दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 120, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें४ था. ] पादसेवनभक्ति. ८५ मध्यें कोणी एक । म्हणतां होतसे सार्थक । नामस्मरणें पुण्यश्लोक¹ । होईजे स्वयें ॥ २० ॥ कांहींच न करून प्राणी । रामनाम जपे वाणी । तेणें संतुष्ट चक्रपाणी । भक्तांलागीं सांभाळी ॥ २१ ॥ नाम स्मरे निरंतर । तें जाणावें पुण्यशरीर । नाना दोषांचे गिरिवर² । रामनामें नासती ॥ २२ ॥ अगाध महिमा न वचे वदला । नामें बहुत जन उद्धरला । हालाहलापासून सुटला । प्रत्यक्ष चंद्रमौळी³ ॥ २३ ॥ चहूं वर्णांस नामाधिकार । नामीं नाहीं लहा- न थोर । जड मूढ पैलपार । पावती नामें ॥ २४ ॥ म्हणोनि नाम अखंड स्मरावें । रूप मनीं आठवावें । तिसरे भक्तीचें स्वभावें । लक्षण ऐसें ॥ २५ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके नामस्मरणनिरूपणं नाम तृतीयः समासः ॥ ३ ॥ ——— ४. पादसेवनभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागां जाहलें निरूपण । नामस्मरणाचें लक्षण । आतां ऐका पादसेवन । चौथी भक्ती ॥ १ ॥ पादसेवन तेंचि जाणावें । काया वाचा मनोभावें । सद्गुरूपाय सेवावे । सद्गतीकारणें ॥ २ ॥ या नांव पादसेवन । सद्गुरुपदीं अनन्यशरण । निरसाया जन्ममरण । यातायाती ॥ ३ ॥ सद्गुरुकृपेविण कांहीं । भवतरणोपाय नाहीं । या कारणें लवलाहीं । सद्गुरुपाद सेवावे ॥ ४ ॥ सद्वस्तु⁴ दाखवी सद्गुरु । सकळ सारासार विचारू । परब्रह्माचा निर्धारू । अंतरीं बाणे ॥ ५ ॥ ॥ जें वस्तु दृष्टी दिसेना । आणि मनासही भासेना । संगत्यागांविण येईना । अनुभवासी ॥ ६ ॥ अनुभव घेतां संगत्याग नसे । संगत्यागाविण अनुभव न दिसे । हें अनुभवासियासीच भासे । येरां गाथागोवी ॥ ७ ॥ संगत्याग⁵ आणि निवेदन⁶ । विदेहस्थिति अलिप्तपण । सहजस्थिति उन्मनीं⁷ विज्ञानं⁸ । हे सप्तहि एकरूपी ॥ ८ ॥ यां हीं वेगळीं नामाभिधानें । समाधानाचीं संकेतवचनें । हें सकळहि पाद- ——— १. ज्याची कीर्ति गाणें पुण्यकारक आहे असा पुरुष. २. मोठमोठे पर्वत. ३. ज्याचे मस्तकीं चंद्र आहे तो, शिव. ४. ब्रह्म. ५. विषयासक्तीचा त्याग. ६. आत्मनिवेदन (द. ४, स. ९ पहा.). ७. समाधिस्थ योग्याची एक अवस्था. ८. ब्रह्मज्ञानाचा अनुभव.