दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 14, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीसमर्थांचें अल्प चरित्र. ११ तारण्याइतकें त्यांचें शरीर बळकट होतेंः तसेंच तें पूर्ण निरोगीहि होतें. समर्थां- च्या वागणुकीसंबंधानें 'समर्थप्रताप' नामक ग्रंथांत बरेंच विस्तृत वर्णन आहे. यावरून असें दिसून येतें कीं, समर्थ भराभर चालत; मित भाषण करीत; अहंकारानें त्यांजकडे कोणी गेल्यास त्यांशीं मुळींच बोलत नसत. नवीन मनुष्य विनयानें बोलल्यास प्रथम भेटीस थोडे बोलत, पण पुढें जास्त सहवास घडल्यास विशेष सलगीनें बोलत. त्यांची सामान्यतः नेहमीं अधोदृष्टि असे. तसेंच त्यांची चर्या ध्यानस्थ-विचारमग्न-दिसत असे. भोजनापेक्षां फलाहार त्यांस विशेष प्रिय असे, तथापि दिवसांतून एकवार ते यथास्थित भोजन करीत. उपोषण करून काया कृश करावी, हें आळशी वेदान्त्यांचें तत्त्व त्यांस मान्य नव्हतें. भोजन झाल्यावर तांबुल भक्षण करीत असत. तांबुल तयार करून कुटून देण्याचें काम भोळाराम नामक एका लडिवाळ शिष्याकडे असे. भोजनोत्तर दोन- प्रहरीं कांहीं वेळ निद्रा करीत, परंतु रात्रीं क्वचितच झोंप घेत! रात्र बरीच झाली म्हणजे जवळ असलेल्या महंतादि मंडळीस निजावयाची आज्ञा करून व आपणहि निजावयास जातों असें सांगून ते निजावयास गेल्यावर आपण एखाद्या डोंगराची वाट धरावयाची असा त्यांचा परिपाठ असे! ते नेहमीं जमिनीवर घोंगडीचें हांतरूण करून त्यावर निजत. बैठकीच्या वेळीं सिद्धासन घालीत. त्यांचें राहणें सतत एके ठिकाणीं फार थोडें असे. स्नानसंध्या एके ठिकाणीं तर भोजन दुसऱ्या ठिकाणीं, तांबूल सेवन त्याहून अन्य ठिकाणीं व विश्रांति अथवा शयन त्याहूनहि अन्यत्र, अशी त्यांची वागणूक असे. त्यांची वृत्ति नेहमीं उदास व निस्पृह अशी असे. सदासर्वकाळ एकान्तीं बसून स्वज- नांची ऐहिक व पारमार्थिक उन्नति कशी होईल, याची ते एकसारखी विवंचना करीत असत. याविषयीं 'समर्थप्रतापांत' पुढील उल्लेख आहे:— श्रीगुरुसमर्थ एकांतीं बैसती । प्रांतींचे लोक दर्शनासी येती । सकळ प्रांतींचा स्वामी परामृश घेती । चिंता करिती विश्वाची ॥ देशकाळवर्तमानानें । आपण चिंताग्रस्त होती मनें । म्हणती कैसीं वांचतीळ जनें । कैसीं ब्राह्मण्यें राहतील ॥ कैसी क्षेम राहेल जगती । कैसीं देवदेवाल्यें तगतां । कैसे कुटुंबवत्सल लोक जगती । कोणेकडे जातील हे ॥