दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 116, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंभुवनें । अष्ट दिक्पालांचीं¹ स्थानें । नाना उपवनें² गहनें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १९ ॥ गणगंधर्व विद्याधर । यक्ष किन्नर नारद तुंबर । अष्टनायका सं- गीतविचार । कैसा तो ऐकावा ॥ २० ॥ रागज्ञान तालज्ञान । नृत्यज्ञान वाद्यज्ञान । अमृतवेळा³ प्रसंगज्ञान । कैसें तें ऐकावें ॥ २१ ॥ चौदा विद्या चौसष्टी कळा । सामुद्रिक लक्षणें सकळ कळा । बत्तीस लक्षणें नाना कळा । कैशा त्या ऐकाव्या ॥ २२ ॥ मंत्र मोहरे⁴ तोडगे सिद्धी । नाना वल्ली नाना औषधी । धातु रसायनें बुद्धी⁵ । नाडिज्ञानें ऐकावीं ॥ २३ ॥ कोणत्या दोषें कोण रोग । कोणत्या रोगास कोण प्रयोग⁶ । कोणत्या प्रयोगास कोण योग । साधे तो ऐकावा ॥ २४ ॥ रवरवादि कुंभीपाक । नाना यातना यमलोक । सुखदुःखादि स्वर्ग नरक । कैसा तो ऐकावा ॥ २५ ॥ कैशा नवविधा भक्ती । कैशा चतुर्विधा मुक्ती । कैसी पाविजे उत्तम गती । ऐसें हें ऐकावें ॥ २६ ॥ पिंडब्रह्मांडाची रचना । नाना तत्वविवेचना । सारासार विचा- रणा । कैसी ती ऐकावी ॥ २७ ॥ सायुज्यतामुक्ति कैशी होते । कैसें पाविजे मोक्षातें । या कारणें नाना मतें । शोधीत जावीं ॥ २८ ॥ वेदशास्त्र आणि पुराणें । महावाक्यांचीं⁷ विवरणें । तनुचतुष्टयानिरसनें⁸ । कैसीं तीं ऐकावीं ॥ २९ ॥ ऐसें हें अवघेंचि ऐकावें । परंतु सार शोधूनि घ्यावें । असार तें जाणोनि त्यागावें । या नांव श्रवणभक्ती ॥ ३० ॥ सगुणाचीं चरित्रें ऐकावीं । कां ते निर्गुण अध्यात्म⁹ शोधावीं । श्रवणभक्तीचीं जाणावीं । लक्षणें ऐसीं ॥ ३१ ॥ सगुण देवाचीं चरित्रें । निर्गुणाचीं तत्त्वेंयंत्रें¹⁰ । हीं दोन्हीं परम पवित्रें । ऐकत जावीं ॥ ३२ ॥ जयंत्या उपोषणें नाना साधनें । मंत्र यंत्र जप ध्यानें । कीर्ति स्तुति स्तवनें भजनें । नानाविधें ऐकावीं ॥ ३३ ॥ ऐसें श्रवण सगुणाचें । अध्यात्मनिरूपण निर्गुणाचें । विभक्ति¹¹ सांडून भ- क्तीचें । मूळ शोधावें ॥ ३४ ॥ श्रवणभक्तीचें निरूपण । निरूपिलें असे
१. दिशांचे अधिपति; इंद्र, अग्नि, यम इत्यादि. २. वनें. ३. सर्वोत्कृष्ट मुहूर्त. ४. सर्पांच्या मस्तकांत असणारा औषधी मणि. ५. युक्ति, उपाय. ६. उपचार. ७. चार वेदांतून जीं तत्त्वमस्यादि चार वाक्यें सार म्हणून काढलीं आहेत त्यांचीं. ८. स्थूल, सूक्ष्म, कारण, व महाकारण अशा चार प्रकारच्या शरीरांचा विचारानें नाश करणें. ९. वेदान्तग्रंथ. १०. तत्त्वबोधक साधनें, ग्रंथ वगैरे. ११. भेदबुद्धि.