दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 19, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें१६ उपोद्घात. सना, आणि (२) निरूपण म्हणजे अद्वैताचें विवरण, असे दोन विभाग आहेत. पैकीं पहिला, समाजास परमेश्वराची भक्ति करावयास लावून त्यास नीतिमान व स्वधर्मपरायण बनवितो; आणि दुसरा, जीवशिवांचें ऐक्य घडवून मनुष्यास मोक्षाचा लाभ करून देतो. मोक्ष-मुक्ति-हेंच मानवी प्राण्यांचें अंतिम साध्य आहे, असें समर्थांचें मत असून खुद्द त्यांचें स्वतःचेंहि तेंच ध्येय आहे. संसार हा सर्व मायेचा पसारा असून खोटा आहे. माया ही सत्त्व, रज व तम या तीन गुणांनीं युक्त आहे, त्यामुळे ती तापत्रयास कारण आहे. परंतु मनुष्य- प्राणी जन्मास आला कीं, तो या त्रिगुणातीत मायेच्या पाशांत सांपडल्यावांचून रहात नाहीं. ह्या मायापाशांतून सुटून मुक्तस्थितीस जाऊन पोंचणें यासच समर्थ परमार्थ म्हणतात. तो परमार्थ कसा साधावा हा अध्यात्मज्ञानाचा विषय असून आमच्याकडील वेदान्तग्रंथांत त्यासंबंधानें यथास्थित विवरण केलेलें आहे. समर्थांच्या दासबोध ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय ह्याच आहे. आणि त्या- करितांच त्यांनीं 'हरिकथानिरूपण' हें आपल्या शिकवणीचें व सांप्रदायाचें मुख्य अंग मानिलें आहे. मोक्षसाधन हें जरी मनुष्यप्राण्याचें अथवा मानवसमाजाचें मुख्य ध्येय असलें, तरी यच्चयावन् सर्व मानवी प्राणी हें ध्येय प्राप्त करून घेण्यास पात्र असतात-म्हणजे कोणत्याहि काळीं सर्वत्रांची एकसारखीच स्थिति असते-असें मात्र दिसून येत नाहीं. हें ऐतिहासिक सत्य विचारांत घेऊन समर्थांनीं मानव- समाजाच्या ४ अवस्था कल्पिल्या आहेत. (१) बद्ध, (२) मुमुक्षु, (३) साधक व (४) सिद्ध ह्या त्या अवस्था होत. मोक्षसाधन हें प्रत्येक मनुष्यास शक्य आहे, असें वेदान्त्यांप्रमाणें समर्थांचेंहि मत आहे. परंतु 'सिद्धा'ची अवस्था प्राप्त झाल्याखेरीज मात्र कोणासहि मोक्ष मिळवितां येणार नाहीं, हें त्यांनीं स्पष्ट करून सांगितलेलें आहे. ही अवस्था प्रत्येक माणसास प्राप्त करून घेतां येईल असें त्यांनीं— कोणासीच नाहीं बंधन । आंतीस्तव भुलले जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणोनिया ॥ ५।६।५७ ॥ या ओवीच्या द्वारां सूचित केलें आहे. परंतु सिद्धाची अवस्था प्राप्त होण्यास मायेचा बंध तोडून टाकावा लागतो. तो तोडून टाकणें हें जरी शक्य असलें