दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 119, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८४ श्रीदासबोध. [ दशक ३. स्मरणभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागां निरूपिलें कीर्तन । जें सकळांसि करी पावन । आतां ऐका विष्णुस्मरण । तिसरी भक्ती ॥ १ ॥ स्मरण देवाचें करावें । अखंड नाम जपत जावें । नामस्मरणें पावावें । समाधान ॥ २ ॥ नित्य नेम प्रातःकाळीं । मध्यान्हकाळीं सायंकाळीं । नामस्मरण सर्वकाळीं । करीत जावें ॥ ३ ॥ सुख दुःख उद्वेग चिंता । अथवा आनंदरूप असतां । नामस्मरणेंविण सर्वथा । राहोंचि नये ॥ ४ ॥ हर्षकाळीं विषमकाळीं । पर्वकाळीं प्रस्तावकाळीं । विश्रांतिककाळीं निद्राकाळीं । नामस्मरण करावें ॥ ५ ॥ कोडें सांकडें संकट । नाना संसारखटपट । अवस्था लागतां चटपट । नाम- स्मरण करावें ॥ ६ ॥ चालतां बोलतां धंदा करितां । खातां जेवितां सुखी होतां । नाना उपभोग भोगितां । नाम विसरूं नये ॥ ७ ॥ संपत्ति अथवा विपत्ती । जैसी पडेल काळगती । परी नामस्मरणाची स्थिति । सांडूंच नये ॥ ८ ॥ वैभव सामर्थ्य आणि सत्ता । नाना पदार्थ चालतां । उत्कट भाग्यश्री भोगितां । नाम सांडूं नये ॥ ९ ॥ आधीं अवदसा मग दशा । अथवा दशे उपरी अवदसा । प्रसंग असो भलतैसा । परंतु नाम सांडूं नये ॥ १० ॥ नामें संकटें नासती । नामें विघ्नें निवारिती । नामस्मरणें पाविजती । उत्तम पद ॥ ११ ॥ भूत पिशाच नाना छंद । ब्रह्मग्रह ब्राह्मणसंबंध । मंत्रंचळ नाना खेद । नामनिष्ठें नासती ॥ १२ ॥ नामें विषबाधा हरती । नामें चेंडें चेटकें ना- सती । नामें होय उत्तम गती । अंतकाळीं ॥ १३ ॥ बाळपणीं तरुणकाळीं । कठिनकाळीं वृद्धापकाळीं । सर्वकाळीं अंतकाळीं । नामस्मरण असावें ॥ १४ ॥ नामांचा महिमा जाणे शंकर । जनां उपदेशी विश्वेश्वर । वाराणसी मुक्ति- क्षेत्र । रामनामेंकरूनी ॥ १५ ॥ उफराठ्या नामासाठीं । वाल्मीक तरला उठाउठी । भविष्य वदला शतकोटी । चरित्र रघुनाथाचें ॥ १६ ॥ हरिनामें प्रल्हाद तरला । नाना आघातांपासून सुटला । नारायणनामें पावन झाला । अजामेळ ॥ १७ ॥ नामें पाषाण तरले । असंख्यात भक्त उद्धरले । महापापी तेचि झाले । परम पवित्र ॥ १८ ॥ परमेश्वराचीं अनंत नामें । स्मरतां तरिजे नित्य नेमें । नाम स्मरितां यमें । बाधिजेना । १९ ॥ सहस्र नामां- १. मंत्रप्रयोगांत दोष घडल्यामुळे लागणारें वेड.