दासबोध (समर्थ रामदास स्वामी - सम्पूर्ण २० दशक एवं २०० समास सटीक)
Dasbodh of Samarth Ramdas Swami with Commentary
समर्थ रामदास स्वामी द्वारा
पृष्ठ 31, कुल 467 में से
संदर्भ में पढ़ें२८ उपोद्घात. ( ८ ) झिजल्यावांचूनी कीर्ति कैची । मान्यता नव्हे कीं फुकाची ॥ उपाधीसी विस्तारावें । उपाधींत न संपाडावें । ( ११-५-९ ) ( १० ) उत्कट भव्य तेंचि घ्यावें । मळमळित अवघेंच टाकावें । निस्पृहपणें विख्यात व्हावें । भूमंडळीं । ( -१४-१ ) ( ११ ) नाना जनांचें हृदय । मृदु शब्दें उकलावें ॥ ( १२ ) वेड्यास वेडें म्हणों नये । वर्म कदापि बोलों नये । तरीच घडे दिग्विजये । निस्पृहासी ॥ ( १३-१०-२६ ) ( १३ ) बरें वाईट सोसावें । समुदायाचें ॥ ( १४ ) शरीर परोपकारीं लावावें । बहुतांच्या कार्यास यावें । उणें पडों नेदावें । कोणीयेकाचें ॥ ( १५ ) उत्कट भक्ति उत्कट ज्ञान । उत्कट चातुर्य उत्कट भजन । उत्कट योग अनुष्ठान । ठायीं ठायीं ॥ कांहींएक उत्कटेंविण । कीर्ति कदापि नव्हे जाण । उगेंच वणवण हिंडोन । काये होतें ॥ हे उतारे अगदीं निवडक व त्रोटक आहेत. त्यांत बीजरूपानें जीं तत्त्वें सांगितलीं आहेत, त्यांचा विस्तार पहावयाचा असल्यास दासबोध ग्रंथ समग्र लक्षपूर्वक वाचावा. दासबोधाखेरीज समर्थांचे काव्यबद्ध असे आणखी कित्येक प्रबंध आहेत. त्यांपैकीं कांहीं प्रकाशित व कांहीं अप्रकाशित आहेत. अप्रकाशित प्रकरणांपैकीं बरीच प्रकरणें धुळ्याच्या सत्कार्योत्तेजक सभेस उपलब्ध झालीं आहेत व त्यां- तील कांहीं तिनें एका स्वतंत्र खंडाच्या रूपानें प्रसिद्धहि केलीं आहेत. हीं सर्व प्रकरणें समर्थांनीं निरनिराळ्या प्रसंगीं लिहिलेलीं आहेत. त्यांतील मतलब सामा- न्यतः दासबोधांतील प्रमेयास पोषक आहे. किंबहुना, ह्या प्रमेयांचें विशेष व खुलासेवार स्पष्टीकरणच त्यांत आहे असें म्हटलें तरी चालेल. ह्या स्फुट- काव्याप्रमाणें समर्थांनीं एक रामायणहि रचिलें आहे. परंतु हें रामायण साग्र नाहीं. सीतेची बंधमुक्तता करून रावणाचा वध करण्याचा जो भाग मूळ रामायणांत आहे तोच समर्थांनीं आपल्या रामायणाचा मुख्य विषय बनविला