दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 131, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें९१ श्रीदासबोधः [ दशक नवविधा भक्ती । केलिया पाविजे सायुज्यमुक्ती । सायुज्यमुक्तीस कल्पांतीं चळण नाहीं ॥ २६ ॥ तिन्ही मुक्तींस आहे चळण । सायुज्यमुक्ती अचळ जाण । त्रैलोक्यास होतां निर्वाण । सायुज्यमुक्ती चलेना ॥ २७ ॥ अवधिया चत्वार मुक्ती । वेदशास्त्रें बोलती । त्यांमध्यें तीन नासती¹ । चौथी ते अविनाश ॥ २८ ॥ पहिली मुक्ति ते सलोकता² । दुसरी ते समीपता³ । तिसरी ते स्वरूपता⁴ । चौथी सायुज्यता⁵ मुक्ती ॥२९॥ ऐसिया चारि मुक्ती । भगवद्भजनें प्राणी पाविजेती । हें निरूपण प्रांजळ श्रोतीं । सावध पुढें परिसावें ॥ ३० ॥ इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चतुर्थदशके आत्म- निवेदननिरूपणं नाम नवमः समासः ॥ ९ ॥ १०. मुक्तिचतुष्टय. श्रीगणेशाय नमः ॥ मूळ ब्रह्म निराकार । तेथें स्फूर्तिरूप अहंकार । तो पंचभूतांचा विचार । ज्ञानदशकीं⁶ बोलिला ॥ १ ॥ तो अहंकार वायुरूप । तयावरी तेजाचें स्वरूप । तया तेजाच्या आधारें आपें⁷ । आवरणोदक दाटलें ॥ २ ॥ तया आवरणोदकाच्या आधारें । धरा⁸ धरिली फणिवरें⁹ । वरती छप्पन्नकोटी विस्तारें । वसुंधरा हे ॥ ३ ॥ इयेवरी परिघ¹⁰ सप्त सागर । मध्यें मेरु महा थोर । अष्ट दिक्पाळ परिवार । अंतरें वेष्टित राहिला ॥ ४ ॥ तो सुवर्णाचा महामेरू । पृथ्वी तयाचा आधारू । चौऱ्यांशीं सहस्र विस्तारू । रुंदी तयाची ॥ ५ ॥ उंच तरी मर्यादावेगळा । भूमीमध्यें सहस्र सोळा । तया भोंवता वेष्टित पौळा¹¹ । लोकालोक पर्वतांचा ॥ ६ ॥ तया ऐलीकडे हिमाचल । जेथें पांडव गळाले सकळ । धर्म आणि तमालनीळ¹² । पुढें गेले ॥ ७ ॥ तेथें जावया मार्ग नाहीं । मार्गी पसरले महा अही¹³ । शीतसुखें¹⁴ सुखावले तेही । पर्वतरूप भासती ॥ ८ ॥ तया ऐलीकडे शेवटीं जाण । बद्रिकाश्रम बद्रिनारायण । तेथें महातापसी निर्वाणें¹⁵ । देहत्यागार्थ जाती १. नाश. २. देवलोकीं राहणें. ३. देवासंनिध राहणें. ४. देवाप्रमाणें आपलें सामर्थ्य होणें. ५. देवाशीं मिळून जाणें. ६. द. ८, स. ४ व ५ पहा. ७. पाणी. ८. पृथ्वी. ९. शेषानें. १०. घेर. ११. वेढा. १२. श्रीकृष्ण. १३. सर्प. १४. थंड हवेच्या सुखानें. १५. शेवटीं.