दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 15, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१२ उपोद्घात. हा उतारा किंचित् लांब वाटेल, परंतु तो मुद्दाम दिला आहे. त्यावरून समर्थांना कोणतें कार्य करावयाचें होतें व तें किती महत्त्वाचें आणि बिकट होतें याची वाचकांस बरोबर कल्पना करतां येईल. हें कार्य करण्यांतच समर्थांनीं चाफळ- खोऱ्यांतील आपलें आयुष्य घालविलें. आणि तें कार्य सिद्ध झाल्यानंतर शिवाजी- महाराजांच्या आग्रहावरून ते परळीनजिक सज्जनगडावर रहावयास गेले. सज्जन- गडावरहि त्यांनीं श्रीरामाचें देवालय बांधून उपासना सुरू केली. यापुढें त्यांचा बहुतेक काळ केवळ परमार्थाचा उपदेश करण्यांत गेला. राष्ट्रप्रपंचाची घडी यथास्थितपणें नीट बसविल्यानंतर सर्वतोपरी श्रेष्ठ असा जो मोक्षधर्म त्याचा उपदेश करण्यांत त्यांनीं धन्यता मानावी हें साहजिक आहे. तथापि ह्या कालां- तहि राष्ट्रप्रपंचाकडे त्यांची दृष्टि होतीच. स्वतःच्या 'दासबोध' ग्रंथांतील शिकवणीचा आपल्या महंतांकडून भरतखंडांत प्रसार करविणें, त्या कामीं नियोजित केलेल्या शिष्यवर्गांच्या भेटी घेणें व त्यांना वारंवार योग्य ती सल्ला- मसलत देणें, या गोष्टी त्यांनीं चालू ठेवल्याच होत्या. शिवाजीमहाराजहि त्यांचें दर्शन घेऊन त्यांच्या बोधामृताचें पान करण्याकरितां सज्जनगडावर वारं- वार येत असत. सज्जनगडावर आल्यानंतर शके १६०० मध्यें म्हणजे समर्थांचें देहावसान होण्याचा समय जवळ आल्यावर शिवाजीमहाराजांच्या इच्छेवरून त्यांनीं आपल्या पश्चात् आपला सांप्रदाय दीर्घकाल टिकावा म्हणून चाफळ व इतर ठिकाणच्या देवालयांस उत्पन्न संपादन करून ठेवलें. ह्या प्रसंगीं शिवाजी- महाराजांनीं समर्थांस लिहिलेलें पत्र रा. देव यांनीं प्रसिद्ध करून महाराष्ट्रावर मोठे उपकार केले आहेत. कारण त्या पत्रावरून समर्थ व शिवाजी राजे यांचा परस्परसंबंध कशा प्रकारचा होता, हें कोणासहि स्पष्टपणें कळून येण्याजोगें आहे. तें पत्र इतकें महत्त्वाचें आहे कीं, त्यांतील महत्त्वाचा भाग येथें उद्धृत करून घेतल्यावांचून राहवत नाहीं. तें पत्र असें:— श्री श्रीरघुपती. श्रीमारुती. श्रीसद्गुरुवर्य श्रीसकलतीर्थरूप श्रीकैवल्यधाम श्रीमहाराज श्रीस्वामी, स्वामीचे सेवेसीं. चरणरज शिवाजी राजे यानी चरणावरी मस्तक ठेऊन विज्ञापना जे: मजवर