भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 12, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 12

एकांतवासाचें स्थल होय. त्या ठिकाणीं-तेथील भुयारांत-समर्थ वर्षांतून कांहीं महिने जाऊन रहात असत. चाफळास राहिल्यानंतर समर्थांनीं शिष्यसमुदाय व लोकसंग्रह (ज्याला हल्लींच्या भाषेंत संघटना म्हणतां येईल तो) करण्यास सुरु- वात केली. 'सामर्थ्य आहे चळवळीचें' वगैरे त्यांची उक्ति कृतींत उतरविण्याचें काम त्यांनीं येथेंच केलें. चाफळ हेंच त्यांच्या चळवळीचें केंद्रस्थान होय. तेथून सुमारें अकराशें शिष्य ऊर्फ महंत त्यांनीं भरतखंडांत पसरविले होते. भरतखंडाच्या बहुतेक प्रमुख भागांत त्यांनीं आपल्या सांप्रदायाचे मठ स्थापन केलेले होते. हे मठ किती होते याचा अद्याप नक्की आंकडा कळलेला नाहीं, तथापि उपलब्ध झालेल्या माहितींत सुमारें १५० मठांचा थांग लागलेला आहे. त्यावरून त्यांनीं केवढें मोठें संघटनात्मक यंत्र महाराष्ट्राच्या नैतिक व राष्ट्रीय उन्नतीकरितां तयार केलें होतें याचा अंदाज करितां येईल. समर्थांनीं योजलेलें हें कार्य सिद्धीस नेण्याचे कामीं त्यांस क्षत्रियकुलावतंस श्रीशिवाजीमहाराज यांचा फार उपयोग झाला. समर्थांची व शिवाजीमहाराजांची प्रथम भेट शके १५६९ च्या सुमारास झाली. त्या वेळीं शिवरायाचें वय सुमारें १९।२० वर्षांचे होत. ह्या प्रथमभेटीनंतर लवकरच उभयतांमध्ये गुरुशिष्याचें नातें सुरु झालें. समर्थांच्या विवेकपूर्ण उपदेशामुळे शिवाजीच्या हातून स्वराज्यस्थानेचें काम विशेष सुयंत्रितपणें पार पडलें असें म्हणण्यास हरकत नाहीं. शिवाजी समर्थां- च्या सेवेस नेहमीं तत्पर असे; तथापि समर्थांचें वर्तन सर्वथा निस्पृहपणाचें असे. फार काय सांगावें, चाफळास श्रीरामाचें देवालय बांधण्याचे कामींहि समर्थांनीं शिवाजीची मदत घेतली नाहीं ! हें देवालय आपण बांधून द्यावें अशी शिवरायांची इच्छा होती व ती त्यांनीं समर्थचरणीं निवेदनहि केली. परंतु समर्थांनीं त्यांची विनंती मान्य न करितां सामान्य भिक्षेवरच आपल्या शिष्यां- करवीं तें देवालय बांधविलें. यासंबंधानें समर्थप्रतापांत पुढील उल्लेख आहे:— समर्थआज्ञा पुसे शिवराजा । श्रीरघुनाथदेवालय मी बांधेन वोजा ॥ समर्थ म्हणती शिष्यसमुदाय माझा । देवालयें करवीन अनंतहस्तें ॥ अशी त्यांची निस्पृहवृत्ति होती, म्हणूनच त्यांच्या हातून महत्कार्य झालें. एकदा शिवरायांनीं समर्थांस ११००० होन अर्पण केले. ते त्यांनीं लागलीच ब्राह्मणांस वांटून टाकले. समर्थांस अनेक लोकांकडून अनेक प्रकारच्या देणग्या येत असत,