दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 127, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें९२ श्रीदासबोध. [ दशक
॥ २० ॥ चरणक्षालनें स्नानें आचमनें । गंधाक्षतें वसनें भूषणें । आसनें जीवनें नाना सुमनें । धूप दीप नैवेद्य ॥ २१ ॥ शयनाकारणें उत्तम स्थ- ळें । जळें ठेवावीं सुशीतळें । तांबूल गायनें रसाळें । रागरंगें करावी ॥ २२ ॥ परिमळद्रव्यें आणि फुलें । नाना सुगंधिक तैलें । खाद्य फळें बहुमालें । स- न्निधाचि असावीं ॥ २३ ॥ सडे संमार्जनें करावी । उदकपात्रे उदकें भरावीं । वसनें प्रक्षाळून आणावीं । उत्तमोत्तम ॥ २४ ॥ सकळांचें करावें परिपत्यें । आलियाचें करावें आतिथ्यें । ऐसी हे जाणावी सत्य । सातवी भक्ति ॥ २५ ॥ वचनें बोलावीं करुणेचीं । नाना प्रकारें स्तुतीचीं । अंतरें निवती सकळांचीं । ऐसें वदावें ॥ २६ ॥ ऐसी हे सातवी भक्ती । निरूपिली यथामती । प्रत्यक्ष न घडे तरी चित्तीं । मानसपूजा करावी ॥ २७ ॥ ऐसें दास्य करावें देवाचें । येणेंचि प्रकारें सद्गुरूचें । प्रत्यक्ष न घडे तरी मानसपूजेचें । करीत जावें ॥ २८ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके दास्यभक्तिनिरू- पणं नाम सप्तमः समासः ॥ ७ ॥
८. सख्यभक्ति. श्रीगणेशाय नमः ॥ मागें जाहलें निरूपण । सातवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । आठवी भक्ती ॥ १ ॥ देवासी परम सख्य करावें । प्रेमप्रीतीनें बांधावें । आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ २ ॥ देवास जयाची अत्यंत प्रीति । आपण वर्तावें तेणेंचि रीतीं । येणेंकरितां भगवंतीं । सख्य घडे नेमस्त ॥ ३ ॥ भक्ती भाव आणि भजन । निरूपण आणि कथा कीर्तन । प्रेमळ भक्तांचें गायन । आवडे देवा ॥ ४ ॥ आपण तैसेंचि वर्तावें । आपणासि तेंच आवडावें । मनासारिखें होतांचि स्वभावें । सख्य घडे नेमस्त ॥ ५ ॥ देवाच्या सख्यत्वाकारणें । आपुलें सौख्य सोडून देणें । अनन्यभावें जीवें प्राणें । शरीर तेंहि वेंचायें ॥ ६ ॥ सांडून आपली संसार- व्यथा । करीत जावी देवाची चिंता । निरूपण कीर्तन कथा वार्ता । देवाच्या- च सांगाव्या ॥ ७ ॥ देवाच्या सख्यत्वासाठीं । पडाव्या जिवलगांसी तुटी । सर्व अर्पावें शेवटीं । प्राण तोहि वेंचाय ॥ ८ ॥ आपुलें अवघेंचि जावें ।
१. पाय धुणें. २. वस्त्रें. ३. सोय. ४. आदरसत्कार..