दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
१६ उपोद्घात. सना, आणि (२) निरूपण म्हणजे अद्वैताचें विवरण, असे दोन विभाग आहेत. पैकीं पहिला, समाजास परमेश्वराची भक्ति करावयास लावून त्यास नीतिमान व स्वधर्मपरायण बनवितो; आणि दुसरा, जीवशिवांचें ऐक्य घडवून मनुष्यास मोक्षाचा लाभ करून देतो. मोक्ष-मुक्ति-हेंच मानवी प्राण्यांचें अंतिम साध्य आहे, असें समर्थांचें मत असून खुद्द त्यांचें स्वतःचेंहि तेंच ध्येय आहे. संसार हा सर्व मायेचा पसारा असून खोटा आहे. माया ही सत्त्व, रज व तम या तीन गुणांनीं युक्त आहे, त्यामुळे ती तापत्रयास कारण आहे. परंतु मनुष्य- प्राणी जन्मास आला कीं, तो या त्रिगुणातीत मायेच्या पाशांत सांपडल्यावांचून रहात नाहीं. ह्या मायापाशांतून सुटून मुक्तस्थितीस जाऊन पोंचणें यासच समर्थ परमार्थ म्हणतात. तो परमार्थ कसा साधावा हा अध्यात्मज्ञानाचा विषय असून आमच्याकडील वेदान्तग्रंथांत त्यासंबंधानें यथास्थित विवरण केलेलें आहे. समर्थांच्या दासबोध ग्रंथाचा मुख्य प्रतिपाद्य विषय ह्याच आहे. आणि त्या- करितांच त्यांनीं 'हरिकथानिरूपण' हें आपल्या शिकवणीचें व सांप्रदायाचें मुख्य अंग मानिलें आहे. मोक्षसाधन हें जरी मनुष्यप्राण्याचें अथवा मानवसमाजाचें मुख्य ध्येय असलें, तरी यच्चयावन् सर्व मानवी प्राणी हें ध्येय प्राप्त करून घेण्यास पात्र असतात-म्हणजे कोणत्याहि काळीं सर्वत्रांची एकसारखीच स्थिति असते-असें मात्र दिसून येत नाहीं. हें ऐतिहासिक सत्य विचारांत घेऊन समर्थांनीं मानव- समाजाच्या ४ अवस्था कल्पिल्या आहेत. (१) बद्ध, (२) मुमुक्षु, (३) साधक व (४) सिद्ध ह्या त्या अवस्था होत. मोक्षसाधन हें प्रत्येक मनुष्यास शक्य आहे, असें वेदान्त्यांप्रमाणें समर्थांचेंहि मत आहे. परंतु 'सिद्धा'ची अवस्था प्राप्त झाल्याखेरीज मात्र कोणासहि मोक्ष मिळवितां येणार नाहीं, हें त्यांनीं स्पष्ट करून सांगितलेलें आहे. ही अवस्था प्रत्येक माणसास प्राप्त करून घेतां येईल असें त्यांनीं— कोणासीच नाहीं बंधन । आंतीस्तव भुलले जन । दृढ घेतला देहाभिमान । म्हणोनिया ॥ ५।६।५७ ॥ या ओवीच्या द्वारां सूचित केलें आहे. परंतु सिद्धाची अवस्था प्राप्त होण्यास मायेचा बंध तोडून टाकावा लागतो. तो तोडून टाकणें हें जरी शक्य असलें
तरी तें फार दुस्तर असल्यामुळे अखिल मानवप्राण्यांना एकसमयावच्छेदेंकरून तें साध्य होत नाहीं, असें मानवसमाजाच्या आजपर्यंतच्या इतिहासावरून सिद्ध आहे. मानवसमाजांतील बहुतेक प्राणी उपरोक्त मायेनें लिप्त म्हणजे बद्ध स्थितीं- तच असतात. कांहीं थोडे लोक मुमुक्षु बनलेले असतात, व त्यांतूनही थोडे साधक, आणि फारच थोडे—हाताच्या बोटांनीं मोजण्याइतके—सिद्धकोटींत गेलेले असतात. ह्या निरनिराळ्या अवस्थांचीं लक्षणें समर्थांनीं दासबोधांत विस्तृतपणें सांगितलीं आहेत. त्यावरून असें दिसून येतें कीं, मनुष्याची ‘बंधनभ्रांति’ उडून गेली म्हणजे त्याचे ठायीं मुमुक्षेचा उदय होतो. तो झाल्यावर तो मनुष्य सत्त्वगुणसंपन्न व परोपकारी बनतो. त्याचा अहंकार जळाला म्हणजे तो साधक होतो. साधक झाला तरी त्याचे ठायीं ‘तें’ व ‘मी’ ह्या भेदाची जाणीव रहा- तेच. ती नष्ट होऊन ‘तें’ (ब्रह्म) व ‘मी’ एकच अशी भावना जेव्हां होते, तेव्हां तो सिद्धाच्या स्थितीस पोचून मोक्षाचा मालक होतो. सिद्ध व साधक हे जरी थोडे असले तरी बाकीच्या सर्व मानवांना मोक्षमार्गाकडे नेण्यास ते समर्थ असतात; व तसें करणें हें रामदासांच्या मतें त्यांचें कर्तव्यच आहे. कारण त्यांत त्यांचें स्वतःचेंहि हित आहे. सर्व समाज जर बद्ध अतएव विपन्न व दुःखी असेल, तर त्या स्थितीचा स्पर्श अंशतः तरी सिद्ध व साधक यांस होऊन त्यांच्या मानसिक स्वास्थ्याचा भंग झाल्यावांचून राहणार नाहीं. अर्थात् त्यांनाहि दुःखाचे आवेग सहन करण्याचा प्रसंग येऊन तेहि विपन्न व बद्ध होऊं लागतील! ही स्थिति टाळण्याकरितां म्हणून तरी स्वसमाजाला उन्नतावस्थेकडे नेणें त्यांस भाग आहे. हें कार्य त्यांनीं कसें सिद्धीस न्यावें याचा विस्तृत प्रपंच करण्यांतच समर्थांनीं आपल्या दासबोधाचा बहुतेक भाग व्यापला आहे. हें कार्य साधण्याकरितां तीन उपाय किंवा साधनें समर्थांनीं सांगितलीं आहेत. ते तीन उपाय म्हटले म्हणजे नीति, धर्म व राज्य—अर्थात् स्वराज—यांची समा- जांत स्थापना करून त्यांची अभिवृद्धि करणें हे होत. सगुणोपासना किंवा हरि- कथा आणि वर्णाश्रमधर्मांचें निरूपण करून त्यांनीं नीति व धर्म यांच्या स्थापनेचा मार्ग दाखवून दिला आहे. परंतु धर्म व नीति यांस जर राज्यसंस्थेचें पाठबळ नसेल तर त्यांची अभिवृद्धि होण्यास मोठी अडचण पडते. ती कशी याचें स्पष्ट चित्र त्या वेळच्या समाजस्थितीच्या रूपानें समर्थांच्या डोळ्यांपुढें होतें. तें त्यांनीं
१. दशक १-५: स्तवन, मूर्ख-लक्षण, स्वगुण-परीक्षा एवं भक्ति-मार्ग
१८ उपोद्घात. दासबोधांतील कलिधर्मनिरूपणांत व इतर काव्यांत जागोजाग चितारिलें आहेच. (समर्थांची स्फुट कविता, रामदासी ग्रंथमाला खंड ३ पहा.) महाराष्ट्रांत त्या वेळीं असलेली राज्यसंस्था यवनांच्या ताब्यांत होती. अर्थात् आमचा धर्म व तत्प्रणीत नीति यांच्या स्थापनेस व अभिवृद्धीस ह्या राज्यसंस्थेचा कांहींएक उप- योग होण्यासारखा नव्हता; इतकेंच नव्हे, तर उलट त्यांचा ऱ्हास करण्यास ती कारणीभूत झालेली होती. अर्थात्च ती पूर्णपणें मोडून टाकून त्या ठिकाणीं ह्या धर्मास व नीतीस पाठिंबा देणारी आणि तेणेंकरून मोक्षसाधनाचा मार्ग सुकर करणारी अशी स्वदेशी राज्यसंस्था स्थापन करणें अवश्य झालेलें होतें. ही विशिष्ट परिस्थिति लक्षांत घेऊनच समर्थांनीं/ 'राजकारण' हें आपल्या सांप्रदायाचें दुसरें अंग बनविलें, व तद्विषयक शिकवणीचा दासबोधांत समावेश केला. तात्पर्य, राजकारण ऊर्फ राज्यस्थापना हें साधन म्हणून समर्थांनीं योजिलें. साध्य व साधन यांत मोठा भेद आहे, आणि तो लक्षांत न आल्यास मोठमोठे प्रमाद घडून येण्याचा संभव असतो, हें लक्षांत घेणें जरूर आहे. धर्म व नीति यांचा उपदेश करण्याचें काम समर्थकालीन अनेक संतांनीं केलें होतें; परंतु त्या- पासून फारसें कांहीं कार्य झालें नाहीं. समाजांत मुमुक्षेचा उदय होण्यास हा उप- देश थोडा फार उपयोगीं पडला असेल, नाहीं असें नाहीं; परंतु यवनराज्यामुळे उत्पन्न झालेल्या विपरीत स्थितींत धर्माच्या व नीतीच्या बाबतींत सर्वत्र जी बज- बजपुरी व स्वैराचार यांचें प्राबल्य माजलें तें मोडण्याचें काम संतांच्या उपदेशानें 'झालें नाहीं व होण्यासारखेंहि नव्हतें. अज्ञ जनांच्या मनावर संतांच्या उपदेशाचा कांहीं तरी इष्ट परिणाम होण्याचा संभव होता; पण धर्म व नीति यांचा राजा- श्रय सुटला म्हणजे विद्वन्मन्य असा जो एक पढतमूर्खांचा वर्ग समाजांत असतो (याचें वर्णन दासबोधाच्या प्रारंभींच आहे), तो फार उच्छृंखल होऊन अनीति व अधर्म यांचा प्रसार करतो. त्याला वेसण घालण्याचें काम संतांसारख्या सद्हेतुप्रेरित पण पंगु उपदेशकांच्या हातून होत नाहीं. तें करण्याकरितां शासन- सामर्थ्याचें अधिष्ठान असणाऱ्या सामाजिक अथवा राजकीय संस्था स्थापाव्या लागतात व त्यांचेंहि यथान्याय रक्षण व्हावें म्हणून धर्म व नीति यांचा अभि- मान बाळगणारी राज्यसंस्था असावी लागते. ही गोष्ट लक्षांत घेऊनच सम- र्थांनी 'समुदाय' ऊर्फ संघटना करून धर्मस्थापना व राज्यस्थापना करण्याचा
श्रीसमर्थांची शिकवण. १९ तत्कालीन महाराष्ट्रास उपदेश केला. नुसता उपदेशच करून समर्थ राहिले नाहींत, तर ह्या संघटनात्मक संस्था कशा स्थापाव्यात हें देखील त्यांनीं मोठ्या चतुरपणानें दाखवून दिलें आहे. समुदाय कसे करावेत, त्यांना कसें व काय शिकवावें, त्यांचा कोणत्या वेळीं कसा उपयोग करून घ्यावा याचें अगदीं खुला- सेवार वर्णन त्यांनीं आपल्या दासबोधांत जागोजागीं केलेलें आहे. नुसतें शाब्दिक वर्णन करूनच ते थांबले नाहींत, तर त्यांनीं स्वतः त्याप्रमाणें आचरण करून उपदेशिलेलें तत्त्वज्ञान प्रचितीस आणून दिलेलें आहे. "मीं सांगितलेल्या गोष्टी मीं आधीं केल्या व नंतर त्यांचें निरूपण केलें" असें समर्थांनीं दास- बोधांत अनेक ठिकाणीं म्हटलेलें आहे.' त्यांनीं स्वसांप्रदायाचा विस्तार करण्या- करितां जो व्याप केला त्याची आतां महाराष्ट्रास बरीचशी माहिती झालेली असल्यामुळे समर्थांच्या ह्या वरील विधानासंबंधानें ('आधीं केलें मग सांगितलें') कोणी आशंका घेईल असें वाटत नाहीं. दुसरी गोष्ट अशी कीं, प्रचितीवांचून कोणाच्याहि उपदेशांत प्रायः जोमदारपणा येत नसतो. दासबोध ग्रंथांतील कोणताहि भाग घेतला तरी तो निःशंक असून जोमदारपणानें सर्वतोपरी मुस- मुसलेला आढळून येईल. तो वाचून समर्थांचा आत्मविश्वास फार विलक्षण होता असें तेव्हांच लक्ष्यांत येतें. येथून तेथून सारा दासबोध भेदक वक्तृत्वानें ठासून भरलेला आहे. त्यांत अनेक गहन विषयांचें विवेचन केलेलें आहे, परंतु तें सर्व अगदीं नेमक्या पण साध्या आणि औचित्यपूर्ण शब्दांत केलें असूनहि चित्ताकर्षक झालें आहे. तें इतकें कीं, (कित्येक लोक ह्या ग्रंथास 'काव्य' अशी संज्ञा देऊं लागले. वस्तुतः हा ग्रंथ 'काव्य' नाहीं; तो तत्त्वज्ञानाचा ग्रंथ आहे. असें असूनहि तो काव्य आहे असा जो भास होतो, तो दासांच्या चित्ताकर्षक विवेचनपद्धतीमुळेच होय. हा चित्तवेधकपणा नवरसात्मक अलंकारांनीं साधलेला नसून प्रचितीपूर्ण अशा भेदक व ठसकेदार शब्दरचनेनें साधलेला आहे.) हा ग्रंथ जो कोणी लक्ष्यपूर्वक वाचील, त्याचे ठायीं सामान्यतः मुमुक्षुत्वाचा उदय झालाच पाहिजे, असें म्हणण्यास हरकत नाहीं; मुमुक्षुत्व बाणलें कीं, त्यांतील उपदेशाचें खोल रहस्य मनुष्याच्या लक्षांत येऊं लागतें आणि तें लक्षांत येऊन त्याप्रमाणें आचरण घडल्यास मोक्षाची ऊर्फ स्वातंत्र्याची प्राप्ति निःसंशय होते, असा ह्या ग्रंथाचा महिमा आहे !
२० उपोद्घात. दासांच्या शिकवणीचा दुसरा एक लक्षांत ठेवण्यासारखा विशेष असा आहे कीं, त्यांनीं धर्मस्थापना अगर राज्यस्थापना करण्याकरितां समुदाय ऊर्फ संघटना करण्याचें तत्व विशेष रीतीनें लोकनिदर्शनास आणून दिलेलें आहे. आणि तसें करण्यांत, हें कार्य पिढ्यानपिढ्या चालू रहावें, हाच त्यांचा हेतु स्पष्ट दिसतो. ते म्हणतात:— आपण अवचितें मरोन जावें । मग भजन कोणें करावें । या कारणें भजनास लावावें । बहुत लोक । ( १२-१०--३३) संघटना करून राष्ट्रोद्धार करण्याचा मार्ग समर्थांपूर्वी त्यांच्याइतका कोणीहि विशद करून सांगितलेला नाहीं. तो सांगून व त्याप्रमाणें प्रत्यक्ष कृती करून भावी पिढ्यांस त्यांनीं एक सुंदर उदाहरण घालून दिलेलें आहे. आणि ज्या ज्या वेळीं महाराष्ट्रास विपन्नावस्था प्राप्त होईल, त्या त्या वेळीं समर्थांनीं घालून दिलेल्या ह्या उदाहरणाचें व त्यांनीं दाखवून दिलेल्या मार्गाचें मनन केल्यास त्यापासून फायदा होण्यासारखा आहे. समर्थांचे वेळीं भरतखंडांत धर्माला जी ग्लानि आली होती, तीस परधर्मी राज्यकर्त्यांप्रमाणें स्वधर्मी लोकहि कारणीभूत झालेले होते. स्वदेशी शासन- संस्थेच्या अभावामुळे ह्या दुसऱ्या प्रकारच्या लोकांच्या मनावरचा दाब नष्ट होऊन ते स्वैराचार करूं लागले होते व त्यांपैकीं जे पढतमूर्ख होते ते 'सर्व- ब्रह्म'वादी बनून वर्णसंकर ऊर्फ सबगोलंकार करण्यास उत्तेजन देत होते. त्या- मुळें समाजांत मोठा घोटाळा माजून राहिला होता. त्या स्थितीचें वर्णन दास- बोधांत आहे. मासल्याकरितां त्यांतील कांहीं उतारे पुढें देतों:— मतामतांचा गलबला । कोणी पुसेना कोणाला । जो जे मतीं सांपडला । तयास तेंचि थोर ॥ ( ११-२-२५) × × × × × ब्रह्मरूप जालें आघवें । तेथें काय निवडावें । अवघी साखरचि टाकावें । काये कोठें ॥ २२ ॥ तैसें सार आणि असार । आवघा झाला एकंकार । तेथें बळावला अविचार । विचार कैचा ॥ २३ ॥ वंद्य निंद्य येक जालें । तेथें काये हाता आलें ।
उन्मत्त द्रव्यें जें भुललें । तें भलतेंच बोले ॥ २४ ॥ तैसा अज्ञानभ्रमें भुलला । सर्वब्रह्म म्हणोन बैसला । माहापापी आणि भला । येकचि मानी ॥ २५ ॥ सर्वसंगपरित्याग । उल्हासवा विषयभोग । दोघे एकचि मानितां मग । काये उरलें ॥ २६ ॥ भेद ईश्वर करून गेला । त्याच्या बापेन न वचे मोडिला ॥ मुखामध्यें घास घातला । तो अपानीं घालावा ॥ २७ ॥ (द. १०-स. ४) ✕ ✕ ✕ ✕ ✕ ब्राह्मण बुद्धिपासून चेवले । आचारापासून भ्रष्ट झाले । गुरुत्व सांडून जाले । शिष्य शिष्यांचे ॥ (१४-७-३१) या उताऱ्यांत वर्णिलेल्या स्वजनांच्या स्वैर व भ्रष्ट वर्तनापासून माजलेली बजबजपुरी नष्ट झाल्यावांचून धर्मस्थापनेचें कार्य होणार नाहीं, असें समर्थांचें स्पष्ट मत होतें; व तदनुसार त्यांनीं आपल्या विवेकपूर्ण उपदेशानें व कृतीनें हें बंड मो
२२ उपोद्धात. आहो. ती मोडून टाकून सबगोलंकार करण्याचे २।३ मोठे प्रयत्न परकीयांनीं व स्वकीयांनीं केले, परंतु त्यांना यश न येतां अद्यापर्यंत ती टिकाव धरून आहे; इतकेंच नव्हे, तर ज्या ज्या वेळीं हे प्रयत्न झाले, त्या त्या वेळीं तिचें रक्षण करण्या- करितां मोठमोठे महात्मे पुढें येऊन त्यांनीं बहुजनसमाजाच्या साह्यानें बंडखो- रांचा पाडाव करून धर्मरक्षण केलेलें आहे. यावरून येथील बहुजनसमाजास ही संस्था अत्यंत हिताची वाटत आहे, हें उघड दिसून येतें. अलीकडे पाश्चात्य संस्कृतीचा ह्या देशांत उदय झाल्यापासून ह्या संस्थेवर पुन्हा जोराचे हल्ले होऊं लागले आहेत. त्यांत स्वजनांनींहि तिच्यावर शस्त्र उचललेलें आहे. त्यांच्या ह्या आघातासहि ही संस्था दाद देणार नाहीं, याबद्दल आमची खात्री आहे. परंतु या लोकांस आम्हांस एवढेंच सुचावावयाचें आहे कीं, सुधारलेल्या पाश्चात्य समाजां- तील असंतुष्ट वृत्ति व त्यामुळे तेथें होणारी खळबळ यांचा विचार करितां ह्या संतोषप्रवण संस्थेचा आश्रय करणें हेंच परिणामीं हितकर होणार आहे. जर्मनीसारख्या सुधारलेल्या राष्ट्रांतील तत्वज्ञांनींहि तिकडे निराळ्या रूपानें याच *संस्थेचें बीजारोपण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तसेंच इतर पाश्चात्य
- प्रख्यात जर्मन तत्त्ववेत्ता नीच याच्या तत्त्वज्ञानाचें स्पष्टीकरण करीत असतां ए. एम्. लुडोव्हिगी नामक ग्रंथकार निचच्या एतद्विषयक मताचा निष्कर्ष येणें- प्रमाणें सांगतो:-- “ It is ridiculous to pretend to treat everyone without regard to those natural distinctions which are manifested by superior intellectuality, or exceptional muscular strength or mediocrity of spiritual and bodily powers, or inferiority of both. It is not the legislator, but nature herself, who esta- blishes these broad classes, and to ignore them when form- ing a society would be just as foolish as to ignore the order of rank among material and structural principles when building a manument. ........ Thus he (नीच) would have the intellectually superior, those who can bear responsibi- lity and endure hardships, at the head. Beneath them are the warriors, the physically strong who are the guardians
श्रीसमर्थांची शिकवण. २३ राष्ट्राचाहि ओढा पुढें मागें लवकरच अशा प्रकारच्या संस्थेकडे लागेल असा तिकडील हालचालीवरून व विचारप्रदर्शनावरून रंग दिसत आहे. अशा स्थितींत आयती परंपरागत चालत आलेली इष्ट संस्था मोडून राष्ट्रसुधारणेची हाव बाळ- गल्यास ती यशस्वी तर होणार नाहींच, पण उलट त्यापासून नुकसान मात्र फार होईल, असा स्पष्ट इशारा दासांच्या शिकवणीच्या निरूपणानुसार देणें आम्हांस इष्ट वाटतें. चातुर्वर्ण्य कायम ठेवण्याची इच्छा बाळगून मग त्यांतील दोष सुधा- रण्याचा जर कोणी महात्मा यत्न करील, तर त्याच्या हातून मात्र आमची राष्ट्रीय उन्नति होणें शक्य आहे. चातुर्वर्ण्य मोडून तें कार्य करूं असें जर कोणी म्हणेल तर त्याच्या त्या केवळ वल्गना असून परिणामीं त्या निष्फळ होऊन दुःखास कारणीभूत होणाऱ्या आहेत. राष्ट्राची परंपरा सोडून म्हणजे उत्क्रांतीचा मार्ग सोडून क्रांतीचा मार्ग स्वीकारल्यास आपत्तिच जास्त ओढवते, असें अनेक राष्ट्रांचा इतिहास आज आपणांस सांगत आहे. विश्वबंधुत्व, समता, स्वातंत्र्य (लोकस्वातंत्र्य) ह्या गोंडस कल्पनांचा प्रसार युरोपखंडांत प्रथम फ्रेंच राज्य-
of right, the keepers of order and security, the king above all as the highest formula of warrior, judge, and keeper of the law. The second in rank are the executive of the most intellectual. And below this caste are the mediocre. Handi- craft, trade, agriculture, science, the greater part of art, in a word, the whole campass of business activity, is exclusi- vely compatible with an average amount of ability and pre- tention. At the very base of the social edifice, Nietzsche sees the class of man who thrives best when he is well looked after and closely observed—the man who is happy to serve, not because he must, but because he is what he is—the man uncorrupted by political and religious lies con- cerning equality, liberty, and fraternity—who is half consci- ous of the abyss which seperates him from his superiors, and who is happiest when performing those acts which are not beyond his limitations. —Nietzsche, The sociolsgist - P. 85.
२४ उपोद्घात. क्रांतीनें केला. परंतु ज्या फ्रेंच लोकांनीं ह्या कल्पनांची कास धरून पूर्वीची परं- परा तोडून टाकली, त्यांनाहि ह्या तिन्ही वस्तूंचा त्यांच्या कल्पनेबरहुकूम लाभ झाला नाहीं; व एक प्रकारचा जुलूम नाहींसा करण्याकरितां अघोरपणें अपार मनुष्यसंहार करूनहि अखेर त्यांस पुन्हा पूर्वपदावर यावें लागलें ! पाद्र्यांचा व बोरबोन राजघराण्याचा जुलूम त्यांनीं नष्ट केला, पण नेपोलियनची एकतंत्री सत्ता त्यांस मान्य करावी लागली ! ह्या लोकांच्या ह्या उच्छृंखल वृत्तीमुळें एका शतकाच्या आंत ३।४ वेळां क्रांतीचे प्रसंग त्यांच्यावर आले व त्यामुळें त्यांच्या समाजाची मोठी हानि होऊन त्यांस युरोपांतील आपलें श्रेष्ठ स्थान गमावून दुय्यम प्रकारचें राष्ट्र होऊन राहावें लागलें. अजूनहि त्या लोकांचा समाज स्थैर्य पावला आहे अथवा मानवी प्राण्याच्या अंतिम ध्येयाच्या नजिक येऊन पोंचला आहे असें म्हणतां येत नाहीं. फ्रेंच राष्ट्राचा इतिहास म्हणजे निरनिरा- ळ्या सामाजिक व राजकीय तत्त्वांच्या अतिरेकाचा इतिहास होय, असें 'आंद्रे ल बाँ' नामक फ्रेंच इतिहासकार व फ्रेंच चेंबर ऊर्फ पार्लमेंटचा सभासद यानें आपल्या 'मॉडर्न फ्रान्स' ह्या ग्रंथांत स्पष्टपणें कबूल केलेलें आहे. पूर्वपरंपरा मोडण्याची प्रवृत्ति हेंच ह्या अतिरेकाचें मुख्य कारण आहे. फ्रेंच लोक स्वभावतः मोठे बुद्धिमान, चपल, दक्ष व सुशिक्षित असल्यामुळें आणि त्यांचें राज्ययंत्र त्यांच्याच हातीं असल्यामुळें त्यांना इतके धक्केचपेटे सोसूनहि राष्ट्र ह्या नात्यानें जिवंत राहतां आलें. राज्ययंत्र स्वदेशी असल्यामुळें एकप्रकारची समाज- व्यवस्था बरी नाहीं असें वाटतांच तेथें दुसरी, किंवा तीहि बरी न दिसतांच तिच्या ठिकाणीं तिसरी; अशी भराभर योजना करून जिवंत राहणें त्यांस शक्य झालें. परंतु ज्या देशांत परराज्य असेल तेथील लोक जर उच्छृंखलपणा करूं लागतील तर ते नाशाचेच धनी व्हावयाचे हें उघड आहे. ही गोष्ट लक्षांत घेऊनच समर्थांनीं परंपरा न मोडतां चातुर्वर्ण्याच्या पद्धतींत जे कांहीं दोष तत्कालीं शिरले होते ते काढून टाकून ती संस्था फिरून कार्यक्षम बनविण्याचा प्रयत्न केला व तो यशस्वी झाला. या चातुर्वर्ण्याप्रमाणेंच भक्तिमार्गाचीहि समर्थांनीं पूर्वपरंपरा कायम ठेवूनच सुधारणा केली. भक्तिमार्गालाहि त्या वेळीं एकदेशीपणा आलेला होता. भक्तिमार्गी लोक त्या काळीं सर्व लौकिक कर्मांचा त्याग करून दुस-
श्रीसमर्थांची शिकवण. २५ च्याच्या जिवावर पोट भरण्याचें कार्य करीत होते व हेंच आपलें कर्तव्य असें ते मानूं लागले होते. संन्यासी, विरक्त, साधु यांनीं तर ह्या परोपजीवी आयुष्य- क्रमास एकप्रकारचा प्रतिष्ठितपणा प्राप्त करून दिला होता. त्यामुळे समाजांत आलस्य व दौर्बल्य यांचा सुळसुळाट झालेला होता. अन्नवस्त्र हें प्रारब्धाधीन अथवा ईश्वराधीन आहे; त्याकरितां मनुष्यानें वृथा धडपड करण्याचें कारण नाहीं. त्यानें खुशाल घरीं हरि हरि करीत बसावें व 'असेल माझा हरि । तरी देईल खाटल्यावरी' या उक्तीचा आश्रय करून आळशी बनावें, आणि स्वतःच्या कुटुंबाचाहि भार समाजावर टाकावा, अशी अवस्था झाली होती. भक्तिमार्गानें उत्पन्न केलेली ही दुरवस्था नष्ट करण्यास भक्तिमार्गाचें समूळ उच्चाटन करणें हा एक पक्ष होता; व युरोपांतील 'रॅशनॅलिस्ट' लोकांप्रमाणें समर्थांनाहि ह्या मार्गाचें उच्चाटन करण्याचा यत्न करितां आला असता. परंतु येथेंहि पूर्वपरंपरा राखण्याचेंच धोरण त्यांनीं स्वीकारलें. कारण त्याचें उच्चाटन केल्यास अगोदरच विस्कळित झालेल्या समाजांत जी कांहीं थोडी बहुत नीतिमत्ता वावरत होती, तीहि नष्ट होण्याचा संभव होता. सामान्य जनतेच्या मनोभूमींतून भक्तीचें उच्चाटन करून परमेश्वराचें अधिष्ठान नाहींसें करणें म्हणजे त्यास धर्म व नीति यांपासून परावृत्त करून सैतान बनण्याच्या मार्गास लावणें आहे. असें करणें समाजव्यवस्थेच्या दृष्टीनें केव्हांहि हिताचें नसतें, म्हणून समर्थांनीं भक्तिमार्गाचें उच्चाटन न करितां त्या मार्गांत शिरलेले दोष काढून टाकून त्याच्याच द्वारें प्रपंच व परमार्थ यांकडे लोकांचें लक्ष लावून दिलें. परमार्थज्ञानाचे सागर असे जे सिद्ध पुरुष त्यांनीं परोपजीवनाचा व आलस्याचा मार्ग टाकून साधकाची भूमिका घेऊन लोकांना परमार्थाचा मार्ग दाखवावा असें दासबोधांत त्यांनीं अनेक ठिकाणीं प्रतिपादिले आहे. भक्तिमार्गाची तत्कालीन संन्यासप्रवण वृत्ति व नैराश्यवाद मोडून त्याच्या ठिकाणीं कार्यक्षमता व आशावादित्व उत्पन्न कर- ण्याचा समर्थांनीं किती जोरानें प्रयत्न केला हें त्यांच्या शिकवणींतील पुढील उताऱ्यांवरून दिसून येईल:— (१) वन्ही तो चेतवावा रे । चेतवितांच चेततो । विवेक जाणिजे तैसा । वाढवितांच वाढतो ॥ १ ॥ संग तो साक्षेपी याचा । धरितां साक्षेप घडे ।
२६ उपोद्घात. साक्षेपें साक्षपु वाढे । पुरती मनकामना ॥ २ ॥ कष्टतां सौख्य मानावें । कष्टीं फळचि पाविजे । आळसें सुख वाटे तें । दुःखब्रह्मांड भोगवी ॥ ३ ॥ केल्यानें होत आहे रे । आधीं केलेंचि पाहिजे । येत्न तो देव जाणावा । अंतरीं धरितां बरें ॥ ४ ॥ —स्फुट काव्यें. (२) लहान थोर काम कांहीं । केल्यावेगळें होत नाहीं । म्हणोन आळस सोडावा । येत्न साक्षेपें जोडावा । दुश्चितपणाचा मोडावा । थारा बळें ॥ ( १२-९-८ ) —दासबोध. (३) घालून अकलेचा पवाड । व्हावें ब्रह्मांडाहून जाड । तेथें कैंचें आणिलें द्वाड । करंटपण ॥ ( १२-९-२९ ) (४) व्याप आटोप करिती । धके चपेटे सोसिती । तेणें प्राणी संदेव होती । देखत देखतां ॥ ( १५-३-७ ) (५) कष्टेंविण फळ नाहीं । कष्टेंविण राज्य नाहीं । केल्याविण होत नाहीं । साध्य जनीं ॥ ( १८-७-३ ) (६) येहलोक अथवा परलोक । दोहींकडे सारिखाचि विवेक ॥ ( १८-७-६ ) ऐहिक अथवा पारमार्थिक यांपैकीं कोणतेंहि कल्याण साधावयाचें असेल तर मनुष्यानें प्रयत्नरत झालें पाहिजे, असें समर्थांनीं निक्षून सांगितलें आहे; इतकेंच नव्हे, तर प्रयत्न हाच देव-ईश्वर-असेंहि ते म्हणतात ! ऐहिक कल्याण साधणारांस तर यत्न पाहिजेच, परंतु परमार्थाचा लाभ करून घेणाऱ्यानेहि दुश्चितपणा ऊर्फ आलस्य व करंटपण सोडून उपासनेचा पडिभर वाढवावा असें त्यांचें सांगणें आहे. ब्राह्मणमंडळ्या मेळवाव्या । भक्तमंडळ्या मानाव्या । संतमंडळ्या शोधाव्या । भूमंडळीं ॥ हा उपदेश अशा लोकांनाच अनुलक्षून केला आहे. याप्रमाणें चातुर्वर्ण्य व भक्तिमार्ग यांची सुधारणा करून धर्म व नीति
श्रीसमर्थांची शिकवण. २७ यांची समाजांत स्थापना केल्यावर किंवा ती करीत असतां त्यास पाठिंबा देऊन त्यांचें रक्षण करणारी राज्यसंस्थाहि त्यांनीं शिवाजीमहाराजांच्या हस्तें निर्माण केली. ही राज्यसंस्था कशी निर्माण केली याचेंहि खुलासेवार विवेचन त्यांनीं आपल्या दासबोधांत केलें आहे. तें चांगलें मनन करण्याजोगें आहे. सावधपण अथवा वर्तनाचें लक्षण हें समर्थांच्या शिकवणीचें तिसरें अंग आहे. यांत सर्व प्रकारची चतुरस्त्रता-दक्षता-उर्फ व्यवहारज्ञान याचा समावेश होतो. याचा उपयोग प्रपंच व परमार्थ ह्या दोहींकडे सारखाच असतो. प्रपंच- परमार्थाविषयीं अव्यग्रता असणें, काळप्रसंग जाणणें, सर्व कांहीं उपाधी करीत असूनहि उदासीन असणें-त्यांत लिप्त न होणें आणि प्राणिमात्रांविषयीं समबुद्धि बाळगणें इत्यादि ह्या तिसऱ्या अंगाचीं लक्षणें आहेत. परिश्रमण, चाळणा, विवेक, कष्ट, देहाच्या क्षणभंगुरतेविषयीं तीव्र जाणीव, कीर्तीची चाड, वैराग्य, निस्पृहता, मृदुवचन, क्षमा, शांति, सहिष्णुता, परोपकार व उत्कटता ह्या ११ उपायांच्या द्वारें उपरिनिर्दिष्ट अंगत्रयांनीं युक्त अशा आपल्या सांप्रदायाचें कार्य हातीं घेण्याची पात्रता संपादन करावी असें समर्थांचें सांगणें आहे. ही पात्रता संपादन करण्याचे वेळींहि वरील 'वर्तनाचें लक्षणा'चा फार उपयोग असतो, तो कसा याचें खुलासेवार स्पष्टीकरण दासबोधांत जागोजाग केलेलें आहे. नमुन्याकरितां कांहीं उतारे देतों:— (१) आपणास जें जें अनुकूल । तें तें करावें तत्काळ । होईना त्यास निवळ । विवेक उमजावा ॥ (१९-६-२७) (२) दुसऱ्याचें अंतर जाणावें । तदनुसारचि वर्तावें ॥ (३) दुसऱ्याचे मनोगतें जावें । मिळोनिया ॥ (१५-६-१७) (४) राहटांहों शोध घ्यावा । परांतराचा (१५-१-४) (५) मृत्याभयेण पळों जातां । तरी मृत्यु सोडिना सर्वथा । मृत्यास न ये चुकावितां । कांहीं केल्या ॥ (३-९-१८) (६) ऐसें जाणोनियां जीवें । याचें सार्थकचि करावें । जनीं मरोन उरवावें । कीर्तिरूपें ॥ (३-९-४४) (७) कीर्ति करून नाहीं मेले । ते उगेच आले आणि गेले । शाहाणे होऊन भुलले । काये सांगावें ॥
२८ उपोद्घात. ( ८ ) झिजल्यावांचूनी कीर्ति कैची । मान्यता नव्हे कीं फुकाची ॥ उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपाडावें । ( ११-५-९ ) ( १० ) उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळित अवघेंच टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं । ( -१४-१ ) ( ११ ) नाना जनांचें हृदय । मृदु शब्दें उकलावें ॥ ( १२ ) वेड्यास वेडें म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये । तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ ( १३-१०-२६ ) ( १३ ) बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥ ( १४ ) शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें । उणें पडों नेदावें । कोणीयेकाचें ॥ ( १५ ) उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट चातुर्य उत्कट भजन । उत्कट योग अनुष्ठान । ठायीं ठायीं ॥ कांहींएक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥ हे उतारे अगदीं निवडक व त्रोटक आहेत. त्यांत बीजरूपानें जीं तत्त्वें सांगितलीं आहेत, त्यांचा विस्तार पहावयाचा असल्यास दासबोध ग्रंथ समग्र लक्षपूर्वक वाचावा. दासबोधाखेरीज समर्थांचे काव्यबद्ध असे आणखी कित्येक प्रबंध आहेत. त्यांपैकीं कांहीं प्रकाशित व कांहीं अप्रकाशित आहेत. अप्रकाशित प्रकरणांपैकीं बरीच प्रकरणें धुळ्याच्या सत्कार्योत्तेजक सभेस उपलब्ध झालीं आहेत व त्यां- तील कांहीं तिनें एका स्वतंत्र खंडाच्या रूपानें प्रसिद्धहि केलीं आहेत. हीं सर्व प्रकरणें समर्थांनीं निरनिराळ्या प्रसंगीं लिहिलेलीं आहेत. त्यांतील मतलब सामा- न्यतः दासबोधांतील प्रमेयास पोषक आहे. किंबहुना, ह्या प्रमेयांचें विशेष व खुलासेवार स्पष्टीकरणच त्यांत आहे असें म्हटलें तरी चालेल. ह्या स्फुट- काव्याप्रमाणें समर्थांनीं एक रामायणहि रचिलें आहे. परंतु हें रामायण साग्र नाहीं. सीतेची बंधमुक्तता करून रावणाचा वध करण्याचा जो भाग मूळ रामायणांत आहे तोच समर्थांनीं आपल्या रामायणाचा मुख्य विषय बनविला
श्रीसमर्थांची शिकवण. २९
आहे. ही निवड करण्यांतहि त्यांचें औचित्य व राष्ट्रीय दृष्टि दिसून येते. तत्का- लीन महाराष्ट्राचें बंधन दूर करणें हें समर्थांचें उद्दिष्ट कार्य होतें. अर्थात् ह्या कार्यास पोषक असा जो सीताबंधविमोचनाचा प्रसंग तेवढाच निवडून घेऊन तो आपल्या भेदक वक्तृत्वानें तत्कालीन महाराष्ट्राच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न त्यांनीं करावा, हें त्यांच्या विचक्षणतेस व धूर्ततेस साजेसेंच आहे. ह्या एकाच गोष्टीवरून समर्थांची दृष्टि इतर संतांहून कशी निराळी म्हणजे राष्ट्रीय अशी होती हें वाचकांच्या सहज लक्षांत येईल. त्यांची इतर काव्यप्रकरणेंहि बहुधा याच दृष्टीनें लिहिलेलीं आहेत. त्यामुळे दासबोधाप्रमाणेंच तींहि धगधगीत व चैतन्यरूप असून आजकालच्या वाचकवर्गांचेंहि चित्ताकर्षण करूं शकतात. ह्या प्रकरणांतहि राष्ट्रोद्धाराला अवश्यक अशा गुणांचें वर्णन ठिकठिकाणीं फार मोहक रीतीनें केलेलें आहे. प्रत्यंतराकरितां कांहीं उदाहरणें देतों:— (१) भाग्यासी काय उणें रे । येत्नावांचूनि राहिलें । येत्न तो करावा कैसा । हेंचि आधीं कळेचिना ॥ १ ॥ मुख्य येत्न विचाराचा । त्यावरी बोलणें बरें । चालणें सत्य नेमाचें । नीति न्याय चुकों नये ॥ २ ॥ गलबला बुद्धि नासीतो । नाना निश्चय सांगती । ऐकावें कोणकोणाचें । बोलताहे बहुचकी ॥ ३ ॥ सांगोंचि जाणती सर्व । कर्तां कोणी दिसेचिना । जाणते नेणते सांगो । स्वभाव लागला जनीं ॥ ४ ॥ * * * * करंटे मिळाले सर्वें । जो तो बुधिच सांगतो । सांगावें तें आपणाला । आपणु करितां बळें ॥ ७ ॥ ( स्फु. प्रक. ) (२) धीर्धरा धीर्धरा तकवा । हडबडूं गडबडूं नका । काळ देखोनि वर्तावें । सांडावें भय पोटिचें ॥ १ ॥ धरावा धीर तो मोठा । विचारें पाहतां बरें । अधीर माणसें खोटीं । काम कांहीं कळेचिना ॥ २ ॥ * * * * प्रसंगीं चळचळा कांपे । तो प्राणी आत्मघातकी ॥५॥ ( स्फु. प्रक.)
३० उपोद्घात. ( ३ ) राम उपासना माझी । त्रयलोक्य सुख पावलें । सोडिले देव इंद्रादि । तोडिलीं बंधनें बळें ॥ कीर्तीसी तुळणा नाहीं । प्रतापे आगळा बहु । न्याय नेमस्त हे लीळा । न भूतो न भविष्यति ॥ उन्मत्त रावणें येणें । त्रैलोक्य पीडिलें बळें ॥ देव ते घातले बंदी । कैपक्षी राम पावला ॥ श्रीरामांनीं सीताशुद्धि करून शक्ति ऊर्फ आदिमाया-जगज्जननी-हिची आराधना करून तिच्या वरप्रसादानें रावणाचा पराभव केला असें सांगून पुढें समर्थ म्हणतात:— ( ४ ) जगजनि रामवरदानी । तयीपासुनि बोलिजे । उदंड ऐकिलें होतें । प्रतीत मजला नसे ॥ प्रतापगिरीचें ठायीं । आदिशक्ती विराजते । कामना पुरती तेथें । प्रचीती रोकड्या जनीं ॥ तुळजापुरीची माता । प्रतापेंचि प्रगटली ॥ आदिशक्ती माहंमाया । कुळीची कुळस्वामिनी ॥ कुळची पाळिलें आम्हां । रक्षिलें बहुतां परीं । तिची ते वैष्णवी माया । तारिते मारिते जनीं ॥ शक्तीनें पावती सुखें । शक्ती नसतां विटंबना । शक्तीनें नेटका प्राणी । वैभवें भोगितां दिसे ॥ कोण पुसे अशक्ताळा । रोगीसे बराडी दिसे । कळा नाहीं कांति नाहीं । युक्ति बुधी दुरावली ॥ साजिरी शक्ती तों काया । काया मायाचि वाढवी । शक्ती तों सर्वही सुखें । शक्ती आनंद भोगवी ॥ सार संसार शक्तीनें । शक्तीनें शक्ति भोगिजे । शक्त तो सर्वही भोगी । शक्तीवीण दारिद्रता ॥ शक्तीनें मिळती राज्यें । युक्तीनें यत्न होतसे । शक्ती युक्ती जये ठायीं । तेथें श्रीमंत धांवती ॥ युक्ती ते जाड कळा । विश्र्वकीसी तुळणा नसे ।
श्रीसमर्थांची शिकवण. ३१ अचूक चुकेना कोठें । त्याचीं राज्यें समस्तही ॥ युक्तीनें चालती सेना । युक्तीनें युक्ति वाढवी । संकटीं आपणा रक्षी । रक्षी सेना परोपरीं ॥ × × × × चोरटीं होरेंटीं तुंदें² । नासकें लांच इच्छिती । लाँढीचे दुरी घालावे । मारावे राजकारणें ॥ लोकांसी राखणें राजी । तें राज्य प्रबळे बळें । बंद बेबंद जाणावे । तांबे ताबे परोपरीं ॥ खेंळ खोचरें काढावे । तंदुळासारिखे खडे । खरें तें आदरें घ्यावें । खोटें सर्वत्र ताकिती ॥ कांहींएक परिक्षावें । शोधावें बहुतांपरीं । नेटकें कार्य साधावें । रोधावें कुटिला जना ॥ असो हें बोलणें जालें । युक्तीवीण कामा नये । युक्तीला पाहिजे शक्ती । तस्मात् शक्ती प्रमाण हे ॥ मुक्त केल्या देवकोडी । सर्वही शक्तिच्या बळें । समर्थ भवानी माता । समर्थां वरु दीधला ॥ × × × × वोळतां भवानी माता । महींद्र दास्य इच्छिती । बोलणें हें प्रचीतीचें । अन्यथा वाउगें नव्हे ॥ —अध्यात्मसार, स्फुट काव्यें. आतां फक्त एकच उतारा देतों. त्यांत समर्थांनी आपल्या सांप्रदायाचीं लक्षणें विशद करून दाखविलीं आहेत. प्रथम लिहिणें दुसरें वाचणें । तिसरें सांगणें अर्थांतर ॥ १ ॥ आशंकानिवृत्ति ऐसी चौथी स्थिती । पांचवी प्रचीती अनुभवें ॥ २ ॥ साहावें तें गाणें सातवें नाचणें । टाळि वाजवणें आठवें तें ॥ ३ ॥ नवा अर्थभेद दाहावा प्रबंध । आक्रावा प्रबोध प्रचीतीसी ॥ ४ ॥ १. हठवादी. २. गर्विष्ठ. ३. समुदाय. ४. छिंद्रे. ५. दोष.
९० उपोद्घात. बारावें वैराग्य तेरावा विवेक । चौदावा तो लोक राजी राखे ॥ ५ ॥ पंध्रावें लक्षण तें राजकारण । सोळावें तें जाण अवेगता ॥ ६ ॥ प्रसंग जाणावा हां गुण सत्रावा । काळ समजावा सर्वांठायीं ॥ ७ ॥ आठ्रावें लक्षण वृत्ती उदासीन । लोलंगता जाण तेथें नाहीं ॥ ८ ॥ येकोणीसावें चिन्ह सर्वांसी समान । राखे समाधान ज्याचें त्याचें ॥९॥ विसावें लक्षण रामउपासना । वेध लावी जना भक्तिरंगें ॥ १० ॥ हरिकथानिरूपण, राजकारण व सावधपण हीं जीं रामदासी सांप्रदायाचीं तीन प्रमुख अंगें त्यांचीं एकंदर २० लक्षणें समर्थांनीं वरील कवितेंत सांगितलीं आहेत. त्यांचें मनन करून तीं आपल्या अंगीं बाणण्याचा प्रयत्न करणारास प्रपंच व परमार्थ यांचा उत्कृष्ट प्रकारें लाभ होतो,’ असें समर्थांचें अनुभवजन्य वचन आहे. त्याकडे प्रस्तुतकालीन महाराष्ट्राचें लक्ष वेधावें अशी सदाशा प्रगट करून लेखणी खालीं ठेवतॉ.
श्रीदासबोध. दशक पहिला. १ ग्रंथारंभनिरूपण. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ श्रीसरस्वत्यै नमः ॥ श्रीगुरुभ्यो नमः ॥ श्रोते पुसती कोण ग्रंथ । काय बोलिलें जी येथ । श्रवण केलियानें प्राप्त । काय आहे ॥ १ ॥ ग्रंथनाम दासबोध । गुरुशिष्यांचा संवाद । येथें बोलिला विशदें । भक्तिमार्ग ॥ २ ॥ नवविधा भक्ति आणि ज्ञान । बोलिलें वैराग्या- चें लक्षण । बहुधा अध्यात्मनिरूपण । निरूपिलें ॥ ३ ॥ भक्तीचेनि योगें देव । निश्चयें पावती मानव । ऐसा आहे अभिप्राय । इये ग्रंथीं ॥ ४ ॥ मुख्य भक्तीचा निश्चय । शुद्ध ज्ञानाचा निश्चय । आत्मस्थितीचा निश्चय । बोलि- ला असे ॥ ५ ॥ शुद्ध उपदेशाचा निश्चय । सायुज्य मुक्तीचा निश्चय । मोक्ष- प्राप्तीचा निश्चय । बोलिला असे ॥ ६ ॥ शुद्ध स्वरूपाचा निश्चय । विदेहें- स्थितीचा निश्चय । अलिप्तपणाचा निश्चय । बोलिला असे ॥ ७ ॥ मुख्य देवाचा निश्चय । मुख्य भक्ताचा निश्चय । जीवशिवांचा निश्चय । बोलिला असे ॥ ८ ॥ मुख्य ब्रह्माचा निश्चय । नाना मतांचा निश्चय । आपण कोण हा निश्चय । बोलिला असे ॥ ९ ॥ मुख्य उपासनालक्षण । नाना कवित्व- लक्षण । नाना चातुर्यलक्षण । बोलिलें असे ॥ १० ॥ मायोद्भवाचें लक्षण । पंचभूतांचें लक्षण । कर्ता कोण हें लक्षण । बोलिलें असे ॥ ११ ॥ नाना १. स्पष्ट, स्वच्छ. २. श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवा, पूजा, वंदन, दास्य, सख्य व देहसमर्पण अशी नऊ प्रकारची. ३. शुद्ध ब्रह्मीं लीन होणें. ५. देहाभिमानरहित स्थितीचा. ६. मायेच्या उत्पत्तीचें. ७. पृथ्वी, उदक, अग्नि, वायु आणि आकाश यांचें.
२ श्रीदासबोध. [ दशक किंतु निवारले । नाना संशय छेदिले । नाना आशंका फेडिले । नाना प्र- श्न ॥ १२ ॥ ऐसें बहुधा निरुपिलें । ग्रंथगर्भी जें बोलिलें । तें अवघेंचि अनुवादलें । न वेचे कीं कदा ॥ १३ ॥ तथापि अवघा दासबोध । दशक फोडोनि केला विशद । जे जे दशकींचा अनुवाद । ते ते दशकीं बोलिला ॥ १४ ॥ नाना ग्रंथांच्या संमती । उपनिषदें वेदान्त श्रुती । आणि मुख्य आ- त्मप्रतीती । शास्त्रेंसहित ॥ १५ ॥ नाना संमतिअन्वयें । म्हणोनि मिथ्या म्हणतां नये । तथापि हें अनुभवास ये । प्रत्यक्ष आतां ॥१६॥ मत्सरें यासी मिथ्या म्हणती । तरी अवघेचि ग्रंथ उच्छेदिती । नाना ग्रंथांच्या संमति भ- गवद्वाक्यें ॥ १७ ॥ शिवगीता रामगीता । गुरुगीता गर्भगीता । उत्तरगीता अवधूतगीता । वेद आणि वेदान्त ॥ १८ ॥ भगवद्गीता ब्रह्मगीता । हंस- गीता पांडवगीता । गणेशगीता यमगीता । उपनिषदें भागवत ॥ १९ ॥ इत्यादिक नाना ग्रंथ । संमर्ता.स बोलिले येथ । भगवद्वाक्यें यथार्थ । निश्चयेंसी ॥२०॥ भगवद्वचनीं अविश्वासे । ऐसा कोण पतित असे । भगवद्वाक्याविरहित नसे । बोलणें येथीलें ॥ २१ ॥ पूर्ण ग्रंथ पाहिल्याविण । उगाच ठेवी जो दूषण । तो दुरात्मा दुरभिमान । मत्सर करी ॥२२॥ अभिमानें उठे मत्सर । मत्सरें तिरस्कार । पुढें क्रोधाचा विकार । प्रबळे बळें ॥ २३ ॥ ऐसा अंतरीं नासला । कामक्रोधें खवळला । अहंभावें पालटला । प्रत्यक्ष दिसे ॥ २४ ॥ कामक्रोधें लिथाडिला । तो कैसा म्हणावा भला । अमृत सेवितांचि पावला । मृत्यु राहू ॥ २५ ॥ आतां असो हें बोलणें । अधिकारासारिखें घेणें । परंतु अभिमान त्यागणें । हें उत्तमोत्तम ॥ २६ ॥ मागां श्रोतीं आक्षेपिलें । जी ये ग्रंथीं काय बोलिलें । तें सकळहि निरुपिलें । संकलितें मॉगें ॥२७॥ आतां श्रवण केलियाचें फळ । क्रिया पालटे तात्काळ । तुटे संशयाचें मूळ । एकसरां ॥ २८ ॥ मार्ग सांपडे सुगम । नलगे साधन दुर्गम । सायुज्यमुक्तीचें वर्म । ठांई पडे ॥२९॥ नासे अज्ञान दुःख भ्रांती । शीघ्रचि येथें ज्ञानप्राप्ती । ऐसी आहे फलश्रुति । इये ग्रंथीं ॥ ३० ॥ योगियांचें परम भाग्य । अंगीं बाणे तें वैराग्य । चातुर्यकळा यथायोग्य । विवेकेंसहित ॥ ३१ ॥ आंत अवगुणी १. सांगितलें जात नाही. २. वेदांतील एक भाग. ३. लिप्त झाला. ४. विचा- रूं. ५. संक्षिप्त रीतीनें.
१ सा.] गणेशस्तवन. ३ अवलक्षण । तेचि होती सुलक्षण । धूर्त तार्किक विचक्षण । समय जाणती ॥ ३२ ॥ आळसी तेचि साक्षेपी¹ होती । पापी तेचि पस्तावती । निंदक तेचि वंदूं लागती । भक्तिमार्गासी ॥ ३३ ॥ बद्धचि होती मुमुक्षू² । मूर्खचि होती अतिदक्ष । अभक्तचि पावती मोक्ष । भक्तिमार्गों ॥ ३४ ॥ नाना दोष ते नासती । पतित तेचि पावन होती । प्राणी पावे उत्तम गती । श्रवणमात्रें ॥३५॥नाना धोके देहबुद्धीचे । नाना किंतु संदेहाचे । नाना उद्वेग³ संसाराचे । नासती श्रवणें ॥ ३६ ॥ ऐसी याची फलश्रुती । श्रवणें चुके अधोगती । मनासी होय विश्रांती । समाधानें ॥ ३७ ॥ जयाचा भावार्थ जैसा । तयास लाभ तैसा । मत्सर धरी जो पुंसां⁴। तयासी तेंचि प्राप्त ॥ ३८॥ इति श्रीदास- बोधे गुरुशिष्यसंवादे प्रथमदशके ग्रंथारंभनिरूपणं नाम प्रथमः समासः ॥१॥ २. गणेशस्तवन. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐनमोजी गणनायका । सर्वसिद्धिफलदायका । अज्ञानभ्रांतिछेदका ॥ बोधरूपा ॥ १ ॥ माझिये अंतरीं भरावें ॥ सर्वकाळ वास्तव्य करावें । मज वाक्शून्यासि वदवावें । कृपाकटाक्षेंकरूनी ॥ २ ॥ तुझिये कृपेचेनि बळें । वितुळती भ्रांतीचीं पडळें⁶ । आणि विश्वभक्षकें काळें । दास्यत्व कीजे ॥ ३ ॥ येतां निजकृपेची उडी । विघ्नें कांपती बापु- डीं । होऊनि जाती देशधडी । नाममात्रें ॥ ४ ॥ म्हणोनि नाम विघ्नहर । आम्हां अनाथांचें माहेर । आदिकरूनी हरिहर । अमर वंदिती ॥ ५ ॥ वंदूनियां मंगलनिधी । कार्य करितां सर्व सिद्धी । आघात अडथळे उपाधी । बाधूं शकेना ॥ ६ ॥ जयाचें आठवितां ध्यान । वाटे परम समाधान । नेत्रीं निघोनियां मन । पांगुळे सर्वांगीं ॥ ७ ॥ सगुण रूपाची ठेव । महालावण्य- लाघव । नृत्य करितां सकळ देव । तटस्थ होती ॥ ८ ॥ सर्वकाळ मदोन्म- त्त । सदा आनंदें डोलत । हर्षे निर्भरें उदितें⁷ । सुप्रसन्नवदन ॥ ९ ॥ भव्य रूप वितंड । भीममूर्ति महाप्रचंड । विस्तीर्ण मस्तक उदंड । सिंदूर चर्चिला १. मोठे उद्योगी. २. मुक्त होण्याची इच्छा करणारे. ३. दुःखें. ४. पुरुष. ५. मूर्खास. ६ पडदे. ७. अतिशय उल्हसित.