दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 115, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें८० श्रीदासबोध. [ दशक ।। ३ ।। श्रोत्यांनीं पुसिलें बरवें । भगवद्भजन कैसें करावें । म्हणोनि बो- लिलें स्वभावें । ग्रंथांतरीं ॥ ४ ॥ सावध होऊनि श्रोतेजन । ऐका नवविधा- भजन । सच्छास्त्रीं बोलिलें पावन । होइजे येणें ॥ ५ ॥ श्लोक ॥ श्रवणं कीर्तनं विष्णोः स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनम् ॥ १ ॥ टी० ॥ श्रवण कीर्तन विष्णुस्मरण । पादसेवन अर्चन वंदन । दास्य सख्य आत्मनिवेदन । ऐसें हें नवविधा ॥ ६ ॥ नवविधा भजन बोलिलें । तेंचि पुढें प्रांजळ केलें । श्रोतीं अवधान दीधलें । पाहिजे आतां ॥ ७ ॥ प्रथम भजन ऐसें जाण । हरिकथा पुराणश्रवण । नाना अध्यात्म¹- निरूपण । ऐकत जावें ॥ ८ ॥ कर्ममार्ग उपासनामार्ग । ज्ञानमार्ग सि- द्धांतमार्ग । योगमार्ग वैराग्यमार्ग । ऐकत जावे ॥ ९ ॥ नाना व्रतांचे म- हिमे । नाना तीर्थांचे महिमे । नाना दानांचे महिमे । ऐकत जावे ॥ १० ॥ नाना माहात्म्यें² नाना स्थानें । नाना मंत्र नाना साधनें । नाना तपें पुर- श्चरणें । ऐकत जावीं ॥ ११ ॥ दुग्धाहारी निराहारी । फळाहारी पर्णाहारी³ । तृणाहारी नानाहारी । कैसे ते ऐकावे ॥ १२ ॥ उष्णवास जळवास⁵ । शीत- वास अरण्यवास । भूगर्भ⁶ आणि आकाशवास⁷ । कैसे ते ऐकावे ॥ १३ ॥ जपी तपी तापस योगी । नाना निग्रही⁸ हठयोगी । शाक्तौगमी¹⁰ अघोरयोगी कैसे ते ऐकावे ॥ १४ ॥ नाना मुद्रा नाना आसनें । नाना देखणीं लक्ष¹²- स्थानें । पिंडज्ञानें तत्वज्ञानें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १५ ॥ नाना पिंडांची रचना । नाना भूगोल रचना । नाना सृष्टीची रचना । कैसी ती ऐकावी ॥ १६ ॥ चंद्र सूर्य तारामंडळें । ग्रहमंडळें तेजमंडळें । एकवीस स्वर्ग सातें¹³ पाताळें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १७ ॥ ब्रह्मविष्णुमहेशस्थानें । इंद्र देव ऋषि- स्थानें । वायु वरुण कुबेरस्थानें । कैसीं तीं ऐकावीं ॥ १८ ॥ नवखंडें चौदा १. ईश्वरासंबंधीं चर्चा. २. शिवमाहात्म्य, काशीमाहात्म्य, अशासारखे ग्रंथ. ३. पाला खाऊन राहणारे. ४. पंचाग्निसाधन. ५. थंडीच्या दिवसांत गळ्याइतक्या थंड पाण्यांत उभे राहणें. ६. भुयारांत राहणें. ७. वृक्षादिकांवर राहणें. ८. इंद्री- यांचें दमन करणारे. ९. प्राणनिरोध करून चित्तैक्य करणारे. १०. देवीउपा- सकांच्या पंथानें चालणारे. ११. भूतप्रेतांचें साधन करणारे. १२. चित्त एकाग्र करण्याचीं स्थानें. १३. अतल, वितल, भुतल, तलातल, रसातल, महातल व पाताळ-