दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 111, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंपडिले । प्राणी वाहतचि गेले । जिहीं भगवंतासि बोभाईलें । भावार्थ- बळें ॥ ८ ॥ देव आपण घालोनि उडी । तयांसि नेलें पैलथडी । येरें तीं अभाविकें बापुडीं । वाहतचि गेलीं ॥ ९ ॥ भगवंत भावाचा भुकेला । भावार्थ देखोनि भुलला । संकटीं पावे भाविकाला । रक्षित असे ॥ १० ॥ जया भगवंत आवडे । तयांचे देवास सांकडें पडे । संसारदुःख समूळ झडे । निजदासांचें ॥ ११ ॥ जे अंकित ईश्वराचे । तयांस सोहळे निजसुखाचे । धन्य तेचि दैवाचे । भाविक जन ॥ १२ ॥ जैसा भाव जयापाशीं । तैसाचि देव तयापाशीं । जाणे भाव अंतरसाक्षी । प्राणिमात्रांचा ॥ १३ ॥ जरी भाव असला मायिकें । तरी देव होय महाठक । नवल तयाचें कौतुक । जै- शासि तैसा ॥ १४ ॥ जैसें जयाचें भजन । तैसेंच दे समाधान । भाव होतां किंचित न्यून । आपणहि दुरावे ॥ १५ ॥ दर्पणीं प्रतिबिंब दिसे । जैशासि तैसें भासे । तयाचें सूत्र असे । आपणाचपाशीं ॥ १६ ॥ जैसें आपण करावें । तैसेंचि तेणें व्हावें । जरी डोळे पसरोनि पहावें । तरी तेंहि टव- कारे ॥ १७ ॥ भ्रुकुटिस घालुनियां गांठी । पाहतां तेंहि क्रोधें उठी । आपण हास्य करितां पोटीं । तेंहि आनंदे ॥ १८ ॥ जैसा भाव प्रतिबिंबितला । त- याचाचि देव जाला । जो जैसा भजेल त्याला । तैसाचि वोळे ॥ १९ ॥ भावें परमार्थाचिया वाटा । वाहती भक्तीचिया पेंठा । भरला मोक्षाचा चौहाटा । सज्जनसंगें ॥ २० ॥ भावें भजनीं जे लागले । ते ईश्वरीं पावन झाले । भावार्थ बळें उद्धरले । पूर्वज तेही ॥ २१ ॥ आपण स्वयें तरले । जनांसि उपयोगा आले । कीर्तिश्रवणें पावन झाले । अभक्त भावार्थी ॥ २२ ॥ धन्य तयांची जननी । जे लागले हरिभजनीं । त्यांहींच एक जन्म जनीं । सार्थक केलें ॥ २३ ॥ तयांची वर्णू काय थोरी । जयांचा भगवंत कैवारी । कांसे ला- वूनि उतरी । पार दुःखाचा ॥ २४ ॥ बहुत जन्माच्या शेवटीं । जेणें चुके आंटाआटी । तो नरदेह भेटी । करी भगवंताची ॥ २५ ॥ म्हणोनि धन्य ते भाविक जन । जिंहीं जोडिलें हरि निधान । अनंत जन्मांतरींचें पुण्य । फळासि आलें ॥ २६ ॥ आयुष्य हेचि रत्नपेटी । माजी भजनरत्नें गोमटीं । ईश्वरीं
तळटीपा (Footnotes): १. आळविलें. २. इतर. ३. बाह्यात्कारें. ४. भिवयांस. ५. पावतो. ६. चव्हाटा. ७. जन्ममरणरूप दगदग. ८. द्रव्याची रास. ९. सुंदर.