भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 16, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 16

श्रीसमर्थांचे अल्प चरित्र. १३ कृपा करूनु सनाथ केले आज्ञा केली कीं, तुमचा मुख्य धर्म राज्यसाधन करूनु धर्म- स्थापना देवब्राह्मणांची सेवा प्रजेची पीडा दूर करून पाळणरक्षण करावे; हें व्रत संपादून त्यांत परमार्थ करावा. तुम्ही जें मनीं धराल तें श्री......सिद्धींस पाववील. त्याजवरून जो जो उद्योग केला, व दुष्ट तुरूक लोकांचा नाश करावा, विपुल द्रव्य करूनु राज्यपरंपरा अक्षई चालेल ऐसीं स्थळें दुर्घट करावी, ऐसें जें जें मनीं धारिलें ते ते स्वामींनीं आशीर्वादप्रतापें मनोरथ पूर्ण केले. याउपरी राज्य सर्व संपादिले, तें चरणीं अर्पण करूनु सर्व काळ सेवा घडावी ऐसा विचार मनीं आणिला. तेव्हां आज्ञा जाहाली कीं, तुम्हास पूर्वी धर्म सांगितले ते च करावेस, तीच सेवा होय, ऐसें आज्ञापिले. यावरून निकट वास घडुनु वारंवार दर्शन घडावें, श्री......ची स्थापना कोठें तरी होऊनु सांप्रदाय शिष्य व भक्ती दिगंत विस्तीर्ण घडावी, ऐसी प्रार्थना केली; तेही आसमंतात गिरिगव्हरीं वास करूनु चाफळीं श्री......ची स्थापना करूनु सांप्रदाय शिष्य दिगंत विस्तीर्णता घडली. त्यास चाफळीं श्री....ची पूजा मोहोच्छाव ब्राह्मणभोजन अतिथि इमारत सर्व यथासांग घडावे. जेथें जेथें श्री... च्या मूर्तिस्थापना जाहाली तेथें उच्छाव पूजा घडावी, यास राज्य संपादिले. यांतील ग्रामभूमि कोठें काय नेमावी ते आज्ञा व्हावी. तेव्हां आज्ञा जाहाली कीं, विशेष उपाधींचें कारण काय ? तथापि तुमचे मनीं श्री...ची सेवा घडावी हा निश्चय झाला. त्यास यथाअवकाश जेथें जें नेमावेसे वाटेल तें नेमावें व पुढें जसा सांप्रदायाचा व राज्याचा व वंशाचा विस्तार होईल तसें करीत जावें. याप्रकारें आज्ञा जाहाली. या- वरूनु देशांतरीं सांप्रदाय व श्री......च्या स्थापना जाहल्या, त्यास ग्रामभूमीचीं पत्रें करून पाठविलीं. श्री......संनिध चाफळीं एकशैकवीस गांव सर्वमान्य व एकशैकवीस गांवीं अकरा बिघेप्रमाणें भूमि व अकरा स्थळीं श्री......ची स्था- पना जाहाली. तेथें नैवेद्य पूजेस भूमि अकरा बिघेप्रमाणें नेमिले आहेती. ऐसा संकल्प केला आहे, तो सिद्धीस नेहण्याविषयीं विनंति केली; तेव्हां संकल्प केला तो परंपरेनें सेवटास न्याहावा ऐसी आज्ञा जाहाली. त्याजवरून सांप्रत गाऊ व भूमी नेमिले.........तपशील. ( येथें ३३ गांवे, ४१९ बिघे जमीन, एक कुरण, १२१ खंडी धान्य यांचा तपशील आहे.) येकूण दरोबस्त सर्वमान्य गांउ तेहतीस व जमीन बिघे गाऊगना चारशें