दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 121, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८६ श्रीदासबोध. [ दशक सेवनें । उमजों लागे ॥ ९ ॥ वेदश्रुतिगर्भे वेदांते १ । सिद्धभावगर्भे सिद्धांते २ । अनुभव अनिर्वाच्य धादांते ३ । सत्य वस्तू ४ ॥ १० ॥ बहुधा अनुभवाचीं अंगें । सकळ कळती संतसंगें । चौथे भक्तीचे प्रसंगें । गौप्य तें प्रगटे ॥ ११ ॥ प्रकट असोनि नसे । गौप्य असोनि भासे । भासा अभासाहूनि अैनारिसे ५ । गुरुगम्य ६ मार्ग ॥ १२ ॥ मार्ग होय परी अंतरिक्ष । येथें सर्वहि पूर्वपक्ष । पाहूं जातां अलक्षं ७ । लक्षवेना ॥ १३ ॥ लक्षें जयासि लक्षावें । ध्यानें जयासि ध्यावें । तैसें तेंचि आपण व्हावें । त्रिविर्धा प्रचीती ८ ॥ १४ ॥ असो हीं अनुभवाचीं द्वारें । सकळ कळती सारासारविचारें । सत्संगेंकरूनि सत्योत्तरें । प्रत्ययासि येती ॥ १५ ॥ सत्य पाहतां नाहीं असत्य । असत्य पाहतां नाहीं सत्य । सत्यअस- त्यांचें कृत्य ॥ पाहणारापासीं ९ ॥ १६ ॥ पौहणार पौहणें जया लागलें । तें तद्रूपत्वें प्राप्त जाहलें । तरी मग जाणावें बाणलें । समाधान ॥ १७ ॥ नाना समाधानें पाहतां । बाणती सद्गुरु करितां । सद्गुरूविण सर्वथा । स- न्मार्ग नसे ॥ १८ ॥ प्रयोग साधनें सायास । नाना साक्षेप विद्याभ्यास । अभ्यासें कांहीं गुरुगम्यास । पाविजेत नाहीं ॥ १९ ॥ जें अभ्यासें अभ्या- सितां न ये । जें साधनें असाध्य होय । तें सद्गुरूविण काय । उमजों जाणे ॥ २० ॥ या कारणें ज्ञानमार्ग । कळाया धरावा सत्संग । सत्संगेंविण प्रसं- ग । बोलोंचि नये ॥ २१ ॥ सेवावे सद्गुरूचे चरण । या नांव पादसेवन । चौथे भक्तीचें लक्षण । तें हें निरूपिलें ॥ २२ ॥ देव ब्राह्मण महानुभाव । सत्पात्रें भजनाचा ठाव । ऐसिये ठायीं सद्भाव । सदृढ धरावा ॥ २३ ॥ हें प्रवृत्तीचें बोलणें । बोलिलें रक्षाया कारणें । परंतु सद्गुरुपाद सेवनें । या नांव पादसेवन ॥ २४ ॥ पादसेवन चौथी भक्ती । पावन कारितसे त्रिज- गती । जयेकरितां सायुज्यमुक्ती । साधकांसि होय ॥ २५ ॥ म्हणोनि येराहूनि थोर । चौथे भक्तीचा निर्धार । जयेकरितां पैलपार । बहुत १. शास्त्रांतील विचार. २. सिद्ध पुरुषांचा अनुभव. ३. गुरूचा अनुभव. ४. स्वतःचा अनुभव. ५. वेगळे. ६. गुरुकृपेनेंच साध्य. ७. अचिंत्य ब्रह्म. ८. शास्त्राचा, गुरूचा व स्वतःचा अनुभव. ९. पहाणारा व पहाणें हा भेदभाव ज्यावर अधिष्ठित आहे तें ब्रह्म सर्वत्र एकरूप आहे असें कळलें तर. १० महात्मे.