भारतकोश
दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)

Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary

समर्थ रामदास स्वामी द्वारा

DevanagariHindipublished467 पृष्ठ

पृष्ठ 17, कुल 467 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 17

येकोणीस व कुर्ण येक, व गल्ला खंडी एकशेंएकवीस श्री......चे पूजाउच्छाहाबद्दल संकल्पांतील सांप्रत नेमिले व उच्छाहाचे दिवसास व इमारतीस नक्की ऐवज व धान्य मनयाचे समयास प्रविष्ट करीन. येणेंकरोन अक्षई उच्छाहादि चालविण्या- विषयां आज्ञा असावी-राज्याभिषेक ५, कालयुक्ताक्षी नाम संवत्सरे, आश्विन शुद्ध १० दशमी, बहुत काय लिहिणें हे विज्ञापना. या पत्रावरून असें स्वच्छ दिसून येतें कीं, शिवाजीमहाराजांस स्वराज्य- स्थापनेचा कानमंत्र समर्थांनींच सांगितला. तसेंच समर्थांचें वर्तन महाराजां- बरोबर फारच निस्पृहपणाचें होतें. समर्थ सांप्रदायाच्या रूपानें उपाधीचा विस्तार करीत; पण स्वतः मात्र त्यांत लिप्त होत नसत. चाफळास त्यांनीं रामस्थापना केली, परंतु ते स्वतः बहुधा गिरिगव्हरींच राहत. इतर साधुसंतां- प्रमाणें सांप्रदायामुळे प्राप्त होणारे भोग त्यांनीं कधीं उपभोगिले नाहींत. त्यांच्या चरित्राचें खरें रहस्य व थोरवी त्यांच्या ह्या वर्तनांतच आहे. समर्थ सज्जनगडावर राहूं लागल्यावर थोड्याच वर्षांनीं (शके १६०२) शिवछत्रपति कैलासवासी झाले. त्या कारणानें त्यांस मोठें दुःख झालें. संभाजीची । लहरी व दुराचारी वृत्ति त्यांस ठाऊक असल्यामुळे तर त्यांचें हें दुःख विशेषच दुणावलें. बहुत सायास व कष्ट सोसून शिवरायाच्या हस्तें ज्या स्वराज्यमंदिराची भव्य व दैदीप्यमान इमारत आपण उभारली, तिची हा करंटा पोर वाताहात करील कीं काय, अशी त्यांस शंका वाटू लागली होती. परंतु त्याला सर्वस्वीं ताळ्यावर आणण्याचा अथवा तसें न झाल्यास राज्यरक्षणार्थ अन्य कांहीं घडा- मोड करण्याचा यत्न करणें, वृद्धापकाळामुळे (वय ७२) त्यांस अशक्य झालेलें होतें. तथापि ह्या राज्यरक्षणासंबंधीं त्यांच्या मनाला जी तळमळ वाटत होती, ती त्यांनीं पत्रद्वारें संभाजीस कळवून त्यास आपल्या पित्याचें अनुकरण करून त्याचा नांवलौकिक राखण्याचा उपदेश त्यांनीं मोठ्या कळवळ्यानें केला होता. त्या उपदेशाचा मनावर परिणाम होऊन संभाजी राजा समर्थांच्या भेटीसहि आला होता. पुढें लवकरच म्हणजे शके १६०३ मध्यें सम-


१. त्यांच्या ह्या दुःखाचें वर्णन 'समर्थप्रतापांत' असें आहे:— समर्थ स्वप्रकाशें अंधारीं तीन मास बैसताती । मुरुमपात्रें उदकें सेविताती । शकलपात्रें घेऊनि धावताती । अरण्याकडे दुश्चित्तें ॥ ६४ ॥ ( स० २० )