दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 13, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१० | उपोद्घात. परंतु त्यांचा त्यांनीं स्वतःचे उपयोगाकरितां म्हणून कधींहि स्वीकार केला नाहीं. अशा सर्व वस्तु ते बांटून टाकीत असत. समर्थ दिसण्यांत बेडसर अथवा बाव- ळट दिसत; तसेंच त्यांची वृत्ति अगदीं सौम्य व मृदु दिसे; परंतु वस्तुतः ते मोठे सावध, इंद्रियदमनी, करारी व कडक प्रकृतीचे पुरुष होते. त्यांचें अंतरंग जाणणें फार कठीण असे, इतकें तें खोल होतें. त्यांची त्यांच्या शिष्यावर्गावर मोठी जरब होती. तसेंच त्यांच्या सांप्रदायाची शिस्तहि फार चोख असून ती कडकपणें पाळली जावी म्हणून त्यांचा मोठा कटाक्ष असे. त्यांनीं जागोजाग ठेवलेले महंत पुष्कळ थोर योग्यतेचे होते; परंतु त्यांच्यापैकीं कोणीं सांप्रदायाची शिस्त मोड- ल्यास त्यास ते तत्काल कडक शासन करीत. महंत आपलें काम बरोबर करितो कीं नाहीं हें ते फार सूक्ष्म प्रकारची कसोटी लावून पहात असत. जवळच्या महंतांनीं दर तीन वर्षांनीं व दूरच्या महंतांनीं ११ वर्षांच्या आंत एकदां