भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 118, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 118

४ था. ] कीर्तनभक्ति. ८३ प्रांजळ बोलावें ॥ १६ ॥ प्रसंगीं हरिकथा करावी । सगुणीं सगुण कीर्ति धरावी । निर्गुणप्रसंगीं वाढवावी । अध्यात्मविद्या ॥ १७ ॥ पूर्वपक्ष त्यागून सिद्धांत । निरूपण करावें नेमस्त । बहुधा बोलणें अस्तान्यस्त । बोलोंचि नये ॥ १८ ॥ करावें वेदपारायण । सांगावें जनांसि पुराण । मायाब्रह्मींचें विवरण । साकल्यें वदावें ॥ १९ ॥ ब्राह्मण्य रक्षावें आदरें । उपासनेचीं भजनद्वारें । गुरुपरंपरा निर्धारें । चळोंच न द्यावी ॥ २० ॥ करावें वैराग्य- रक्षण । रक्षावें ज्ञानाचें लक्षण । परमदक्ष विचक्षण । सर्वहि सांभाळी ॥ २१ ॥ सत्य समाधान तें उडे । नीति न्याय साधन मोडे । जेणें सद्भाव बिघडे । ऐसें न बोलावें ॥ २२ ॥ सगुण हरिकथा या नांव कीर्तन । अद्वैतें म्हणजे निरूपण । सगुण रचून निर्गुण । बोलत जावें ॥ २३ ॥ असो वक्तृत्वाचा अधिकार । अल्पास न घडे प्रत्युत्तर । वक्ता पाहिजे साचार । अनुभवाचा ॥ २४ ॥ सकळ रचून ज्ञान सांगे । जेणें वेदाज्ञा न भंगे । उत्तम सन्मार्ग लागे । प्राणिमात्रांसी ॥ २५॥ असो हें सकळहि सांडून । करावें गुणानुवाद- कीर्तन । या नांव भगवद्भजन । दुसरी भक्ती ॥ २६ ॥ कीर्तनें महा दोष जाती । कीर्तनें होय उत्तम गती । कीर्तनें भगवत्प्राप्ती । यदर्थी संशय नाहीं ॥ २७ ॥ कीर्तनें वाचा पवित्र । कीर्तनें होय सत्पात्र । कीर्तनें प्राणि- मात्र । सुशील होती ॥ २८ ॥ कीर्तनें अन्यैग्रता घडे । कीर्तनें निश्चय सांपडे । कीर्तनें संदेह उडे । श्रोत्या वक्त्यांचा ॥ २९ ॥ सदासर्वदा हरि- कीर्तन । ब्रह्मसुत करी आपण । तेणें नारद तोचि नारायण । बोलिजत आहे ॥ ३० ॥ म्हणोन कीर्तनाचा अगाध महिमा । कीर्तनें संतोषे पर- मात्मा । सकळ तीर्थे आणि जगदात्मा । हरिकीर्तनीं वसे ॥ ३१ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके कीर्तनभजननिरूपणं नाम द्वितीयः समासः ॥ २ ॥ १. वादामध्यें शंका घेणाऱ्याचें जें कांहीं म्हणणें तें. २. समग्र वाचणें, किंवा म्हणणें ३. संपूर्णपणें. ४. 'एक ब्रह्मच सत्य आहे. अज्ञानानें त्यावरच हीं अनेक रूपें भासतात.' हा विचार. ५. एकाग्रता. ६. नारद.