दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 18, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ेंश्रीसमर्थांची शिकवण. १५ त्यांचेहि देहावसान झाल्यामुळे संभाजीच्या मनावर साक्षात् त्यांच्या दिव्य मूर्तीचें पडणारें दडपण नष्ट झाल्यानें त्यांचा उपदेशहि तो विसरत गेला. त्याचे अखेर परिणाम काय झाले, हें मराठ्यांचा इतिहास सांगतच आहे ! संभाजी- च्या दुर्वर्तनामुळे शिवाजीनें उभारलेल्या स्वराज्याच्या भव्य इमारतीस बरेच धक्के बसले; परंतु समर्थांनीं आपल्या सांप्रदायाच्या द्वारानें महाराष्ट्रांत ‘महाराष्ट्र- धर्माची ( नीति + धर्म + राजकारण = महाराष्ट्रधर्म ) स्थापना करून महाराष्ट्रीय लोकांमध्ये जी कर्तव्यबुद्धि जागृत केली होती, तिचीं पाळेमुळे महाराष्ट्रसमा- जांत खोलवर जाऊन पोंचलेलीं असल्यामुळे सदर धक्क्यांनी ती इमारत ढांसळून पडली नाहीं. उलट पुढें तिचा मोठा विस्तार होऊन सुमारें एक शतकभर ती उद्दिष्ट कार्य चांगल्या रीतीनें करीत होती. एवढें मोठें सामर्थ्य महाराष्ट्रांत ज्या सांप्रदायाच्या द्वारें समर्थांनीं उत्पन्न केलें, त्या सांप्रदायाचें स्वरूप काय व त्याच्या द्वारें महाराष्ट्रास त्यांनीं काय शिकविलें याचा अंम