाळीं । मध्यान्हकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३ ॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४ ॥ हर्षकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिककाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५ ॥ कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट । अवस्था लागतां चटपट । नाम- स्मरण करावें ॥ ६ ॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरूं नये ॥ ७ ॥ संपत्ति अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । परी नामस्मरणाची स्थिति । सांडूंच नये ॥ ८ ॥ वैभव सामर्थ्य आणि सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नाम सांडूं नये ॥ ९ ॥ आधीं अवदसा मग दशा । अथवा दशे उपरी अवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सांडूं नये ॥ १० ॥ नामें संकटें नासती । नामें विघ्नें निवारिती । नामस्मरणें पाविजती । उत्तम पद ॥ ११ ॥ भूत पिशाच नाना छंद । ब्रह्मग्रह ब्राह्मणसंबंध । मंत्रंचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२ ॥ नामें विषबाधा हरती । नामें चेंडें चेटकें ना- सती । नामें होय उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३ ॥ बाळपणीं तरुणकाळीं । कठिनकाळीं वृद्धापकाळीं । सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४ ॥ नामांचा महिमा जाणे शंकर । जनां उपदेशी विश्वेश्वर । वाराणसी मुक्ति- क्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५ ॥ उफराठ्या नामासाठीं । वाल्मीक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६ ॥ हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातांपासून सुटला । नारायणनामें पावन झाला । अजामेळ ॥ १७ ॥ नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले । महापापी तेचि झाले । परम पवित्र ॥ १८ ॥ परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्य नेमें । नाम स्मरितां यमें । बाधिजेना । १९ ॥ सहस्र नामां- १. मंत्रप्रयोगांत दोष घडल्यामुळे लागणारें वेड.

४ था. ] पादसेवनभक्ति. ८५ मध्यें कोणी एक । म्हणतां होतसे सार्थक । नामस्मरणें पुण्यश्लोक¹ । होईजे स्वयें ॥ २० ॥ कांहींच न करून प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१ ॥ नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर । नाना दोषांचे गिरिवर² । रामनामें नासती ॥ २२ ॥ अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हालाहलापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी³ ॥ २३ ॥ चहूं वर्णांस नामाधिकार । नामीं नाहीं लहा- न थोर । जड मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४ ॥ म्हणोनि नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें । तिसरे भक्तीचें स्वभावें । लक्षण ऐसें ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके नामस्मरणनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ——— ४. पादसेवनभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागां जाहलें निरूपण । नामस्मरणाचें लक्षण । आतां ऐका पादसेवन । चौथी भक्ती ॥ १ ॥ पादसेवन तेंचि जाणावें । काया वाचा मनोभावें । सद्गुरूपाय सेवावे । सद्गतीकारणें ॥ २ ॥ या नांव पादसेवन । सद्गुरुपदीं अनन्यशरण । निरसाया जन्ममरण । यातायाती ॥ ३ ॥ सद्गुरुकृपेविण कांहीं । भवतरणोपाय नाहीं । या कारणें लवलाहीं । सद्गुरुपाद सेवावे ॥ ४ ॥ सद्वस्तु⁴ दाखवी सद्गुरु । सकळ सारासार विचारू । परब्रह्माचा निर्धारू । अंतरीं बाणे ॥ ५ ॥ ॥ जें वस्तु दृष्टी दिसेना । आणि मनासही भासेना । संगत्यागांविण येईना । अनुभवासी ॥ ६ ॥ अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागाविण अनुभव न दिसे । हें अनुभवासियासीच भासे । येरां गाथागोवी ॥ ७ ॥ संगत्याग⁵ आणि निवेदन⁶ । विदेहस्थिति अलिप्तपण । सहजस्थिति उन्मनीं⁷ विज्ञानं⁸ । हे सप्तहि एकरूपी ॥ ८ ॥ यां हीं वेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें । हें सकळहि पाद- ——— १. ज्याची कीर्ति गाणें पुण्यकारक आहे असा पुरुष. २. मोठमोठे पर्वत. ३. ज्याचे मस्तकीं चंद्र आहे तो, शिव. ४. ब्रह्म. ५. विषयासक्तीचा त्याग. ६. आत्मनिवेदन (द. ४, स. ९ पहा.). ७. समाधिस्थ योग्याची एक अवस्था. ८. ब्रह्मज्ञानाचा अनुभव.

८६ श्रीदासबोध. [ दशक सेवनें । उमजों लागे ॥ ९ ॥ वेदश्रुतिगर्भे वेदांते १ । सिद्धभावगर्भे सिद्धांते २ । अनुभव अनिर्वाच्य धादांते ३ । सत्य वस्तू ४ ॥ १० ॥ बहुधा अनुभवाचीं अंगें । सकळ कळती संतसंगें । चौथे भक्तीचे प्रसंगें । गौप्य तें प्रगटे ॥ ११ ॥ प्रकट असोनि नसे । गौप्य असोनि भासे । भासा अभासाहूनि अैनारिसे ५ । गुरुगम्य ६ मार्ग ॥ १२ ॥ मार्ग होय परी अंतरिक्ष । येथें सर्वहि पूर्वपक्ष । पाहूं जातां अलक्षं ७ । लक्षवेना ॥ १३ ॥ लक्षें जयासि लक्षावें । ध्यानें जयासि ध्यावें । तैसें तेंचि आपण व्हावें । त्रिविर्धा प्रचीती ८ ॥ १४ ॥ असो हीं अनुभवाचीं द्वारें । सकळ कळती सारासारविचारें । सत्संगेंकरूनि सत्योत्तरें । प्रत्ययासि येती ॥ १५ ॥ सत्य पाहतां नाहीं असत्य । असत्य पाहतां नाहीं सत्य । सत्यअस- त्यांचें कृत्य ॥ पाहणारापासीं ९ ॥ १६ ॥ पौहणार पौहणें जया लागलें । तें तद्रूपत्वें प्राप्त जाहलें । तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७ ॥ नाना समाधानें पाहतां । बाणती सद्गुरु करितां । सद्गुरूविण सर्वथा । स- न्मार्ग नसे ॥ १८ ॥ प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेप विद्याभ्यास । अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९ ॥ जें अभ्यासें अभ्या- सितां न ये । जें साधनें असाध्य होय । तें सद्गुरूविण काय । उमजों जाणे ॥ २० ॥ या कारणें ज्ञानमार्ग । कळाया धरावा सत्संग । सत्संगेंविण प्रसं- ग । बोलोंचि नये ॥ २१ ॥ सेवावे सद्गुरूचे चरण । या नांव पादसेवन । चौथे भक्तीचें लक्षण । तें हें निरूपिलें ॥ २२ ॥ देव ब्राह्मण महानुभाव । सत्पात्रें भजनाचा ठाव । ऐसिये ठायीं सद्भाव । सदृढ धरावा ॥ २३ ॥ हें प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें । परंतु सद्गुरुपाद सेवनें । या नांव पादसेवन ॥ २४ ॥ पादसेवन चौथी भक्ती । पावन कारितसे त्रिज- गती । जयेकरितां सायुज्यमुक्ती । साधकांसि होय ॥ २५ ॥ म्हणोनि येराहूनि थोर । चौथे भक्तीचा निर्धार । जयेकरितां पैलपार । बहुत १. शास्त्रांतील विचार. २. सिद्ध पुरुषांचा अनुभव. ३. गुरूचा अनुभव. ४. स्वतःचा अनुभव. ५. वेगळे. ६. गुरुकृपेनेंच साध्य. ७. अचिंत्य ब्रह्म. ८. शास्त्राचा, गुरूचा व स्वतःचा अनुभव. ९. पहाणारा व पहाणें हा भेदभाव ज्यावर अधिष्ठित आहे तें ब्रह्म सर्वत्र एकरूप आहे असें कळलें तर. १० महात्मे.

४ था. ] अर्चनभक्ति. ८७ प्राणी पावती ॥ २६ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके पाद- सेवनभक्तिनिरूपणं नाम चतुर्थः समासः ॥ ४ ॥ . ५. अर्चनभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागें जाहलें निरूपण । चौथे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । पांचवी भक्ती ॥ १ ॥ पांचवी भक्ती ते अर्चन । अर्चन म्हणजे देवतार्चन । शास्त्रोक्त पूजाविधान । केलें पाहिजे ॥ २ ॥ नाना साधनें उपकरणें । वस्त्रें अलंकार भूषणें । मानसपूजा मूर्तिध्यानें । या नांव पांचवी भक्ती ॥ ३ ॥ देव ब्राह्मण अग्निपूजन । संत साधु अतिथिपूजन । यति महानुभाव गायत्रीपूजन । या नांव पांचवी भक्ती ॥ ४ ॥ धातु पाषाण मृत्तिकापूजन । चित्रलेप सत्पात्र पूजन । आपुले गृहींचें देवतार्चन । या नांव पांचवी भक्ती ॥ ५ ॥ शिळा सप्तांकित नवांकित । शाळग्राम शकलें चक्रांकित । लिंगें सूर्यकांत सोमकांत । बाण तांदळे नर्मेंदे ॥ ६ ॥ भैरव- भगवती मल्हारी । मुंजा नृसिंह बनशंकरी । नाग नागिणी नानापरी । पंचायतनपूजा ॥ ७ ॥ गणेश शारदा विठ्ठलमूर्ती । रंगनाथ जगन्नाथ तांडव- मूर्ती । श्रीहनुमंत गरुडमूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ ८ ॥ मत्स्य कूर्म वराहमूर्ती । नृसिंह भार्गव वामनमूर्ती । राम कृष्ण हयग्रीवमूर्ती । देवता- र्चनीं पूजाव्या ॥ ९ ॥ केशव नारायण माधवमूर्ती । गोविंद विष्णु मधु- सूदनमूर्ती । त्रिविक्रम वामन श्रीधरमूर्ती । हृषीकेश पद्मनाभ ॥ १० ॥ दामोदर संकर्षण वासुदेवमूर्ती । प्रद्युम्न अनिरुद्ध पुरुषोत्तममूर्ती । अधोक्षज नारसिंह अच्युतमूर्ती । जनार्दन आणि उपेंद्र ॥ ११ ॥ हरिहरांच्या अनंत मूर्ती । भगवंत जगदात्मा जगदीशमूर्ती । शिवशक्तींच्या बहुधा मूर्ती । देवतार्चनीं पूजाव्या ॥ १२ ॥ अश्वत्थनारायण सूर्यनारायण । लक्ष्मीनारा- यण श्रीमन्नारायण । श्रीहरिनारायण आदिनारायण । शेषशायी परमात्मा

१. गोपीचंदनाची किंवा गंधाची मूर्ति. २. चक्राकार चिन्ह असलेली. ३. शेंदूर लावलेले दगड. ४. नर्मदेंत सांपडणारे. ५. विष्णु, गणपति, शंकर, देवी व सूर्य या पाचांची एकत्र पूजा. ६. नृत्य करतेशी मूर्ति. ७. परशुराम. ८. पिंपळाचे ठायीं असलेला देवाचा अंश. ९. श्रीविष्णु.

८८ श्रीदासबोध. [ दशक

॥ १३ ॥ ऐशा परमेश्वराच्या मूर्ती । पाहूं जातां उदंड असती । त्यांचें अर्चन करावें भक्ती । पांचवी ऐसी ॥ १४ ॥ यांहि वेगळे कुळधर्म । सोडूं नये अनुक्रम । उत्तम अथवा मध्यम । करीत जावे ॥ १५ ॥ जाखमाता माय- राणी । बाळा बगळा मानवणी । पूजामाचणी जोगिणी । कुळधर्म करावे ॥ १६ ॥ नाना तीर्थीं क्षेत्रीं जावें । तेथें त्या देवाचें पूजन करावें । नाना उपचारें पूजावें । परमात्मयासी ॥ १७ ॥ पंचामृत गंधाक्षतें । पुष्पे परि- मळद्रव्यें¹ बहुतें । धूप दीप असंख्यतें । नीरांजनें कर्पूराचीं ॥ १८ ॥ नाना खाद्य नैवेद्य सुंदर । नाना फळें तांबूल प्रकार । दक्षिणा नाना अलंकार । दिव्यांबरें² वनमाळा³ ॥ १९ ॥ शिबिका छत्रें सुखासनें । महा मेघडंबर⁴ सूर्य- पानें⁵ । दिंड्या पताका निशानें । ताल डोल मृदंग ॥ २० ॥ नाना वाद्यें नाना उत्सव । नाना भक्तसमुदाय । गाती हरिदास सद्भाव । लागला भग- वंतीं ॥ २१ ॥ वापी कूप सरोवरें । नाना देवालयें शिखरें । राजांगणें⁶ मनोहरें । वृंदावनें भुयारीं ॥ २२ ॥ मठ मंडप धर्मशाळा । देवद्वारीं पड- शाळा । नाना उपकरणें नक्षत्रमाळा⁷ । नाना वस्त्रसामुग्री ॥ २३ ॥ नाना पडदे मंडप चांदवे⁸ । नाना रत्‍नें घोंस लोंवती बरवे । नाना देवालयीं सम- र्पावे । हस्ती घोडे शकटें⁹ ॥ २४ ॥ अलंकार आणि अलंकारपात्रें । द्रव्य आणि द्रव्यपात्रें । अन्नोदक आणि अन्नोदकपात्रें । नाना प्रकारचीं ॥ २५ ॥ वनें उपवनें पुष्पवाटिका । तापसांच्या पर्णकुटिका¹⁰ । ऐसी पूजा जगन्नायका । यथासांग समर्पावी ॥ २६ ॥ शुक सारिका¹¹ मयूरें । बदकें चक्रवाकें चकोरें । कोकिळा चितळें¹² सामरें । देवालयीं समर्पावीं ॥ २७ ॥ सुगंधमृगें¹³ आणि मांजरें¹⁴ । गाई महिषी वृषभ वानरें । नाना पदार्थ आणि लेंकुरें । देवा- लयीं समर्पावीं ॥ २८ ॥ काया वाचा आणि मनें । चित्तें वित्तें आणि प्राणें । सद्भावें भगवदर्चनें । या नांव अर्चनभक्ती ॥ २९ ॥ ऐसेंचि सद्गुरूचें भजन । करूनि असावें अनन्य¹⁵ । या नांव भगवद्भजन । पांचवी भक्ती ॥ ३० ॥ ऐसी


१. सुवासिक पदार्थ. २. उंची वस्त्रें. ३. वन्य पुष्पांची माळ. ४. उंच छत्री. ५. अब्दागिरी ६. चौक. ७. सत्तावीस मोत्यांची कंठी. ८. छतें. ९. गाडे. १०. झोंपडी. ११. मैना. १२. चित्ते. १३. कस्तुरीमृग. १४. जवादी मांजरें. १५. एकनिष्ठ.

४ था. ] वंदनभक्ति. ८९ पूजा न घडे बरवी । तरी मानसपूजा करावी । मानसपूजा अगत्य व्हावी । परमेश्वरासी ॥ ३१ ॥ मनें भगवंतासि पूजावें । कल्पून सर्वहि समर्पावें । मानसपूजेचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३२ ॥ जें जें आपणासि पाहिजे । तें तें कल्पून वाहिजे । येणें प्रकारें कीजे मानसपूजा ॥ ३३ ॥ इति श्री- दासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके अर्चनभक्तिनिरुपणं नाम पंचमः समासः ॥ ५ ॥ ६. वंदनभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागें झालें निरूपण । पांचवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । सहावी भक्ती ॥ १ ॥ सहावी भक्ती ते वंदन । करावें देवासि नमन । संत साधु आणि सज्जन । नमस्कारीत जावे ॥ २ ॥ सूर्यास करावे नमस्कार । देवासि करावे नमस्कार । सद्गुरूस करावे नम- स्कार । साष्टांग भावें ॥ ३ ॥ साष्टांग नमस्कारासि अधिकारू । नाना प्र- तिमा देव गुरू । अन्यत्र नमनाचा विचारू । अधिकारें करावा ॥ ४ ॥ छप्पन्न कोटी वसुमती-। मध्यें विष्णुमूर्ती असती । तयांस नमस्कार प्रीतीं । साष्टांग घालावे ॥ ५ ॥ पशुपती श्रीपती आणि गर्मेस्ती । यांच्या दर्शनें दोष जाती । तैसाचि नमावा मारुती । नित्य नेमें विशेष ॥ ६ ॥ श्लोक ॥ शंकरः शेषशायी च मार्तंडो मारुतिस्तथा । एतेषां दर्शनं पुण्यं नित्यनेमे विशेषतः ॥ १ ॥ भक्त ज्ञानी आणि वीतरागी । महानुभाव तापसी योगी । सत्पात्र देखोनि वेगीं । नमस्कार घालावे ॥ ७ ॥ वेदशास्त्रज्ञ आणि सर्वज्ञ । पंडित पुराणिक आणि विद्वज्जन । याज्ञिक वैदिक पवित्र जन । नमस्कारीत जावे ॥ ८ ॥ जेथें दिसती विशेष गुण । तेंचि सद्गुरूचें अधि- ष्ठान । या कारणें तयासिनमन । अत्यादरें करावें ॥ ९ ॥ गणेश शारदा नाना शक्ती । हरिहरांच्या अनंत मूर्ती । नाना देव सांगूं किती । पृथगाँ- कारें ॥ १० ॥ सर्व देवांसि नमस्करिलें । तें एका भगवंतासि पावलें । यदर्थी वचन बोलिलें । आहे तें ऐका ॥ ११ ॥ श्लोक ॥ आकाशात्पतितं १. पृथ्वी. २. शंकर. ३. विष्णु. ४. सूर्य. ५. आसक्ति नाहीं असे. ६. देवी. ७. निरनिराळ्या रूपानें.

तोयं यथा गच्छति सागरम् । सर्वदेवनमकारः केशवं प्रतिगच्छति ॥ १ ॥ या कारणें सर्व देवांसी । नमस्करावें अत्यादरेंसीं । अधिष्ठान मानितां दे- वांसी । परम सौख्य वाटे ॥ १२ ॥ नाना देवांचीं अधिष्ठानें । सत्पात्र स- द्गुरूचीं स्थानें । या कारणें नमस्कार करणें । उभयमार्गीं ॥ १३ ॥ न- मस्कारें लीनता घडे । नमस्कारें विकल्प मोडे । नमस्कारें सख्य घडे । सत्पात्रासी ॥ १४ ॥ नमस्कारें दोष जाती । नमस्कारें अन्याय क्षमिती । नमस्कारें मोडलीं जडती । समाधानें ॥ १५ ॥ सीसापरता नाहीं दंड । ऐसें बोलती उदंड । या कारणें अखंड । देवभक्त वंदावे ॥ १६ ॥ नम- स्कारें कृपा उचंबळे । नमस्कारें प्रसन्नता प्रबळे । नमस्कारें गुरुदेव वोळे । साधकावरी ॥ १७ ॥ विशेषें करितां नमस्कार । नासती दोषांचे गिरिवर । आणि मुख्य परमेश्वर । कृपा करी ॥ १८ ॥ नमस्कारें पतित पावन । न- मस्कारें संतांसि शरण । नमस्कारें जन्ममरण । दूरी दूरावे ॥ १९ ॥ परम अन्याय करून आला । आणि साष्टांग नमस्कार घातला । तरी तो अ- न्याय क्षमा केला । पाहिजे श्रेष्ठों ॥ २० ॥ या कारणें नमस्कारापरतें । आणिक नाहीं अनुसरंतें । नमस्कारें प्राणियांतें । सद्बुद्धि लागे ॥ २१ ॥ नमस्कारासि वेंचावें नलगे । नमस्कारासि कष्टावें नलगे । नमस्कारासि कांहींच नलगे । उपकरणसामुग्री ॥ २२ ॥ नमस्करा ऐसें नाहीं सोपें । न- मस्कार करावा अनन्यरूपें । नाना साधनीं साक्षेपें । कासया शिणावें ॥ २३ ॥ साधक भावें नमस्कार घाली । त्याची चिंता साधूस लागली । सुगम पंथें नेऊन घाली । जेथलि तेथें ॥ २४ ॥ या कारणें नमस्कार श्रेष्ठ । नमस्कारें वोळती वरिष्ठ । येथें सांगितली स्पष्ट । सहावी भक्ती ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके वंदनभक्तिनिरूपणं नाम षष्ठः समासः ॥ ६ ॥


७. दास्यभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागें जाहलें निरूपण । सहावे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । सातवी भक्ती ॥ १ ॥ सातवें भजन दास्य जाणावें ।


टिपा: १. देव व गुरु यांस. २. मस्तकापेक्षां. ३. ग्राह्य. ४. परिश्रमानें.

२. दशक ६-१०: देव-शोधन, चतुर्दश-ब्रह्म, माया-निरीक्षण एवं सिद्ध-लक्षण

पडिलें कार्य तितुकें करावें । सदा सन्निधचि असावें । देवद्वारीं ॥ २ ॥ दे- वाचें वैभव सांभाळावें । न्यूनपूर्ण पडूंचि न द्यावें । चढतें वाढतें वाढवावें । पूजन देवाचें ॥ ३ ॥ भंगलीं देवालयें करावीं । मोडलीं सरोवेरें बांधावीं । सोपे धर्मशाळा चालवावीं । नूतनचि कार्ये ॥ ४ ॥ नाना रचना जीर्ण ज- र्जर । त्यांचे करावे जीर्णोद्धार । पडिलें कार्य तें सत्वर । चालवीत जावें ॥ ५ ॥ गज रथ तुरंगें सिंहासनें । चौकिया सिबिका सुखासनें । मंचक डो- ल्हारे विमानें । नूतनचि करावीं ॥ ६ ॥ मेघडंबरें छत्रे चामरें । सूर्यपानें निशाणें अपारें । नित्य नूतन अत्यादरें । सांभाळीत जावीं ॥ ७ ॥ नाना प्रकारचीं यानें । बैसावयाचीं उत्तम स्थानें । बहुविध सुवर्णासनें । यत्नें करीत जावीं ॥ ८॥ सुर्वनें पेठ्या कोठ्या मांडुसां । राजकोहळी घागरी बहुवसा । सं- पूर्ण द्रव्यांश ऐसा । अति यत्नें करावा ॥९॥ भुयारीं तळघरें आणि विवरें । नाना स्थळें गुप्तद्वारें । अनर्घ्य वस्तूंचीं भांडारें । यत्नें करीत जावीं ॥१०॥ अलंकार भूषणें दिव्यांबरें । नाना रत्नें मनोहरें । नाना धातु सुवर्णपात्रे । यत्नें क- रीत जावीं ॥ ११ ॥ पुष्पवाटिका नाना वनें । नाना तरुवरांची बनै । पावतीं करावी जीवनें । तयां वृक्षांसी ॥ १२ ॥ नाना पशूंचिया शाळा । नाना पक्षी चित्रशाळा । नाना वाद्ये नाटकशाळा । गुणी गायक बहु- साल ॥ १३ ॥ स्वयंपाकगृहें भोजनशाळा । सामुग्रीगृहें धर्मशाळा । निद्रि- स्ताकारणें पडशाळा । विशाल स्थानें ॥ १४ ॥ नाना परिमळद्रव्यांचीं स्थ- ळें । नाना खायफळांची स्थळें । नाना रसांची नाना स्थळें । यत्नें करीत जावीं ॥ १५ ॥ नाना वस्तूंचीं नाना स्थानें । भंगलीं करावीं नूतनें । दे- वाचें वैभव वचनें । किती म्हणोनि सांगावें ॥ १६ ॥ सर्वांठायीं अतिसादर । आणि दास्यत्वासहि तत्पर । कार्यभागाचा विसर । पडणार नाहीं ॥ १७ ॥ जयंत्या पर्व्वे महोत्सव । असंभाव्य चालवावें वैभव । जें देखतांचि स्वर्गी- चे देव । संतुष्ट होती ॥ १८ ॥ ऐसें वैभव चालवावें । आणि नीच दास्य- त्वहि करावें । पडिले प्रसंगी सावध असावें । सर्वकाळ ॥ १९ ॥ जें जें कांहीं पाहिजे । तें तें तत्काळची दिजे । अत्यंत आवडीं किजे । सकळ सेवा

१. कमजास्त, गैरसोय. २. तलाव. ३. घोडे. ४. चौरंग. ५. वाहनें. ६. मंदिरे. ७. मोठ्या पेट्या. ८. अमोल. ९. फुलांचे ताटवे. १०. पाणी.

९२ श्रीदासबोध. [ दशक

॥ २० ॥ चरणक्षालनें स्नानें आचमनें । गंधाक्षतें वसनें भूषणें । आसनें जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१ ॥ शयनाकारणें उत्तम स्थ- ळें । जळें ठेवावीं सुशीतळें । तांबूल गायनें रसाळें । रागरंगें करावी ॥ २२ ॥ परिमळद्रव्यें आणि फुलें । नाना सुगंधिक तैलें । खाद्य फळें बहुमालें । स- न्निधाचि असावीं ॥ २३ ॥ सडे संमार्जनें करावी । उदकपात्रे उदकें भरावीं । वसनें प्रक्षाळून आणावीं । उत्तमोत्तम ॥ २४ ॥ सकळांचें करावें परिपत्यें । आलियाचें करावें आतिथ्यें । ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ति ॥ २५ ॥ वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं । अंतरें निवती सकळांचीं । ऐसें वदावें ॥ २६ ॥ ऐसी हे सातवी भक्ती । निरूपिली यथामती । प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥ २७ ॥ ऐसें दास्य करावें देवाचें । येणेंचि प्रकारें सद्गुरूचें । प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करीत जावें ॥ २८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके दास्यभक्तिनिरू- पणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥


८. सख्यभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागें जाहलें निरूपण । सातवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १ ॥ देवासी परम सख्य करावें । प्रेमप्रीतीनें बांधावें । आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २ ॥ देवास जयाची अत्यंत प्रीति । आपण वर्तावें तेणेंचि रीतीं । येणेंकरितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ ३ ॥ भक्ती भाव आणि भजन । निरूपण आणि कथा कीर्तन । प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४ ॥ आपण तैसेंचि वर्तावें । आपणासि तेंच आवडावें । मनासारिखें होतांचि स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥ ५ ॥ देवाच्या सख्यत्वाकारणें । आपुलें सौख्य सोडून देणें । अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचायें ॥ ६ ॥ सांडून आपली संसार- व्यथा । करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्या- च सांगाव्या ॥ ७ ॥ देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी । सर्व अर्पावें शेवटीं । प्राण तोहि वेंचाय ॥ ८ ॥ आपुलें अवघेंचि जावें ।


१. पाय धुणें. २. वस्त्रें. ३. सोय. ४. आदरसत्कार..

४ था. ] 'सख्यभक्ति. ९३ परी देवासि सख्य राहावें । ऐसी प्रीति जीवें भावें । भगवंतीं लागावी ॥ ९ ॥ देव म्हणिजे आपुला प्राण । प्राणासि न करावें निर्वाण^१ । प्रेम- प्रीतीचें लक्षण । तें हें ऐसें असे ॥ १० ॥ ऐसें परम सख्य धरितां । देवास लागे भक्ताची चिंता । पांडव लाक्षाजोहरीं^२ जळतां । विवरद्वारें काढिले ॥ ११ ॥ देव सख्यत्वें राहे आपणापासीं । हें तों वर्म आपणाचपासीं । आ- पण वचनें बोलावीं जैसीं । तैसीं येतीं पैडसादें^३ ॥ १२ ॥ आपण असतां अनन्य- भावें । देव तात्काळचि पावे । आपण त्रास घेतां जीवें । देवही त्रासे ॥ १३ ॥ ॥ श्लोकार्ध ॥ :ये यथा मां प्रपद्यंते तांस्तथैव भजाम्यहम् ॥ टीका ॥ जैसें जयाचें भजन । तैसाच देवहि आपण । म्हणोनि हें अवघेंच जाण । आप- णाचिपासीं ॥ १४ ॥ आपुल्या मनासारिखें न घडे । तेणें गुणें निष्ठा मोडे । तरी गोष्टी आपणाकडे । सहजचि आली ॥ १५ ॥ मेघ चातकावरी घोळे- ना । तरी चातक पाटलेना । चंद्र वेळेसि उगवेना । तरी चकोर अनन्य^४ ॥ १६ ॥ ऐसें असावें सख्यत्व । विवेकें धरावें सत्व^५ । भगवंतावरील ममत्व^६ । सांडूं नये कीं ॥ १७ ॥ सखा मानावा भगवंत । माता पिता गण गोत । विद्या लक्ष्मी^७ धन वित्त । सकळहि परमात्मा ॥ १८ ॥ देवावेगळें कोणी नाहीं । ऐसें बोलती सर्वही । परंतु त्यांची निष्ठा कांहीं । तैसीच नसे ॥ १९ ॥ म्ह- णोनि ऐसें न करावें । सख्य तरी खरेंच करावें । अंतरीं सदृढ धरावें । परमे- श्वरासी ॥ २० ॥ आपुलिया मनोरथाकारणें^८ । देवावरी क्रोधासि येणें । ऐसीं नव्हत कीं लक्षणें । सख्यभक्तीचीं ॥ २१ ॥ देवाचें जें मनोगत । तेंच आपुलें हित निश्चित । इच्छेसाठीं भगवंत । अंतरूं नये कीं ॥ २२ ॥ देवाचे इच्छेनें वर्तावें । देव करिल तें मानावें । मग सहजचि भावें । कृपाळु देव ॥ २३ ॥ पाहतां देवाचे कृपेसी । मातेची कृपा कायसी । माता वधी बाळ- कासी । विपत्तिकार्ळी^९ ॥ २४ ॥ देवें भक्त कोण वधिला । कधीं देखिला ना ऐकिला । शरणागतांसि देव झाला । वज्रपंजरूं^१० ॥ २५ ॥ देव भक्तांचा कैवारी । देव पतितांसि तारी । देव होय सहाकारी । अनाथांचा ॥ २६ ॥ १. शेवट, नाश. २. लाक्षागृहांत, लाखेच्या घरांत. ३. प्रतिध्वनि. ४. एकनिष्ठ. ५. धीर. ६. प्रेम. ७. ऐश्वर्य. ८. मनोरथ साधण्यासाठीं. ९. संकटाचे वेळीं. १०. वज्रासारखा बळकट आसरा.

९४ श्रीदासबोध. [ दशक देव अनाथांचा कै¹पक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धाविन्नला अंतर²साक्षी गजेंद्राकारणें ॥ २७ ॥ देव कृपेचा सागर । देव करुणेचा जल³धर । देवासि भक्तांचा विसर । पडणार नाहीं ॥ २८ ॥ देव प्रीति राखो जाणे । देवासि करावें सो⁴जणें । जीवलगें अवघीं पिसुनें । कामा न येती ॥ २९ ॥ सख्य देवाचें तुटेना । प्रीति देवाची विटेना । देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३० ॥ म्हणोनि सख्य देवासि करावें । हितगुज तयास सांगावें । आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१॥ जैसा देव तैसा गुरु । शास्त्र बोलिला हा विचार । म्हणोनि सख्यत्वाचा निधा⁶रु । सद्गुरूसि असावा ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके सख्यभक्तिनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. आत्मनिवेदन. श्रीगणेशाय नमः ॥ मार्गे जाहलें निरूपण । आठवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । नववी भक्ती ॥ १ ॥ नवम निवेदन जाणावें । आत्मनिवेदन करावें । तेंही सांगिजेल स्वभावें । प्रांजळ करूनी ॥२॥ ऐका निवेदनाचें लक्षण । देवासि वाहावें आपण । करावें तत्वविवरण । म्हणिजे कळे ॥३॥ मी भक्त ऐसें म्हणावें । आणि वि⁵भक्तिपणें भजावें । हें अवघेंचि जाणावें । विलक्षण ॥४॥ लक्षण असोनि विलक्षण । ज्ञान असोनि अज्ञान । भक्त असोन विभक्तपण । तें हें ऐसें ॥५॥ भक्त म्हणजे विभक्त नव्हे । आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे । विचारेंविण कांहींच नव्हे । समाधान ॥ ६ ॥ तस्मात् विचार करावा । देव कोण तो ओळखावा । आपला आपण शोध घ्यावा । अंतर्यामीं ॥ ७ ॥ मी कोण ऐसा निवाडा । पाहों जातां तत्व⁷झाडा । विचार पाहतां उघडा । आपण नाहीं ॥ ८ ॥ तत्वें तत्व जेव्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे । आ⁸त्मनिवेदन तेणें प्रकारें । सहजचि झालें ॥ ९ ॥ तत्त्वरूप सकळ भासे । विवेक पाहतां निरसे । प्र९कृति निरसे आत्मा १. कैवारी. २. मनोभाव जाणणारा. ३. मेघ. ४. मैत्री. ५. देव आपणांहून भिन्न आहे, अशा भावनेनें. ६. मनाशीं. ७. पंचतत्त्वें वेगळीं काढून पाहणें. ८. आपण नाहीं, सर्व ईश्वरच आहे, अशी भावना. ९. माया.