भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 130, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 130

४ था.] आत्मनिवेदन. ९५ असे । आपण कैंचा ॥ १० ॥ एक मुख्य परमेश्वर । दुसरी प्रकृति जग- दाकार । तिसरा कैंचा आपण चोर । आणिला मध्यें ॥ ११ ॥ ऐसें हें सह- जचि असतां । नाथिलें¹चि लागे देहअहंता । परंतु विचारें पाहतां । कांहींच नाहीं ॥ १२ ॥ पाहतां तत्वविवंचना² । पिंडीं³ ब्रह्मांडरचना । विश्वा- कारें व्यक्ति⁴ नाना । तत्त्वें⁵ विस्तारलीं ॥ १३ ॥ तत्वें साक्षित्त्वें⁶ वोसरती । साक्षित्त्व निरसे आत्मप्रतीती⁷ । आत्मा असे आदि अंतीं । आपण कैंचा ॥ १४ ॥ आत्मा एक स्वानंदघन⁸ । आणि अहंआत्मां⁹ हें वचन । तरी मग आपण कैंचा भिन्न । उरला तेथें ॥ १५॥ सोहं हंसा हें उत्तर । याचें पहावें अर्थांतर । पाहतां आत्मयाचा विचार । आपण कैंचा तेथें ॥ १६ ॥ आत्मा निर्गुणं¹⁰ निरंजनं¹¹ । तयासि असावें अनन्यं¹² । अनन्य म्हणजे नाहीं आन । आपण कैंचा तेथें ॥१७॥ आत्मा म्हणजे तो अद्वैतं¹³ । जेथें नाहीं द्वैताद्वैत । तेथें मीपणाचा हेत । उरेल कैंचा ॥ १८ ॥ आत्मा पूर्णत्वें परिपूर्ण । तेथें नाहीं गुणागुणं¹४ । निखलें¹⁵ निर्गुणीं आपण । कोण कैंचा ॥ १९ ॥ त्वंपदं¹⁶ तत्पदं¹⁶ असिपदं । निरसूनि सकळ भेदाभेद । वस्तु ठायींच अभेद । आपण कैंचा ॥२०॥ निरसितां जीव शिव उपाधी । जीवशिवाचि कैंचे आधीं । स्वरूपीं होतां दृढबुद्धी । आपण कैंचा ॥ २१ ॥ आपण मिथ्या साच देव । देव भक्त अनन्य¹⁷भाव । या वचनाचा अभिप्राय । अनुभवी जाणती ॥२२॥ या नांव आत्मनिवेदन । ज्ञानियांचें समाधान । नववे भक्तीचें लक्षण । निरूपिलें २३॥ पंचभूतांमध्यें आकाश । सकळ देवांमध्ये जगदीश । नवविधा भक्ती- मध्यें विशेष । भक्ति नववी ॥२४॥ नववी भक्ति आत्मनिवेदन । न होतां न चुके जन्ममरण । हें वचन सत्य प्रमाण । अन्यथा नव्हे ॥ २५ ॥ ऐसी हे १. नाहीं तोच. २. तत्त्वांचा विचार. ३. शरीर. ४. आकार. ५. आकाशादि पांच तत्त्वें. ६. मी तत्त्वांचा साक्षी आहें अर्थात् मी त्यांहून भिन्न आहें, या वि- चारानें. ७. आत्मसाक्षात्कार झाल्यावर. ८. आनंदाने पूर्ण भरलेला. ९. मीच आत्मा आहें. १०. गुणधर्भरहित. ११. मलरहित. १२. मी त्याहून अन्य नाहीं अशा रीतीनें. १३. दुसरें म्हणून नाहींच असा; केवळ एकच. १४. गुणदोष. १५. शुद्ध. १६. 'तत्त्वमसि' (तें तूं आहेस.) या महावाक्यांतील हीं तीन पदें. १७. एकरूप.