दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 129, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें९४ श्रीदासबोध. [ दशक देव अनाथांचा कै¹पक्षी । नाना संकटांपासून रक्षी । धाविन्नला अंतर²साक्षी गजेंद्राकारणें ॥ २७ ॥ देव कृपेचा सागर । देव करुणेचा जल³धर । देवासि भक्तांचा विसर । पडणार नाहीं ॥ २८ ॥ देव प्रीति राखो जाणे । देवासि करावें सो⁴जणें । जीवलगें अवघीं पिसुनें । कामा न येती ॥ २९ ॥ सख्य देवाचें तुटेना । प्रीति देवाची विटेना । देव कदा पालटेना । शरणागतांसी ॥ ३० ॥ म्हणोनि सख्य देवासि करावें । हितगुज तयास सांगावें । आठवे भक्तीचें जाणावें । लक्षण ऐसें ॥ ३१॥ जैसा देव तैसा गुरु । शास्त्र बोलिला हा विचार । म्हणोनि सख्यत्वाचा निधा⁶रु । सद्गुरूसि असावा ॥ ३२ ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके सख्यभक्तिनिरूपणं नाम अष्टमः समासः ॥ ८ ॥ ९. आत्मनिवेदन. श्रीगणेशाय नमः ॥ मार्गे जाहलें निरूपण । आठवे भक्तीचें लक्षण । आतां ऐका सावधान । नववी भक्ती ॥ १ ॥ नवम निवेदन जाणावें । आत्मनिवेदन करावें । तेंही सांगिजेल स्वभावें । प्रांजळ करूनी ॥२॥ ऐका निवेदनाचें लक्षण । देवासि वाहावें आपण । करावें तत्वविवरण । म्हणिजे कळे ॥३॥ मी भक्त ऐसें म्हणावें । आणि वि⁵भक्तिपणें भजावें । हें अवघेंचि जाणावें । विलक्षण ॥४॥ लक्षण असोनि विलक्षण । ज्ञान असोनि अज्ञान । भक्त असोन विभक्तपण । तें हें ऐसें ॥५॥ भक्त म्हणजे विभक्त नव्हे । आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे । विचारेंविण कांहींच नव्हे । समाधान ॥ ६ ॥ तस्मात् विचार करावा । देव कोण तो ओळखावा । आपला आपण शोध घ्यावा । अंतर्यामीं ॥ ७ ॥ मी कोण ऐसा निवाडा । पाहों जातां तत्व⁷झाडा । विचार पाहतां उघडा । आपण नाहीं ॥ ८ ॥ तत्वें तत्व जेव्हां सरे । तेव्हां आपण कैंचा उरे । आ⁸त्मनिवेदन तेणें प्रकारें । सहजचि झालें ॥ ९ ॥ तत्त्वरूप सकळ भासे । विवेक पाहतां निरसे । प्र९कृति निरसे आत्मा १. कैवारी. २. मनोभाव जाणणारा. ३. मेघ. ४. मैत्री. ५. देव आपणांहून भिन्न आहे, अशा भावनेनें. ६. मनाशीं. ७. पंचतत्त्वें वेगळीं काढून पाहणें. ८. आपण नाहीं, सर्व ईश्वरच आहे, अशी भावना. ९. माया.